टॉप न्यूज

महिलांसाठी होणार सरकारी बॅंक

ब्युरो रिपोर्ट, नवी दिल्ली
बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सबल करण्याचा प्रयत्न सुरू असताना आता देशात महिलांसाठी सरकारी बँक उभी राहणार आहे. बँकेसाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून ऑक्टोबरपर्यंत ही बँक सुरू होणारंय. अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी संसदेत बजेट सादर करताना ही घोषणा करून महिला क्रांतीचा नारा दिला.  

Melghat stalantar 10

 

महिला सबलीकरण
महिला सबलीकरण आणि महिलांची सुरक्षितता यांवर विशेष भर देत त्यादृष्टीनं तरतुदी वाढवण्यात आल्यात. बचत गटांसाठीच्या तरतुदी वाढवण्यात आल्यात. मोलकरणींसाठी समूह गट विमा योजना सुरू करण्याची घोषणा झालीय. यामुळं महिलांचे छोटे-छोटे उद्योग वाढीस लागतील आणि त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.

महिला, युवक आणि गरीब हे देशाचे तीन मुख्य चेहरे आहेत, असं सांगत अर्थमंत्र्यांनी महिला सबलीकरणावर भर दिलाय. महिलांच्या सुरक्षेकडं विशेष लक्ष देण्याची गरज अधोरेखित करून त्यासाठी खास 200कोटींची तरतूद करून 'निर्भय योजना' जाहीर केलीय. गावातील पाणी, शौचालय, आरोग्य सुविधांसाठी 20 हजार कोटींची तरतूद झालीय. त्यामुळं महिलांचं राहणीमान सुधारेल, असा विश्वास सरकारला वाटतोय.

 

महिला विकास आणि कल्याण
महिला विकास आणि कल्याणासाठी २००० कोटी रुपयांची अतिरिक्त व्यवस्था यंदाच्या बजेटमध्ये करण्यात आलीय. याशिवाय महिलांसाठी वेगळ्या ९७ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचंही चिदंबरम यांनी भाषणातून सांगितलं. महिला आणि बालकल्याणासाठी ४१ हजार कोटींची, तर इंदिरा आवास योजनेसाठी १५,१८४ कोटींची तरतूद करण्यात आलीय. हा सर्व पैसा विविध योजनांच्या माध्यमातून खर्च करण्यात येईल, असंही चिदंबरम यांनी सांगितलंय.

 

आदिवासींसाठी योजना
मागील वर्षापेक्षा 12.5 टक्क्यांनी आदिवासी विकासदरात वाढ करत आदिवासींसाठी 25 हजार कोटींची योजना जाहीर केलीय आणि इंदिरा आवास योजनेसाठी १५,१८४ कोटींची तरतूद आहे, तसंच महिलांसाठी आनंदाची बातमी अशी की, एक लाख रुपयांपर्यंतचं सोनं परदेशातून आणताना ड्युटी आकरण्यात येणार नाही.

काय झालं महाग
सेट टॉप बॉक्‍स
वातानुकूलित हॉटेलमधील जेवण
2,000 रुपयांवरील मोबाईल हॅण्डसेट

स्पोर्टस् युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही)
इम्पोर्टेड गाड्या
800 सीसी आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या इम्पोर्टेड दुचाकी

इम्पोर्टेड यॉट आणि मोटारबोट्‌स
 सिगारेट
 50 लाखांहून जास्त किमतीच्या स्थावर मालमत्तेची विक्री
 2,000 चौरस फुटांपेक्षा जास्त आकाराच्या किंवा एक कोटीपेक्षा जास्त किमतीची घरं
 फ्लोअरिंगसाठी संगमरवर
 आयात केलेल्या कच्च्या मालापासून तयार झालेले रेशमी कपडे

 

काय होणार स्वस्त
ब्रॅंडेड कपडे
 मौल्यवान खडे
 साबुदाणा
 ट्रकच्या चासी

 

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.