टॉप न्यूज

मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन महोत्सव

मुश्ताक खान, मुरूड, रत्नागिरी
कोकणातली पर्यटन स्थळं जागतिक स्तरापर्यंत पोहोचावीत, त्याचबरोबर स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी रत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. १५ ते १७ मार्च दरम्यान चालणाऱ्या या महोत्सवात कोकणी खाद्य संस्कृती आणि लोककलेचा आस्वाद पर्यटकांना घेता येणार आहे. या महोत्सवाचं उदघाटन जिल्ह्याचे पालकमंत्री भास्कर जाधव यांच्या हस्ते झालं.

 

Kasav Dolphin Mahotsav 4.pngलोककलांची मेजवानी

राज्याचा सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सुवर्णदुर्ग पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं होणाऱ्या या महोत्सवात पतंग उत्सव, आकाश कंदील सोडणं, डॉल्फिन सफारी, कासव दर्शनाची (वेळास) मजा पर्यटक अनुभवत आहेत. त्याचबरोबर कासव नृत्य, पालखी नृत्य, कोळी नृत्य, जाखडी, नमन, रावण नाचवणं, टिपरी नृत्य, काटखेळ या लोककलांची मेजवानीही आहे.

 

या महोत्सवाचा सगळ्यात चर्चेचा विषय म्हणजे क्रिकेटर दिलीप वेंगसरकर इलेव्हन विरुद्ध रत्नागिरी जिल्हा क्रिकेट संघादरम्यान होणारा सामना. दुसऱ्या दिवशी होणाऱ्या या सामन्याच्या वेळी पर्यटनमंत्री छगन भुजबळही उपस्थित राहणार आहेत.

 

कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सव, मुरूड वेळास बीच कार्यक्रमपत्रिका


hatchlings to seaशुक्रवार दिनांक
१५ मार्च २०१३
सकाळी ७.०० ते १२.०० - डॉल्फिन सफारी आणि वॉटर स्पोर्टस् (मुरूड बीच), पतंग उत्सव
दुपारी ३.०० ते ५.०० – शोभायात्रा सोबत झांजपथक (दापोली ते मुरूड)
सायंकाळी ५.०० ते ५.३० – दुर्गापूजा
सायंकाळी ५.३० ते ७.०० – उदघाटन सोहळा
सायंकाळी ७.०० ते ८.०० – आकाश कंदील सोडणं
रात्री ८.०० ते ११.०० – सांस्कृतिक कार्यक्रम (कासव नृत्य, पालखी नृत्य, कोळी नृत्य, कलापथके)
सायंकाळी ११.०० – पहिल्या दिवसाचा समारोप

 


2985517685 9c94b07722 zशनिवार दिनांक – १६ मार्च २०१३

सकाळी ४.०० – कासव महोत्सवासाठी वेळासला प्रयाण
सकाळी ६.०० ते ७.०० – कासव महोत्सव (वेळास बीच)
सकाळी ७.०० ते १२.०० – डॉल्फिन सफारी आणि वॉटर स्पोर्ट्स (मुरूड बीच)
सकाळी ९.०० ते १२.०० – महिला बीच कबड्डी स्पर्धा (मुरूड बीच)
सकाळी ९.०० ते दुपारी १.०० – वेळास – मुरूड परतीचा प्रवास (केळशी बीच, महालक्ष्मी मंदिर, आडेपाडले बीच, कड्यावरचा गणपती, आंजर्ले, हर्णे बीच दर्शन)
दुपारी ३.३० – पतंग उत्सवाचं पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन
दुपारी ४.०० ते ७.०० - वेंगसरकर इलेव्हन X रत्नागिरी जिल्हा क्रिकेट संघ सामना
सायंकाळी ७.३० ते १०.३० – हिंदी आणि मराठी गाण्यांचा बहारदार ऑर्केस्ट्रा वेंगसरकर इलेव्हन X रत्नागिरी जिल्हा क्रिकेट संघ सामना
रात्री १०.३० ते ११.०० – दुसऱ्या दिवसाचा समारोप

 

Kasav Dolphin Mahotsav 6.pngरविवार दिनांक – १७ मार्च २०१३
सकाळी ४.०० – कासव महोत्सवासाठी वेळासला प्रयाण
सकाळी ६.०० ते ७.०० – कासव महोत्सव (वेळास बीच)
सकाळी ७.०० ते १२.०० – डॉल्फिन सफारी आणि वॉटर स्पोर्ट्स (मुरूड बीच)
सकाळी ९.०० ते दुपारी १.०० – वेळास – मुरूड परतीचा प्रवास (केळशी बीच, महालक्ष्मी मंदिर, आडेपाडले बीच, कड्यावरचा गणपती, आंजर्ले, हर्णे बीच दर्शन)
दुपारी ३.०० ते ५.०० – मुरूड दर्शन
सायंकाळी ५.०० ते ७.०० – बीच क्रीडा स्पर्धा (व्हॉली बॉल, पतंग उत्सव, रस्सीखेच स्पर्धा)
सायंकाळी ७.०० ते ७.३० – तिसऱ्या दिवसाचा उदघाटन सोहळा
सायंकाळी ७.०० ते १०.३० – सांस्कृतिक कार्यक्रम (नमन, भजन, रावण नाचवणं, पालखी नृत्य, जाखडी नृत्य, काटखेळ, मंगळागौरीचे खेळ, टिपरी नृत्य आदी)
रात्री १०.३० ते ११.०० – कासव, डॉल्फिन महोत्सवाचा समारोप

 

 

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.