टॉप न्यूज

नवी मुंबईत वारकऱ्यांचा मेळा

ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई
आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने!शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू!!संत तुकोबांच्या या ओव्या म्हणजे शब्दांचं महत्त्व सांगतात. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, सावता माळी या थोर संतांची परंपरा आपल्याला लाभलीय. याच संतांचे शब्द प्रमाण मानून, संत साहित्याला नवी उभारी देण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाला आज नवी मुंबईत थाटात सुरुवात झाली. कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं असून आता तीन दिवस साहित्य रसिकांना वारकरी साहित्याचा आस्वाद घेता येणार आहे.
 
 
 

sant sahitya sammelan photoनेरूळच्या रामलीला मैदानावर भरलेला हा वारकऱ्यांचा मेळा आता तीन दिवस सुरू राहणार आहे. सकाळी निघालेल्या ग्रंथदिंडीनं संमेलनाला सुरुवात झाली. या ग्रंथदिंडीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. संमेलनात कीर्तन, भजन, भारूड, सामुदायिक हरिपाठासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

 

संमेलनातील तीन दिवसांचे कार्यक्रम

 

शनिवार, 16 फेब्रुवारी, 2013

पहिलं सत्र : दुपारी 2 ते 4 पर्यंत
विषय – संतसाहित्य आणि शेती
अध्यक्ष - ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे (पंढरपूर)

 

दुसरं सत्र : दुपारी 4 ते 6 पर्यंत
विषय - संतसाहित्य व उद्योग-व्यवसाय
अध्यक्ष – ह.भ.प. दिनकरशास्त्री भुकेले

 

सायंकाळी 6 ते 7 - सामुदायिक हरिपाठ


रात्री 7 ते 9 – कीर्तन - ह.भ.प श्री. धोंडोपंत महाराज शिरवळकर, पंढरपूर


रात्री 9 ते 11 – भारूड - ह.भ.प श्री. लक्ष्मण महाराज राजगुरू, पुणे

 

रविवार, 17फेब्रुवारी, 2013

 

तिसरं सत्र : सकाळी 9 ते 11 पर्यंत
विषय – संतसाहित्य आणि कायदा-सुव्यवस्था
अध्यक्ष – ह.भ.प. चकोर महाराज बाविस्कर (न्यायमूर्ती)

 

चौथं सत्र : सकाळी 11 ते 1 पर्यंत
विषय – संतसाहित्य आणि पाठ्यक्रम
अध्यक्ष - डॉ. सदानंद मोरे, माजी अध्यक्ष, पहिलं अ. भा. संत साहित्य संमेलन

 

पाचवं सत्र : दुपारी 1 ते 3 पर्यंत
विषय - संतसाहित्य आणि स्त्री
अध्यक्ष – मालुश्री पाटील, सरपंच, ग्रामपंचायत इनामधामनी, सांगली

 

सहावं सत्र : दुपारी 3 ते 5 पर्यंत
विषय - संतसाहित्य व प्रसारमाध्यमे
अध्यक्ष - ह.भ.प. राजाभाऊ चोपदार, आळंदी

 

सातवं सत्र : संध्याकाळी 5 ते 7 पर्यंत
विषय - संतसाहित्य आणि मन:स्वास्थ
अध्यक्ष - लक्ष्मणराव ढोबळे, स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री

 

रात्री 7 ते 9 पर्यंत
कीर्तन - ह.भ.प. श्रीगुरू तुकाराम एकनाथ काळेमाऊली, प्रमुख, आजरेकर फड

 

रात्री 9 ते 11 पर्यंत
कीर्तन - ह.भ.प. डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर, विभाग प्रमुख, संत तुकाराम अध्यासन केंद्र, पुणे विद्यापीठ

 

सोमवार, 18 फेब्रुवारी, 2013

 

सकाळी 9 ते 11 पर्यंत
काल्याचं कीर्तन – ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर, तुकोबारायांचे वंशज

 

सकाळी 11 ते 12 : खुलं अधिवेशन

 

दुपारी 12 वाजता : समारोप सोहळा

 

या कार्यक्रमांव्यतिरिक्त वारकरी साहित्य परिषदेकडून 'वारकरी विठ्ठल' पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

पुरस्काराचे मानकरी

  1. वारकरी संप्रदायासाठी महाराष्ट्रात अमूल्य कार्य केल्याबद्दल मरणोत्तर पुरस्कार ह.भ.प. वै. केशवबापू कबीर महाराज, आळंदी यांचा पुरस्कार स्वीकारणार ह.भ.प श्री. चैतन्य महाराज कबीरबुवा. 
  2. वारकरी संप्रदायाच्या विशेष सेवेसाठी ह.भ.प (आमदार) श्री. तात्या डिंगरे, पंढरपूर यांना जीवनगौरव पुरस्कार.
  3. महाराष्ट्र राज्याबाहेर कर्नाटकात वारकरी संप्रदायाचे प्रचार आणि प्रसाराचे विशेष कार्य केल्याबद्दल ह.भ.प श्री. ( अध्यक्ष, कर्नाटक-गोवा वारकरी महासंघ) भाऊसाहेब महाराज पाटील गुरुजी यांना प्रदान करण्यात येणार आहे.
  4. बाबासाहेब आजरेकर फड प्रमुखपदी २५ वर्षं अविरत सेवेबद्दल ह.भ.प श्रीगुरू तुकाराम एकनाथ काळे ( माऊली) यांना गाडी प्रदान सोहळा आहे.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.