टॉप न्यूज

कुठलं शहर होणार 'स्मार्ट सिटी'?

ब्युरो रिपोर्ट, मुंबई
दिल्ली-मुंबई कॉरिडॉरवर एक गुजरातेत आणि एक महाराष्ट्रात स्मार्ट सिटी उभारण्यासाठी बजेटमध्ये विशेष तरतूद करण्यात आलीय. यामुळं महाराष्ट्रातील पाच ते दहा लाख लोकसंख्येचं एक शहर ऑस्ट्रेलियातील स्मार्ट सिटीसारखंच चकाचक होण्याचा मार्ग मोकळा झालाय. या योजनेसाठी आता कोणत्या शहराचा नंबर लागणार याची उत्सुकता सर्वत्र आहे. कोल्हापूर आणि सातारा शहर या योजनेतून स्मार्ट सिटी करावं, असा प्रस्ताव राज्य सरकारकडं यापूर्वीच दाखल झालाय.


Mumbai Cityऑस्ट्रेलियातील ऑस्ट्रिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या तांत्रिक सहकार्यानं सुरुवातीच्या टप्प्यात सर्व राज्यांतील दोन शहरं ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित करणार असल्याचं केंद्रीय नगर विकास मंत्री कमलनाथ यांनी ऑक्टोबरमध्येच जाहीर केलं होतं. बजेटमध्ये तरतूद झाल्यानं किमान दोन शहरं तरी स्मार्ट सिटी होण्याचा मार्ग मोकळा झालाय.

 

ऑस्ट्रेलिया, जपान या देशांनी स्मार्ट सिटी बनवण्यासाठी कंबर कसलीय. त्यामुळं 2020 पर्यंत या देशातील मोठी शहरं चकाचक बनतील. शिवाय सौर आणि पवन ऊर्जा यांच्या वापरामुळं कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण शून्यापर्यंत खाली आणून प्रदूषणविरहित एक वेगळीच जीवनशैलीच अनुभवायला मिळेल, असा दावा या देशांनी केलाय. आजपर्यंतचं काम पाहता तो बहुतांश प्रमाणात यशस्वीही होताना दिसतोय. या पार्श्वभूमीवर हा स्मार्ट सिटी प्रोजेक्ट भारतात साकारणार आहे. त्याला यश आल्यास नजीकच्या काळात भारतातील शहरंही टप्प्याटप्प्यानं स्मार्ट सिटी बनण्याचा मार्ग मोकळा होईल.‘स्मार्ट सिटी’ मध्ये पुढील गोष्टींचा समावेश असेल...
अत्याधुनिक परिवहन सेवा
पर्यावरणाला अनुकूल प्रकल्प
चकाचक रस्ते
ब्रॉड बँडची सुविधा
रेन वॉटर हार्वेस्टिंग


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.