टॉप न्यूज

कवितेला मिळतंय जागतिक परिमाण

राहुल रणसुभे, मुंबई
21 मार्च हा दिवस जागतिक काव्य दिन म्हणून साजरा केला जातो. 1999 मध्ये पॅरिसमध्ये भरलेल्या युनेस्कोच्या तिसाव्या अधिवेशनात हा दिवस घोषित करण्यात आला. त्या तारखेला तसा काही विशेष संदर्भ होता अशातला भाग नाही. हा दिवस साजरा करण्यामुळं जागतिक राष्ट्रीय तसंच प्रांतीय पातळीवर कवितेचा प्रचार, प्रसार करत विविध भाषा उपक्रमांना नवचैतन्य देता येईल, असा यामागे उद्देश होता. गेल्या 14 वर्षांचा आढावा घेता हा उद्देश कितीतरी प्रमाणात साध्य झाल्याचं पहायला मिळतं. 

 all photo

युनेस्कोनं यानिमित्तानं जागतिक प्रसिध्दी लाभलेले विल्यम बटलर यीस्ट, पाबलो नेरूडा यांच्या कावितांना उजाळा दिलाय. 'भारत4इंडिया'नं मराठीतील काही ख्यातनाम तर काही नवोदित कवींना एकत्र आणून ही काव्यमैफल जमवलीय, खास तुमच्यासाठी...

 

04ashokनांदेड इथं आयोजित कवी संमेलनात ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, फ. मु. शिंदे व सुरेश शिंदे यांची काव्य मैफल चांगलीच रंगली. या मैफलीत तीघांनीही आपापल्या कवीता अगदी खुमासदार पध्दतीत सादर करुन रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. यामध्ये अशोक नायगावकरांनी पुणेकरांची विविध उदाहरणं देत रंजक किस्से रसिकांना सांगितले. पुणेकर किती बुद्धिमान आहेत, या शब्दात पुणेकरांवर आपल्या खास शैलीत भाष्य करून प्रेक्षकांमध्ये हशा पिकवला.
निवृत्त नोकरांचे बघं काय हाल झाले..
काही पिण्यात गेले, काही पुण्यात गेले...

कविता ऐकण्यासाठी इथं क्लिक करा...  clickhere

 

 

त्याच बरोबर कवी कसा वैश्विक आहे, हे सुद्धा वेगवेगळी उदाहरणं देऊन नायगावकरांनी स्पष्ट केलं.
तापल्या सुर्यास थकल्या, मी दिला वाटेत लिम्का..
सागराला अंग पुसण्या, मी दिला टॉवेल माझा...

कविता ऐकण्यासाठी इथं क्लिक करा...  clickhere

 

08fm shindeतर याच कवी संमेलनात प्रसिध्द कवी फ. मु. शिंदे यांनी लोकशाहीवर भाष्य करणारी ''हे राज्य कुणाचं आहे?'' ही कविता सादर केली.
'राज्य म्हणे जनतेचे, जो जो करील त्याचे
'कधी तरी लोकशाहीचे, अन्यथा शाही लोकांचे'

कविता ऐकण्यासाठी इथं क्लिक करा...  clickhere14 suresh shindeसुरेश शिंदेंनी या कवी संमेलनात सरकारच्या शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांवर आपल्या कवितेतून प्रकाश टाकला. त्या योजना कधी शेतकऱ्यांच्या फायद्याच्या, तर कधी तोट्याच्या असतात. अशाच सरकारच्या एका योजनेवर आपल्या खास शैलीत त्यांनी भाष्य केलंय.
'ज्वारी, बाजरी, मकेला पोत्यातच फुटलं हसू'
'म्हणाल्या आपण तिघी मैत्रिणी, आता रंगीत बाटलीतच बसू'

कविता ऐकण्यासाठी इथं क्लिक करा...  clickhere

 


चिपळूण इथं झालेल्या ८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात नामवंत कवींसोबतच अनेक नवोदित कवींनीही मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवला. या कवींच्या काही कवितांनी रसिक प्रेक्षकांच्या मनात कायमचं घरही केलं. अशाच काही कवितांची ही मेजवानी...

कोकण मराठी साहित्य संमेलनात पहिला दिवस हा मान्यवर कवींच्या कवितांनी रंगला. त्यात कवी अरुण म्हात्रे, ए. के. शेख, महेश केळूस्कर आदी मान्यवर कवींनी आपल्या कविता सादर केल्या.

कविता ऐकण्यासाठी इथं क्लिक करा...  clickhere09 indrajeet bhaleraoकवी इंद्रजित भालेराव यांनी आपल्या कवितेतून कष्टकरी समाजातील आईच्या आयुष्याचं यथार्थ दर्शन घडवलं. 
दो जीवाची माय मही गेली दूरच्या शेताला
पोटापाण्याच्या ओढीनं जीव कामात गुंतला...

कविता ऐकण्यासाठी इथं क्लिक करा...  clickhere

 

15 vijay avhadकवी विजय आव्हाड यांनी सद्याच्या महागाईवर आपल्या कवीतेतून भाष्य करत जगातील पैशाचं महत्त्व तसंच बदलतं रूप आपल्या शब्दात मांडलंय.
"जग हे पैशाभोवती फिरतं, आणि गरीब पोटाभोवती..."

कविता ऐकण्यासाठी इथं क्लिक करा...  clickhere

 

03ashok bagveपहाटेची वेळ ही अत्यंत मनोहारी असते. या अशाच एका पहाटेचं वर्णन कवी अशोक बागवे यांनी आपल्या कवितेतून केलंय.
"नदीच्या किनारी, नदीला म्हणावे,
तुझे पूर माझ्या नसातून यावे"

कविता ऐकण्यासाठी इथं क्लिक करा...  clickhere13 sanjay ingaleकवी संजय इंगळे-तिगावकर यांनी वडील-मुलीमधल्या नात्यांची गुंफण लक्षात घेऊन एका मुलीच्या आपल्या वडिलांबाबतच्या अपेक्षांचं वर्णन आपल्या कवितेतून केलयं

तू सांग माझ्या मुली, तुला काय आवडतं...

कविता ऐकण्यासाठी इथं क्लिक करा...  clickhere12 sai lalitनिवडणुकीच्या काळात दारात आलेल्या राजकीय उमेदवाराला पाहून एका वहिनीबाईंच्या मनातील भावना कवयित्री सई लळीत यांनी आपल्या कवितेतून सादर केलीये.

'तशी त्यांची काय कटकट नाय..."

कविता ऐकण्यासाठी इथं क्लिक करा...  clickhere07durgesh sonarकवी दुर्गेश सोनार यांनी गावाकडं होणार लोडशेडिंग आणि त्यावरची राजकारण्यांची खोटी आश्वासनं या परिस्थितीवर आपल्या कवितेतून भाष्य केलंय.
"भार नियमनाचा भार पेलत, कंदील चिमणीला म्हणाला,
चला बरे झाले, यानिमित्तानं जुने दिवस परत आले."

कविता ऐकण्यासाठी इथं क्लिक करा...  clickhere
10 pradeep patilकवी प्रदीप पाटील यांनी समाजाला जागृत करणाऱ्या संतांचे दाखले देऊन सर्व लोकांना मानवतेचा संदेश देणारी कविता सादर केली.
“ज्यांचे कष्ट वारेमाप, त्यांची स्वप्नं मातीमोल,
कितीही खणत गेले तरीही, कधी लागत नाही ओल.”

कविता ऐकण्यासाठी इथं क्लिक करा...  clickhere02arun mhatre1माणसाचं वय वाढत असलं तरीही त्याच्या मनात काही विषयांबाबतची उत्कंठा कायम राहते अशाच काही उत्कंठा कवी अरुण म्हात्रे आपल्या या कवितेतून सादर केल्या आहेत.
" छातीत फुले फुलण्याची, वाऱ्यावर मन झुलण्याची,
ती वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे"

कविता ऐकण्यासाठी इथं क्लिक करा...  clickhere

 

16 vilas kuvalekarआपल्या लहानपणीच्या आईसोबतच्या आठवणींबाबत कवी विलास कुवळेकर यांनी आपल्या कवितेतून गतकाळाला उजाळा दिला.
एकेकाळी सुखात होतो
माय आम्हाला सांगत होती..

कविता ऐकण्यासाठी इथं क्लिक करा...  clickhere

 

06dnyaneshwarकवी ज्ञानेश्वर झगडे यांनी कोकणी माणसाच्या मनातील कोकणच्या माती विषयीचं नातं आपल्या कवितेतून व्यक्त केलंय
आम्ही कोकणचं राजं वनवासी...
आमचं जुनं नातं लाल मातीशी

कविता ऐकण्यासाठी इथं क्लिक करा...  clickhere

 

11 madhusudanकवी मधूसुदन नानिवडेकरांनी सादर केलेल्या या कवितेत भीषण पाणीटंचाईवर भाष्य करत जणू पाण्याचा जागर केलाय.
पाणवठ्यांनो रडू नका हे झरे आटले,
अर्धी-मुर्धी भरली घागर हरकत नाही...

कविता ऐकण्यासाठी इथं क्लिक करा...  clickhere

 

01anuja joshiकवयित्री अनुजा जोशी यांनी सादर केलेल्या कवितेत पर्यावरणाच्या माध्यमातूत प्रेमाची भावना व्यक्त केलीये.
मी वडाला फेऱ्या घालत नाही वड मला घालतो
म्हणतो माझ्या आयुष्याचे झाड तू...

कविता ऐकण्यासाठी इथं क्लिक करा...  clickhere

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.