टॉप न्यूज

मंचरला 'शासन आपल्या दारी'

ब्युरो रिपोर्ट, पुणे
ग्रामीण जनतेला आपल्या गावात सर्व सरकारी कामकाजांची कागदोपत्री पूर्तता करता यावी, या उद्देशानं राज्य महसूल विभागातर्फे आयोजित 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम नुकताच आंबेगाव तालुक्यात पार पडला. यावेळी तब्बल २६ हजार नागरिकांनी याचा लाभ घेतला. आंबेगावच्या नवीन तहसील कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त हा कार्यक्रम झाला.
 


पुणे जिल्ह्यातील आंबेगाव या तालुक्याचं मंचर हे मुख्य ठिकाण. इथं अनेक वर्षांपासून शासकीय कामकाज एका जुन्या इमारतीतून सुरू होतं. दिवसेंदिवस लोकांची वाढणारी गर्दी, तसंच इथल्या कर्मचाऱ्यांवर वाढणारा ताण लक्षात घेता सरकारनं सुमारे सहा एकर परिसरात अद्ययावत असं तहसील कार्यालय सुरू केलंय. त्याचं उद्घाटन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते नुकतंच झालं. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

Shasan Apalya Dari 1खरं तर साधं रेशनिंग कार्ड असो की जातीचा दाखला. त्यासाठी अनेक हेलपाटे या कार्यालयात नागरिकांना मारावे लागायचे. मात्र इथं राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळं अनेक सामान्य नागरिकांना आवश्यक ते दाखले सहज मिळाले. विशेषतः आदिवासी दुर्गम भागातील जनतेला याचा अधिक फायदा झाला. दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या कुटुंबांना लागणारे बीपीएल कार्ड, वयाचा दाखला, सातबारा नोंदी, फेरफार असे अनेक प्रकारचे दाखले यावेळी वितरित करण्यात आले. येत्या काळात नागरिकांना त्यांच्या दाखल्यासाठी तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत यासाठी ऑनलाईन सुविधा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी दिली.Shasan Apalya Dari 4विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी महसूल मंत्र्यांच्या भाषणातला हाच धागा पकडून शेतकऱ्यांना हवे असतात सातबाराचे दाखले अथवा शेतीविषयक असणाऱ्या योजनांसाठी लागणारी कागदपत्रं शासकीय कर्मचाऱ्यांनी वेळेत द्यायला हवीत, अशी अपेक्षा बोलून दाखवली. त्यासाठी येत्या काळात संगणकीय दाखले अधिकाधिक प्रमाणात कार्यान्वित करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत देणार असल्याचंसुद्धा त्यांनी नमूद केलं.

 

काय आहे उपक्रम?
शासन धोरणाचा एक भाग म्हणून महसूल विभागामार्फत प्रामुख्यानं शेतकरी, ग्रामीण स्तरावरील अल्प उत्पन्न गटातील नागरिक आणि शेतमजूर यांच्या सोयीसाठी 'शासन आपल्या दारी' या संबोधनाचा उपक्रम राबवला जात आहे. हा उपक्रम महसूल विभागाच्या पुणे विभागाचे तत्कालीन विभागीय आयुक्त अरुण भाटिया यांच्या कार्यकाळात काटेकोरपणं, उत्स्फूर्तपणं राबवला गेला. अर्थात, आताही त्याच रूपरेषेनुसार कार्यपद्धती चालू आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे प्रत्यक्ष गावपातळीवरच उत्पन्नाचे दाखले देणं, ज्येष्ठ Shasan Apalya Dari 6नागरिकांचे वयाचे दाखले देणं, रेशनकार्ड देणं, अज्ञान सज्ञान झाल्याच्या नोंदी, 7/12 उतारा जागेवरच करणं, मयत खातेदारांची माहिती, जागेवरच नमुना नं. 8-अ वरून घेऊन ती वारसनोंद रजिस्टर नमुना 6-क ला नोंदी धरून घेणं, मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठीचे अर्ज, दाखले प्राप्त करून घेणं, मागणीनुसार जागेवरच 7/12 चे उतारे देणं, खरेदीच्या नोंदी जागेवरच धरून घेणं, पूर्ण परतफेड झालेल्या कर्जाच्या बोजाच्या नोंदी कमी करणं, विविध शासनाच्या योजनांवर प्रबोधन करणं, आदी बाबी प्रस्तुत उपक्रमातच पूर्ण करता येण्यासारख्या आहेत. त्याचबरोबर सध्याचे ज्वलंत प्रश्‍न म्हणजे व्यसनाधीनता, स्त्रीभ्रूणहत्या याबाबतीतही जरूर ते प्रबोधन करणं आणि जरब बसवण्यासाठी कायद्यातील तरतुदी विशद करणं, या बाबी हाताळता येतात. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्राथमिक नियोजन महत्त्वाचं ठरतं.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.