टॉप न्यूज

...आता चळवळ पाण्याच्या हक्कासाठी!

ब्युरो रिपोर्ट, सांगली (खानापूर)
पाणी म्हणजे जीवन! तेच जर नसेल तर माणसाला जगताच येत नाही. सध्याचा दुष्काळ पाण्याचाच. दुष्काळग्रस्त भागातील जनतेला इतर खर्चांसाठी सोडाच, प्यायलाही पुरेसं पाणी मिळेनासं झालंय. पाण्याअभावी माणसांच्याच जीवनमरणाचा प्रश्न उभा राहिलाय, तिथं पिकं, जित्राबांची काय कथा? महाराष्ट्र युवक काँग्रेसनं दुष्काळग्रस्तांच्या या व्यथा जाणून घेऊन त्यांना धीर देण्यासाठी नुकतीच 'बुलडाणा ते सांगली' अशी पदयात्रा काढली. त्याच्या समारोप प्रसंगी 'राईट टू वॉटर' म्हणजेच पाण्याचा हक्क, असा नारा देत त्यासाठी चळवळ उभारण्याची घोषणा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांनी केलीय.
 

25 दिवसांची पदयात्रा
दुष्काळग्रस्तांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांना आधार देण्यासाठी राज्य युवक काँग्रेसतर्फे 25 दिवसांची पदयात्रा काढण्यात आली. बुलडाणा इथून 13 फेब्रुवारीला सुरू झालेल्या या पदयात्रेचा समारोप 5 मार्चला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भिवघाटात (ता. खानापूर, जि. सांगली) झाला. बुलडाणा, जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा आणि सांगली हे आठ जिल्हे या पदयात्रेनं पालथे घातले. दररोज सरासरी 25 याप्रमाणं सुमारे 507 किलोमीटरची पायपीट युवकांनी केली. त्यातून पाण्याअभावी विस्कटलेलं माणसाचं जीवन युवक नेत्यांना जवळून पाहता आलं. त्यातूनच या 'राईट टू वॉटर' या चळवळीनं मनात आकार घेतल्याचं विश्वजीत कदम यांनी सांगितलंय.

 


Right to Water 8'राईट टू वॉटर'मागील भूमिका
माहितीचा, शिक्षणाचा अधिकार मिळण्यासाठी चळवळ उभी राहिली. याशिवाय इतर अनेक महत्त्वपूर्ण अधिकार मिळवण्यासाठी चळवळी उभ्या राहिल्या. पण, पाण्याच्या हक्कासाठी चळवळ उभी राहिलेली नाही. याकडे त्यांनी लक्ष वेधलंय. आता महायुद्ध झालं तर ते पाण्यासाठी होईल, असं म्हटलं जातं. इतकं पाणी महत्त्वाचं झालं असताना मग ते प्रत्येकाच्या हक्काचं का होऊ नये, असा सवालही विश्वजीत कदम यांनी केलाय. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण ही चळवळ काँग्रेसचे नेते, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत. यासाठी काँग्रेसची 'यंग ब्रिगेड' आता कामाला लागल्यानं केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात लवकरच चळवळ उभी राहील आणि 'राईट टू वॉटर' प्रत्यक्षात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

 


Right to Water 7फळबागांसाठी बिनव्याजी कर्ज – मुख्यमंत्री
दुष्काळी स्थितीत फळबागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्याची योजना राज्य शासनाच्या विचाराधीन असल्याचं सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दुष्काळग्रस्तांसाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. येत्या अर्थसंकल्पात रोजगार हमी योजनेची मजुरी प्रतिदिन 145 रुपयांवरून 162 रुपये, चारा छावण्यांतील मोठ्या आणि लहान जनावरांसाठी दिलं जाणारं अनुदान प्रतिदिनी अनुक्रमे 80 आणि 40 रुपये करण्याचं सूतोवाचही त्यांनी केलं.

 


पाणी कुठून आणायचं?
राज्यातील दहा हजार गावांमध्ये 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी आहे. मात्र तरीही आणेवारी विचारात न घेता मागेल त्याला टॅंकरनं पाणीपुरवठा आणि छावण्यांची सोय उपलब्ध करून देण्याचे आदेश दिलेत. गतवर्षी या महिन्यात 230 गावांत टॅंकर होते; सध्या 2,136 गावांत टॅंकर सुरू आहेत. त्यावर 415 कोटी रुपये खर्च झालेत. यावरूनच दुष्काळाची तीव्रता लक्षात यावी. या कामांवर कितीही खर्च आला तरी राज्य शासन निधी कमी पडू देणार नाही. प्रसंगी ट्रक-बैलगाड्यांमध्ये टाक्‍या ठेवून पाणी पुरवण्याचे आदेश दिले आहेत. प्रश्‍न आहे, तो पाणी कुठून आणायचं? अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपली काळजी यावेळी मांडली.

 


Right to Water 1झाडून साऱ्या काँग्रेस मंडळींची उपस्थिती
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव सातव, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रभारी हिंमतसिंग, प्रदेश उपाध्यक्ष सत्यजीत तांबे, या यंग ब्रिगेडसह पालकमंत्री पतंगराव कदम, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, रोजगार हमी आणि जलसंधारण मंत्री नितीन राऊत, युवक कॉंग्रेसचे राजीव सातव, आमदार सदाशिवराव पाटील, जयकुमार गोरे, प्रशांत ठाकूर, माजी मंत्री मदन पाटील, मोहनराव कदम, पृथ्वीराज पाटील यावेळी उपस्थित होते.

 

Right to Water 2युवक काँग्रेसचं मागणीपत्र
संवाद यात्रेचे मुख्य निमंत्रक विश्‍वजीत कदम यांनी दौऱ्यात आलेल्या अनुभवाच्या आधारे युवक काँग्रेसतर्फे राज्य सरकारकडं मागणीपत्र सादर केलं. त्यातील ठळक मागण्या अशा...

 

* दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची वीजबिलं माफ करावीत

* बाहेरगावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची फी माफ करावी

* रोहयो मजुरी 175 रुपये करावी

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.