टॉप न्यूज

यंदाचं बजेट म्हणतंय, खेड्यांकडे चला!

ब्युरो रिपोर्ट, नवी दिल्ली
'खेड्यांकडं चला' या महात्मा गांधींजींच्या संदेशाला पुन्हा एकदा उजाळा देऊन तो आचरणात आणण्याचा प्रयत्न बजेटच्या माध्यमातून केंद्रातल्या काँग्रेस आघाडी सरकारनं केलाय. यंदाच्या बजेटमध्ये ग्रामीण विकासासाठी 80 हजार कोटींची तरतूद केल्याची घोषणा अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर करताना केली. ग्रामविकासासाठीच्या निधीत या बजेटमध्ये 40 टक्‍के वाढ करण्यात आलीय.

 

ग्रामीण विकासाची दिशा

ग्रामीण भागाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत 46 टक्क्यांची जादा तरतूद करण्यात आलीय. मनरेगासाठी 33 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. अधिकाधिक खेडी शहरांना जोडली जावीत, पर्यायानं त्यांच्या विकासाला चालना मिळावी म्हणून पंतप्रधान सडक योजना यापुढंही सुरू ठेवण्यात येणार आहे. ग्रामीण विकासाच्या दृष्टीनं सुरू असलेल्या अनेक योजना सुरूच ठेवण्याचं आश्वासनही अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं दिलंय. त्यानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरूच ठेवण्यात आलं आहे. त्याअंतर्गत वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी विशेष तरतूद करण्यात आलीय. त्याचबरोबर होमिओपॅथी, नॅचरोपॅथी आणि आयुर्वेद संशोधनाला प्राधान्य देण्यात येणार आहे.   

 

Melghat 5दलित विकासासाठी 41 हजार कोटी
राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेतून आणखी 3.70 लाख गावांमध्ये वीज उपलब्ध करून देण्याची घोषणा चिदंबरम यांनी यावेळी केली. दलित विकासासाठी 41 हजार कोटींची तरतूद करण्यात आलीय.  

 

शैक्षणिक सुविधांवर भर
ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधांवर यंदा भर देण्यात आलाय. बहुचर्चित शालेय पोषण आहार योजनेसाठीची तरतूद सुमारे दोन हजार कोटींनी वाढवून ती 13 हजार कोटींवर नेण्यात आलीय. तर सर्व शिक्षण अभियानासाठी ग्रामीण भागातील घरबांधणी निधी दोन हजार कोटींनी वाढवून सहा हजार कोटी केला.

 

Melghat 10जलसंधारणावर पाच कोटींची तरतूद
देशातील अनेक भागांत सध्या दुष्काळाची समस्या भेडसावतेय. त्यावर मात करण्यासाठी जलसंधारणावर पाच कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलीय.


जागतिक मंदी, आर्थिक तूट आणि महागाई यांचं आव्हान देशासमोर असतानाही देशानं चांगला विकासदर साधलाय. चीन आणि रशियाचा अपवाद वगळता भारताच्या आर्थिक प्रगतीची घोडदौड जोरदार सुरू असल्याचं चिदंबरम यांनी आवर्जून नमूद केलंय.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.