टॉप न्यूज

बाप्पांनाही झळ महागाईची!

ब्युरो रिपोर्ट, मुंबई/रत्नागिरी
 गणेशोत्सव आता उंबरठ्य़ावर आला असून बाप्पांच्या मूर्ती आणि सजावटीच्या साहित्याच्या स्टॉल्सनी राज्यभरातील बाजारपेठा फुलून गेल्यात. महागाईची झळ बाप्पांनाही बसली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत  किमती 25 ते 30 टक्क्यांनी वाढल्यात. त्यामुळं महागाईमोलाचा बाप्पा घरी नेताना भाविकांच्या खिशाला चाट बसणार आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिस, माती, रंग, मजुरी असे सर्वांचेच भाव वाढल्यानं भाववाढ अटळ होती, असं मूर्तीकार सांगतायत. त्यामुळं एकुणच गणेशोत्सवावर महागाईचं सावट असेल, हे आता स्पष्ट झालंय. पण, बाप्पा श्रद्धेचा विषय असल्यानं त्यांचं आगमन नेहमीप्रमाणं धडाक्यात होईल, एवढं नक्की!
 
 

राजस्थानहून मूर्ती विकण्यासाठी मुंबईत आलेल्या कुंभारांनी किंमती 25 ते 30 टक्क्यांनी वाढल्याचं मान्य केलं. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी प्लॅस्टर ऑफ पॅरीस तसंच रंगांच्या किंमती वाढल्यात. पीओपीच्या 20 किलोच्या एका बॅगमागे 20 रुपये वाढ झाली. त्यामुळं भाववाढ झाली. परंतु विविध गणेश मंडळं आतापासूनच मूर्तींची आकर्षकता पाहून गणेश मूर्तींसाठी बुकींग करीत आहेत. मूर्ती घेण्यामध्ये कसलाही फरक पडणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

aaa8cd3a-1a2f-4f5e-8fe4-e387cb36b441HiRes

 

पेण ब्रँडही महागला
गणपतीचा गाव म्हणून पेणची ओळख आहे. इथल्या मूर्तींच्या किंमतीही 30 टक्क्यांनी वाढल्यात.
सुरवातीला मातीच्या मूर्ती शाडूच्या झाल्या. नंतर त्यांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं रूप घेतलं ते पेणमध्येच. आज 'पेणचा गणपती' हा ब्रँड झालाय. पेणमध्ये गणपती मूर्ती तयार करण्याचा उद्योग फार जुना म्हणजे 100 वर्षांपूर्वीचा. इथल्या कारखान्यांमधून बनवण्यात येणाऱ्या ४० टक्के मूर्ती या रंग लावून पूर्ण तयार केल्या जातात तर 60 टक्के मूर्ती केवळ साच्यातून काढून कच्च्या रुपात पाठवल्या जातात. व मुंबई-पुण्यात गेल्यावर त्यांना रंगवले जाते. काही वेळा पेण आणि आजुबाजूच्या गावातील कारखान्यांमध्ये येथील कच्च्या मूर्ती नेऊन मग रंग लावण्याचे काम होते. पेणबरोबरच पंचक्रोशीतील हमरापूर, तांबडशेत, जोहे, शिर्की, कळवा, कणे, वडखळ, गडब, कासू, भाल अशा गावांमध्ये कारखान्यांची संख्या वाढू लागलीय.

 

कोकणातही बसलाय फटका
कोकणात गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावानं आणि जल्लोषात साजरा केला जातो. सध्या बाजारात आलेल्या मूर्त्यांच्या किंमती 25-30 टक्क्यांनी वाढल्यात. गेल्या वर्षी ज्या मूर्तीसाठी 500 ते 600 रुपये माजावे लागत होते त्यासाठी यंदा हजारभर रुपये मोजावे लागतायत. चार फुटांची मूर्ती जी 3000 रुपयांना मिळायची त्यासाठी 3500 ते 3700 रुपये मोजावे लागतायत. साडेपाच फुटांची मूर्ती सहा हजाराला मिळत होती त्यासाठी साडेसात हजार रुपये मोजावे लागतायत. थोडक्यात प्रती फूट जवळपास 500 रुपयांची ही वाढ आहे. महागाई जरी प्रचंड वेगानं वाढत असली तरी मूर्तीकारांनी त्या तुलनेत भाव वाढ कमीच केल्याचं मूर्ती उत्पादक आणि विक्रेत्यांच म्हणनं आहे.

Idol-of-Ganesh

 

विदर्भात चारपट वाढ
विदर्भात 'बाप्पा' चारपट महागल्याने भाविकांच्या खिशाला चाट पडणार आहे. मूर्तिकारांनीही दरवर्षीच्या तुलनेत निम्म्याच मूर्त्यांची निर्मिती केलीय. मूर्ती रंगविण्याकरीता वॉटर कलर ऐवजी इंग्लिश कलरचा करावा लागतो. या रंगाच्या किंमती सर्वाधिक आहेत. मूर्ती रंगविण्याकरिता लागणारे ब्रश महागलेत. मेटॅलिक कलर १५ ते २० पटीनं महागलेत. त्यामुळं किंमती वाढल्या, असं मूर्तीकार सांगतायत. चार फुट उंचीच्या मूर्तीची किंमत चार हजार तर लहान बैठ्या मूर्तींच्या किंमती १०० ते २०० रुपयांपासून पुढे आहेत.

 

गोवेकरांनाही झळ
गोव्यातही बाप्पांच्या किंमती वाढल्यात. मूर्तीसाठी लागणाऱ्या चिकणमातीच्या किमती 5 मीटरमागे 500 रुपयांनी वाढल्यात. शिवाय मूर्तीसाठी लागत असलेल्या रंगाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यानं, किंमती वाढल्याचं मूर्तीकार सांगतात. मूर्तीकारांना हस्तकला विकास महामंडळातर्फे काही प्रमाणात आर्थिक पाठबळ दिलं जातंय.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.