टॉप न्यूज

फळबागांना आधार पॅकेजचा

ब्युरो रिपोर्ट, सातारा
दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्यानं सर्वांच्याच तोंडचं पाणी पळालंय. मोठ्या मेहनतीनं जगवलेल्या फळबागा जळून गेल्यात. तर काही ठिकाणी शेतकरी जीवाचा आटापिटा करून फळबागा जगवतोय. त्यांना काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयानं पुढाकार घेतलाय. फळबागांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 45 हजारांचं पॅकेज प्रस्तावित करण्यात आलंय. त्यातून जास्तीत जास्त 90 हजारांची नुकसानभरपाई मिळण्याची आशा निर्माण झालीय. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीच ही माहिती दिली असून येत्या दहा दिवसांत त्याबाबत घोषणा होऊ शकते.
 drought introयंदाच्या दुष्काळामुळं राज्यात विशेषतः पश्चिम महाराष्ट्र तसंच मराठवाडा विभागात फळबागांचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामध्ये डाळिंब, द्राक्ष, केळी, संत्रा, मोसंबी, आंबा यांचा प्रामुख्यानं समावेश आहे. फळपिकं ही बहुवार्षिक असल्यानं दहा-दहा वर्षं शेतकऱ्यांनी जपलेली असतात. त्यामुळं या पिकांना दुष्काळाचा फटका मोठ्या प्रमाणात बसतो. नुकसानभरपाई मिळाल्यास शेतकऱ्यांना तेवढाच आधार मिळू शकतो.

 

45 हजारांचं पॅकेज

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी साताऱ्यात या पॅकेजबद्दल सविस्तर माहिती दिलीय. 50 पैशापेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांना फळबागांसाठी केंद्राकडून हेक्टरी 30 हजार रुपये, तर राज्याकडून 15 हजार रुपये असे एकूण 45 हजार रुपये प्रती हेक्टरी मिळतील. कृषी विभागाची ही योजना आहे. त्याचा प्रमुख मी आहे, त्यामुळं प्रस्ताव मंजूर होण्याबाबत काही अडचण येईल, असं मला तरी वाटत नाही, अशा शब्दात त्यांनी आश्वस्त केलंय.
टॅंकरनं पाणी देऊन डाळिंब बागा वाचवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खास अनुदान गेल्या वर्षीपासून देण्यात येत आहे. केंद्र सरकारनं यासाठी मोठी तरतूद केली आहे. तरी डाळिंब बागायतदारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याकडं मागणी करावी, असं आवाहन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केलंय.

 

 

या जिल्ह्यांना होईल फायदा...
सोलापूर, सांगली, पुणे, सातारा, उस्मानाबाद, बीड, जालना, परभणी, नगर, लातूर, औरंगाबाद, नाशिक या जिल्ह्यांतील फळबागा वाचवण्यासाठी या दुष्काळी अनुदानाचा शेतकऱ्यांना फायदा होईल.

drought 4

 

दुष्काळी जिल्हा निहाय फळपिकं-
सोलापूर- डाळिंब, द्राक्ष, केळी, बोर
सांगली- डाळिंब, द्राक्ष
पुणे- केळी, द्राक्ष, डाळिंब, अंजिर
सातारा- डाळिंब, द्राक्ष, केळी
नगर- डाळिंब, लिंबू, द्राक्ष, पेरू
जालना- मोसंबी, आंबा, लिंबू
लातूर- द्राक्ष, डाळिंब, आंबा
उस्मानाबाद- डाळिंब, लिंबू, द्राक्ष, आंबा

 

पूरक माहिती
* राज्यात 15 लक्ष हेक्टर क्षेत्र फळपिकाखाली आहे.
* गेल्या दशकात फळबाग लागवड क्षेत्रात 300-400 टक्क्यांनी वाढली.
* 1991 पासून फळबाग क्षेत्रात लक्षणीय वाढ
* राज्यातील एकूण द्राक्ष, डाळिंब आणि केळी क्षेत्रापैकी 90 टक्के वाटा पश्चिम महाराष्ट्राचा
* टॅंकरनं पाणी देऊन डाळिंब बागा वाचवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खास अनुदान

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.