टॉप न्यूज

डोंबिवलीत वाईल्डलाईफ...

ब्युरो रिपोर्ट
जंगलसंपदा, त्यातले प्राणी, पक्षी यांचं मनोहारी दर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर डोंबिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात भरलेल्या वाईल्डलाईफ फोटोग्राफी प्रदर्शनाला नक्की भेट द्या. डोंबिवलीतील मिडअर्थ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनं भरवण्यात आलेलं हे प्रदर्शन १८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनात कल्याण-डोंबिवलीतील 30 वाईल्डलाईफ फोटोग्राफर्सनी काढलेल्या छायाचित्रांचा समावेश आहे. प्रदर्शन विनाशुल्क असून 'भारत4इंडिया' त्याचा मीडिया पार्टनर आहे.
 

वाढत्या सोशल नेटवर्किंगचा वापर आणि आधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज असे मोबाईल, कॅमेरा इत्यादी इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स यामुळं फोटोग्राफीची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चाललीय.


wild life exib photo 1प्रत्येक जण आपापल्यापरीनं आपल्या आयुष्यातील आवडते क्षण, आवडत्या व्यक्तींचे फोटो, तसंच आपल्या दृष्टीतून विविध फोटो काढत असतो. या अशाच फोटोंचा फेसबुक, टि्वटर अशा सोशल नेटवर्किग साईटवर भडिमार असतो. परंतु या सर्वांपेक्षा थोडी वेगळी फोटोग्राफी म्हणजे वाईल्डलाईफ फोटोग्राफी. ज्यामध्ये जंगलातील प्राण्यांच्या विविध करामती, जीवनसंघर्ष हे सर्व अनेक दिवस जंगलात वास्तव्य करून फोटोग्राफर टिपत असतात. त्यामुळं या फोटोंना पाहण्याची मजा काही औरच असते.

 

 


नवोदित वाईल्डलाईफ फोटोग्राफरसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावं, हा उद्देशही या प्रदर्शनामागं आहे. Wild Life Exib image
जंगलातील विविध कीटक, फुलपाखरं, पक्षी, प्राणी इत्यादींसोबतच देशातील विविध जंगलं, कच्छचं वाळवंट, स्पिती व्हॅली, संगम पॉर्इंट, भीमाशंकर, कान्हा, कास पठार इत्यादी पर्यटनस्थळांचे फोटो लक्षवेधी आहेत. मधुबाज, वेडा राघू, पिवळ्या डोक्याचा धोबी, पीतमुखी टिटवी, करवानक, पेलिकन, मलबारी, नीलिमा, तपकिरी डोक्याचा किरव, सर्प, गरूड आदी विविध पक्षी, प्राणी अन् निसर्गरम्य ठिकाणं या फोटोतून पाहण्याची मजा फोटो रसिकांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळत आहे.

 

 

Comments (1)

  • Very nice coverage. Our efforts have been well documented by Mr. Bhange.
    It will only motivate us to improve and shine with each new activity.

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.