टॉप न्यूज

'आपलं कोकण माझी फ्रेम'

मुश्ताक खान
कोकण म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं इथलं निसर्ग सौंदर्य. या निसर्ग सौंदर्यात पावसाळ्यात अधिक भर पडते. पावसाळ्यात तर कोकणमध्ये निसर्गाचं नंदनवन पाहायला मिळते. आता पावसाळ्यात नटलेल्या आणि बरहलेल्या कोकणच्या दऱ्या-खोऱ्या, वाड्या-वस्त्या अगदी तुमच्या आमच्या भोवतालची रुपं टिपून ती जगासमोर आणण्याची संधी एका स्पर्धेच्या माध्यमातून मिळाली आहे.
 


रत्नागिरीच्या श्री इव्हेंट मॅनेजमेंटनं ‘आपलं कोकण माझी फ्रेम’ या फोटोग्राफी स्पर्धेची घोषणा केली आहे. एसएलआर, डीजीटल आणि मोबईल कॅमेऱ्यातून कोकण टिपत या स्पर्धेत देशातली कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकते पण अट एकच की, फोटो कोकणच्या पावसाळ्यात टिपलेला हवा. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी प्रवेश मोफत आहे.

 

रत्नागिरीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आघाडीवर असलेल्या ‘श्री इव्हेंट मॅनेजमेंट’च्यावतीनं या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. ही स्पर्धा रत्नागिरी – सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यातील ठिकाणांकरीताच आणि तीही पावसाळ्यात टिपलेल्या फोटोंकरिता मर्यादित आहे. पावसाळ्यातील कोकण या विषयाला अनुसरुन कोणताही फोटो या स्पर्धेत पाठवता येईल, अशी माहीती श्री इव्हेंट्सचे मुख्यसमन्वयक सचिन देसाई यांनी दिली आहे.

 

या स्पर्धेत एसएलआर, डीजीटल आणि मोबाईलवरुन काढलेले फोटो ई-मेलने पाठवता येतील. स्पर्धक या स्पर्धेकरिता कितीही फोटो पाठवू शकतो. मात्र एकावेळी एकच फोटो पाठवण्याची अटही आयोजकांनी ठेवली आहे. स्पर्धेला फोटोबरोबर ते कुठे टिपले आहे, स्वत:चे नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर देणं बंधंनकारक आहे. स्पर्धेसाठी पाठवलेले फोटो स्वत:च टिपलेले असावेत आणि त्यात कोणताही तांत्रिक बदल न करता पाठवायचे आहेत. याचबोरबर हे फोटो कोणत्या कॅमेऱ्याने आणि कोणत्या मोबाईलनं टिपली आहेत, याचाही उल्लेख ई-मेलमध्ये करणे बंधनकारक आहे, असे संयोजन समितीचे संदीप शिवलकर आणि पिंट्या साळवी यांनी स्पष्ट केले.

 

ही स्पर्धा तीन गटांत होत असल्याने तीन वेगवेगळे ई-मेल आयडी देण्यात आले आहेत. एसएलआर कॅमेरासाठी
This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. तर डीजीटल कॅमेरासाठी This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. आणि मोबाईलवरुन काढलेले फोटो This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या ई-मेल आयडीवर पाठवावीत, अशी माहिती
आयोजकांनी दिली. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी आपले फोटो 12 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत अपलोड करावेत. अन्यथा, फोटो ग्राह्य धरले जाणार नाहीत अशी माहिती सौरभ मुलष्टे यांनी दिली.

 

या स्पर्धेमध्ये बक्षिसांचीही लयलूट असणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना 20 हजार रुपयांची पारितोषिके आणि सन्मान चिन्हे देण्यात येणार आहेत.

 

एसएलआर गटातील बक्षिसे :

प्रथम क्रमांकाला –३००० रुपये व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांकाला – २००० रुपये व सन्मानचिन्ह
तृतिय क्रमांकाला – १०००रुपये व सन्मानचिन्ह

 

डिजीटल गटातील बक्षिसे :
प्रथम क्रमांकाला – २५०० रुपये व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांकाला – १५०० रुपये व सन्मानचिन्ह
तृतिय क्रमांकाला – १००० रुपये व सन्मानचिन्ह

 

मोबाईल गटातील बक्षिसे :
प्रथम क्रमांकाला – २००० रुपये व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांकाला – १००० रुपये व सन्मानचिन्ह
तृतिय क्रमांकाला – ५०० रुपये व सन्मानचिन्ह

 

स्पर्धेतील विजेता ठरलेला फोटो १९ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त जाहीर केला जाईल. त्याचबरोबर स्पर्धेत सहभागी झालेल्या निवडक फोटोंचं प्रदर्शनही आयोजित करणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं. लोकांना निसर्गाजवळ नेताना कोकणाच्या निसर्गाची विविध रुपं जगासमोर आणण्याचा हा एक प्रयत्न असल्यानं जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांनामार्फत करण्यात आलं आहे.

 

majhi frame logo

 


Comments (1)

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.