टॉप न्यूज

जपानी गाण्यात मराठी झेंडा

शशिकांत कोरे, सातारा
इंटरनेटमुळं जग अधिकच जवळ आलंय. त्यामुळं युवकांना करिअरसाठी जगभरासाठीची बाजारपेठ खुणावतेय. त्यामुळंच परदेशी भाषा शिकण्यासाठी तरुण पिढी रस घेऊ लागलीय. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांतच नव्हे, तर आता छोट्या शहरांतही परदेशी भाषा शिकवणारे वर्ग जोरात सुरू आहेत. साताराही त्याला अपवाद नाही. इथल्या लिग्विस्ट अॅकॅडमी या संस्थेत परदेशी भाषा शिकण्यासाठी तरुणाई गर्दी करतेय. अलीकडंच जपान फाऊंडेशननं घेतलेल्या जपानी गाण्याच्या स्पर्धेत या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी पहिला क्रमांक पटकावून मराठीचा झेंडा सातासमुद्रापार फडकावलाय.
 

जपानी भाषा
जपान सरकारनं जपानी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जपान फाऊंडेशनवर जबाबदारी सोपवलीय. सध्या देशात 15 हजार विदयार्थी जपानी भाषा शिकत आहेत. त्यांना व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी जपान फाऊंडेशननं गतवर्षापासून पुणे, दिल्ली, बेंगळूरु आदी ठिकाणी जपानी गाण्यांच्या स्पर्धा घेण्यास सुरुवात केली. यावर्षी महाराष्ट्र आणि गुजरात इथले 23 संघ पुण्यात झालेल्या स्पर्धेत सहभागी झाले. या स्पर्धेत साताऱ्याच्या लिग्विस्ट अॅकॅडमीच्या विदयार्थ्यांनी गुणवत्ता दाखवत विशेष पारितोषिक पटकावलं.

 

जपानी भाषेचं महत्त्व
मराठी युवक करिअर करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करीत असतात. पण लहानपणापासूनच
परदेशी भाषा, विशेषतः जपानी भाषा शिकण्यास सुरुवात केल्यास उच्च पदवी घेतल्यानंतर
10 लाखांपेक्षा अधिक पॅकेज युवकांना मिळतं. ग्रामीण भागातील युवकांकडंही बुद्धिमत्ता असते.
तिचा योग्य तऱ्हेनं उपयोग करून आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्तृत्व सिध्द करण्यास मदत होतेय.
अशी माहिती लिग्विस्ट अॅकॅडमीचे संचालक प्रसन्न कळबुरकर यांनी 'भारत4इंडिया'स सांगितलं.

 

ग्रामीण भागात परदेशी भाषेचं आकर्षण
प्रसन्न कळबुरकर यांनी परदेशी भाषा विद्यार्थांना शिकवण्यासाठी लिग्विस्ट ही संस्था साताऱ्यात सुरू केली. आजपर्यंत एक हजार विद्यार्थ्यांना त्यांनी जपानी भाषा शिकवलीय. जपानी भाषेतील एन टु ग्रेड पास असलेल्या केवळ दोन व्यक्ती देशात आहेत. त्यापैकी एक प्रसन्न कळबुरकर आहेत. जपान भूकंप मदतपुनर्वसन कार्यात त्यांना जपान सरकारनं खास आमंत्रित केलं होतं. सामान्य युवकाच्या जीवनात परिवर्तन होण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

 

मराठी युवकांचा आत्मविश्वास
जेसकॅप2013 या स्पर्धेसाठी 'दो शितो' हे जापनीज गीत निवडलं होतं. भाषेवर चांगलं प्रभुत्व
मिळवलं की, त्या भाषेशी समरस होऊन गीत गाता येतं. या संस्थेत शिकलेले युवक कामानिमित्त जगभरात आहेत.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.