टॉप न्यूज

सिडको प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा

ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई
सिडकोच्या प्रकल्पग्रस्तांनी प्रलंबित मागण्यांसाठी सिडकोच्या नवी मुंबईतील मुख्यालयावर भव्य मोर्चा काढला. 95 गावांतील जवळपास 30 हजार प्रकल्पग्रस्त मोर्चात सहभागी झाले होते. उरण प्रकल्प समिती आणि जेएनपीटी सिडको प्रकल्पग्रस्त समितीनं ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडलं.
 

morchaगेली कित्येक वर्षं हे प्रकल्पग्रस्त त्यांच्या मागण्यांसाठी सिडकोकडे पाठपुरावा करतायत, पण त्यांना त्यात अजूनही यश आलेलं नाहीये. त्यामुळंच मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी केलाय. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्यास सिडकोचे भविष्य़ातील सर्व प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला. आता करो या मरोची लढाई सुरू झाल्याचं सांगत दि. बा. पाटील मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करून बेमुदत बंद पुकारण्याची हाक दिली. आमदार विवेक पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांसमवेत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं सांगत चर्चेतून काही निष्पऩ्न न झाल्यास मात्र आंदोलन आणखी तीव्र करू, अशी भूमिका मांडली. शेकापचे सरचिटणीस बाळाराम पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, कामगार नेते श्याम म्हात्रे आदी नेते मोर्चात सहभागी झाले होते.


21 प्रमुख मागण्या

m2प्रकल्पग्रस्तांच्या जवळपास 21 मागण्या आहेत. सरकारनं मान्यता दिल्याप्रमाणं 12.50 टक्के जमीन प्रकल्पग्रस्तांना परत करावी, तसंच गावठाणाचा विस्तार करावा, गावात नागरी सुविधा पुरवाव्यात अशा काही मागण्यांचा समावेश आहे. सिडकोसाठी जमीन घेताना या प्रकल्पग्रस्तांना सरकारनं आश्वासन दिलं होतं की, त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल, पण तसं झालं नाही. सरकारनं आता तरी या प्रकल्पग्रस्तांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली जातेय.

 

सिडकोमध्ये नोकऱ्या द्या
सिडकोकडून 12.5 टक्के भूखंड लवकरात लवकर देण्यात यावा, 100 टक्के प्रकल्पग्रस्तांनाच सिडकोच्या नोकऱ्यांमध्ये समाविष्ट करून घ्यावं. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमिनी जाणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या मान्य कराव्या, न्हावा शेवा येथील सागरी पूल बांधण्यापूर्वी प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यात याव्यात आणि सिडकोतील भ्रष्ट अधिकाऱ्यांची सीबीआयतर्फे चौकशी करण्यात यावी, या आणि इतर मागण्यांसाठी आजपासून सिडको संघर्ष समितीनं बेमुदत बंदची हाक दिलीय.

 

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.