टॉप न्यूज

भीमगीतांना जोड सोशल नेटवर्किंगची

राहुल रणसुभे, मुंबई
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 122 वी जयंती आज सर्वत्र उत्साहानं साजरी होतेय. बाबासाहेबांच्या विचारांचा खरा अंगार पेटवला तो आंबेडकरी जलसा आणि भीमगीतांनी. आजच्या इंटरनेटच्या जमान्यातही भीमगीतांची धून कायम असून त्याला आता सोशल नेटवर्किंगची जोड मिळालीय. आंबेडकरी विचारांच्या समतेची पताका खांद्यावर घेतलेली तरुणाई नेटानं सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून आंबेडकरी विचारांचा प्रसार करत असते. चर्चा घडवून आणत असते. यामुळं समाजातील विविध विचारप्रवाहातील मंडळींचा आंबेडकरी विचारांच्या चळवळीतील सहभाग वाढलाय.

 baba 22

दादरच्या इंदू मिलच्या जागेत डॉ. आंबेडकरांचं जागतिक दर्जाचं स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाल्यानं यंदा जयंतीचा उत्साह खूपच मोठा आहे. रस्त्यांवर लावलेले भव्य फलक, वृत्तपत्रांतून राजकीय पक्षांच्या जयंतीनिमित्तानं दिलेल्या जाहिराती, तसंच बाबासाहेबांच्या चाहत्यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा, रॅली, मेळावे या सर्वांचीच गर्दी यंदा दिसून येत आहे. परंतु आता या आधुनिक जगातही आंबेडकर जयंती फक्त या फलक, वृत्तपत्र, पताके, पुतळे यांच्यापुरती मर्यादित न राहता जगानं मान्य केलेल्या सोशल नेटवर्किंग या व्हर्च्युअल जगातसुध्दा मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे. फेसबुक, टि्वटर यांसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर जयंतीच्या ३-४ दिवस आगोदरच बाबासाहेबांना अभिवादन करणारे फोटो, पोस्ट, गीतंही दिसत आहेत. त्यामुळं तरुण पिढी सामाजिक प्रश्नांपासून दूर चालली आहे, असा ओरडा करणाऱ्यांना हे एक चांगलंच उत्तर आहे.

 

imagesदिवसातील ८-८ तास सोशल नेटवर्किंगवर पडिक राहणारी ही तरुणाई त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रश्नांपासून थोडी दूरच असते. तसंच कॉम्प्युटर, इंटरनेट, स्मार्ट फोन यामुळं वाचनसंस्कृती संपुष्टात आली आहे, असाही आरडाओरडा अनेक लोक करत असतात. परंतु सोशल नेटवर्किंगवर येणारा मजकूर पाहता उलट या माध्यमांमुळं कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती देण्याचा एक चांगला उपक्रम राबवला जात आहे, आणि अशा महान लोकांच्या जयंती, पुण्यतिथीच्या निमित्तानं या महान पुरुषाच्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडींना या माध्यमांतून उजाळा मिळतोय.

 

यंदाच्या १४ एप्रिलच्या निमित्तानं बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक घडामोडींना, त्यांच्या विचारांना सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम होत आहे. गुरुवारपासूनच सोशल नेटवर्किंगवर बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वाचे क्षण दाखवणारे फोटो, त्यांची भाषणं, तसंच त्यांच्या दूरदृष्टीतील विचारांचा पाऊस या सोशल नेटवर्किंगवर दिसून येत आहे.


बाबासाहेबांचे फोटो

बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना, त्यांच्या विविध संस्थांना दिलेल्या भेटी, त्यांच्या कुटुंबीयांसोबतचे काही क्षण, त्यांच्या भाषणांची चित्रं, त्यांचे विविध राज्यातील, देशातील दौरे, तसंच तत्कालीन वृत्तपत्रात प्रसिध्द झालेले बाबासाहेबांचे अत्यंत दुर्मिळ फोटो, जे सामान्य जनतेपर्यंत अजून पोहोचले नव्हते, ते या सोशल नेटवर्किंगमुळं सर्वांपर्यंत पोहोचताहेत.

baba 11

औरंगाबादच्या मिलिंद कॉलेजच्या भूमिपूजन प्रसंगी आपल्या सहकाऱ्यांसमवेत बाबासाहेब

  

baba 9
घटना समितीच्या सदस्यांसोबतचा फोटो

 

baba 8
संत गाडगे महाराजांसोबतचा बाबासाहेबांचा फोटो

 

baba 7


baba 15बाबासाहेबांची भाषणं
जगभरात व्हिडिओसाठी प्रसिध्द असलेली वेबसाईट यू-ट्यूब यावर दिवसाला लाखो लोक भेटी देतात आणि आपापल्याजवळील विशेष व्हिडिओ इथं अपलोड करत असतात. अशाच काही लोकांनी, संस्थांनी बाबासाहेबांची अत्यंत दुर्मिळ अशी भाषणं यावर अपलोड केली आहेत. ही भाषणं ऐकण्यासाठी अनेक लोक या वेबसाईटला भेट देताहेत. तसंच या भाषणांच्या व्हिडिओच्या लिंक सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचवण्याचं कामही या सोशल नेटवर्किंग साईट्स करताहेत.
यामध्ये बाबासाहेबांच्या संसदेतील भाषणाला आतापर्यंत एक लाख अठरा हजार लोकांनी भेटी दिल्या.

 भाषण ऐकण्यासाठी इथं क्लिक करा. images


बाबासाहेबांच्या हिंदुत्ववादाविरोधातील मराठी भाषणाला आतापर्यंत ६९ हजार लोकांनी भेटी दिल्या आहेत.

भाषण ऐकण्यासाठी इथं क्लिक करा.  images 

 

 

बाबासाहेबांचे फेसबुकवरील पेजेस

baba 1बाबासाहेबांच्या चाहत्यांचा वर्ग खूपच मोठा, तसंच सर्व स्तरांमध्ये आहे. या सर्व चाहत्यांनी एकत्र येऊन आपले विचार एकाच ठिकाणी मांडावेत त्याचप्रमाणं आपले विचार त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी फेसबुकवर अनेक पेजेस सुरू करण्यात आले आहेत. या पेजेसवरील पोस्टच्या माध्यमांतून बाबासाहेबांच्या विचारांची देवाणघेवाण या गटांमध्ये होत असते. त्यामुळं या पेजेसला भेट देणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

 

उदा. Dr. Babasaheb Ambedkar या पुस्तकाच्या पेजला ४६,३८८ लोकांनी लाईक केलंय.

 

तर Dr. Babasaheb Ambedkar या नावानं सुरू असलेल्या पेजला १,४२,९४५ लोकांनी लाईक केलंय. 

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.