टॉप न्यूज

'वॉलमार्ट', 'भारती' झाले वेगळे!

ब्युरो रिपोर्ट, मुंबई
गेल्या डिसेंबरमध्ये संसदेनं बहुचर्चित एफडीआयच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर सर्वाधिक चर्चेत आली ती अमेरिकेतील बलाढ्य कंपनी वॉलमार्ट! भागिदारीचा करार संपुष्टात आल्यानं आता वॉलमार्ट आणि भारतीय कंपनी भारती एंटरप्राईजेस यांनी 'एकला चलो रे' चा नारा दिलाय. वरवर ही दोन कंपन्यांमधील अंतर्गत बाब वाटत असली तरी नजिकच्या काळात यामुळं बऱ्याच उलाढाली होतील. विशेषत: वॉलमार्टनं भारतातील कृषी क्षेत्रात जी मुसंडी मारलीय तिला व्यसन बसेल, असा दावा अर्थतज्ज्ञ करतायंत.

Untitled-4

गुगल वॉर...
अमेरिकेतील बलाढ्य कंपनी वॉलमार्ट आणि भारतीय कंपनी भारती एंटरप्राईजेस यांनी भागिदारी संपुष्टात आल्याचं संयुक्तरित्या जाहीर केल्यानंतर वरवर सर्वकाही आलबेल वाटत असलं तरी दोन्ही कंपन्यांमधील शीतयुद्ध काही लपून राहिलेलं नाही. आत्ताच त्यांचं 'गुगल' वॉर' सुरु झालंय. दोन्ही कंपन्यांच्या फोटोवर लाल खुणा झाल्यात. 

 

bharti-walmart-1...आता भारती एंटरप्राईझ वॉलमार्टशिवाय
वॉलमार्टनं सुनील भारती मित्तल यांच्या भारती एंटरप्राईजेसबरोबर २००७ मध्ये भारतीय रिटेल क्षेत्रात भागीदारी जाहीर केली होती. याअंतर्गत देशभरात किरकोळ विक्री दालनांचं जाळं उभारण्याचा करार करण्यात आला होता. 'बेस्ट प्राइस' या ब्रॅंडखाली उभयतांमार्फत ५०:५० टक्के भागीदारीसह देशभरात २० दालनंही चालविली जातात. तर 'इझीडे' हा बॅंडही याच क्षेत्रात भारतीमार्फत सुरू असून तिची देशभरात २१२ दालनं आहेत. वॉलमार्ट-भारतीचं पहिलं 'बेस्ट प्राइस' दालन मे २००९ मध्ये अमृतसर इथं सुरू झालं होतं. आता भागीदारीतील व्यवसाय वॉलमार्ट ताब्यात घेणार असून भारतीमार्फत गुंतविण्यात आलेल्या सेडर सपोर्ट सव्‍‌र्हिसेस कंपनीच्या १० कोटी डॉलरचे परिवर्तनीय रोख्यांवर वॉलमार्टची सर्वस्वी मालकी येईल. वॉलमार्टच्या आशिया विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्कॉट प्राइस यांनी आम्ही आता स्वतंत्ररीत्या भारतीय रिटेल क्षेत्रात कार्यरत राहणार असल्याचं म्हटलंय.

 

Wallmart'बेस्ट प्राइस'चा दिवस मावळला

आजमितीला 'भारती-वॉलमार्ट' देशभरात २० दालनांपर्यंत विस्तारलीय. वॉलमार्टबरोबरची भागीदारी संपुष्टात आली असली तरी देशभरात २१२ दालनं असलेल्या 'इझीडे'द्वारे या क्षेत्रात कायम राहणार असल्याचं भारतीनं स्पष्ट करून स्वतंत्रपणे आणखी वेगानं वाटचाल करण्याचे संकेत दिलेत. या व्युहरचनेचा एक भाग म्हणून वॉलमार्टचे भारतातील प्रमुख राज जैन यांना आपल्या सेवेत दाखल करुन घेतलंय. भारतीची इथून पुढची वाटचाल जैन यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरु राहणार आहे.

 

 

walmart newकाय आहे वॉलमार्ट...?
वॉलमार्ट ही एक अमेरिकन मल्टीनॅशनल कंपनी आहे. तिची स्थापना 1962 मध्ये सॅम वॉलटन यांनी केली. या कंपनीत वॉल्टन कुटुंबाचे 48 टक्के भागभांडवल गुंतलंय. कंपनीचं मुख्य कार्यालय अर्कान्सासमधील बेंटोनव्हिलं इथं आहे. या कंपनीची 15 देशांमध्ये 8500 किरकोळ विक्रीची मोठमोठी दुकानं आहेत. वॉलमार्टचं काम मुख्यत्वे तीन विभागांमध्ये चालते. वॉलमार्ट स्टोअर्स युनायटेड स्टेटस, सॅम्स क्लब आणि वॉलमार्ट इंटरनॅशनल हे तीन विभाग. याशिवाय कंपनीचे नऊ प्रकारचे किरकोळ विक्रीचे व्यवसाय आहेत. त्यात सुपरसेंटर्स, फूड अँड ड्रग्ज, जनरल मर्चंटाईज स्टोअर्स, बॉडगेज, कॅश अँड कॅरी स्टोअर्स, मेंबरशिप वेअरहाऊस क्लब्ज, ऍपरल स्टोअर्स, सॉफ्ट डिस्काऊंट स्टोअर्स आणि रेस्टॉरंटस यांचा समावेश आहे.

 

लॉबींगचा फंडा...
वॉलमार्टची एकूण उलाढाल देशातील एकूण किरकोळ व्यवसायाइतकी आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेत सरकारनं आपलं म्हणणं ऐकावं यासाठी मोठमोठय़ा कंपन्यांकडून सिनेटच्या सदस्यांना पाटर्य़ा देणं, मोठमोठय़ा रकमा देणं, त्यांच्या मागण्यांची पूर्तता करणं, भेटवस्तू देणं असे प्रकार सर्रास चालतात. अशाप्रकारचं लॉबिंग कायदेशीर असून त्यासाठी 1995मध्ये लॉबिंग अॅक्ट तयार करण्यात आलाय. त्यानुसार लॉबिंगसाठी काम करणाऱ्या कंपन्यांनी त्या संदर्भातील तपशील देणं बंधनकारक आहे. त्यानुसारच वॉलमार्टनं भारतात प्रवेश मिळवण्यासाठी 120 कोटी रुपयांचं लॉबिंग केल्याची माहिती अमेरिकेच्या सिनेटला दिली आणि एकच खळबळ उडाली. मात्र, तो उडालेला धुरळा आता पुरता खाली बसलाय....आता भागिदारी संपल्यानंतर इथूनपुढची वॉलमार्टची व्युहरचना काय आणि कशी असेल, याकडं सर्वांच लक्ष लागलंय. यामुळं कंपनी दोन पावलं मागं घेणार की भारतीला टक्कर म्हणून ताकदीनं उतरणार, हे अजूनतरी स्पष्ट झालेलं नाही.वॉलमॉर्टची राज्यात औरंगाबाद, अमरावती यांसह भारतभरात जम्मू, अमृतसर, लुधीयाना, जालंधर, भटींडा, झिराकपुर, मेरठ, आग्रा, लखनऊ, कोटा, इंदोर, भोपाळ, रायपुर, हैद्राबाद, विजयवाडा, गुंतूर, राजमुद्री इथं भव्य दुकानं आहेत.


easyday-dhuriकाही मजेशीर आकडेवारी -

वॉलमार्टच्या एकूण ८५०० स्टोअर्सना एकत्र केलं तर १५,३०० फुटबॉलची मैदानं व्यापू शकतील.
प्रती तास खर्च होणारी रक्कम - ३ कोटी ६० लाख डॉलर्स.
दर मिनिटाला होणारा नफा : ३४,८८० डॉलर्स.
जगभरातील कर्मचारी : २२ लाख.
दर आठवडय़ाला येणारे ग्राहक : १० कोटी.
वॉलमार्टचा एक स्वतंत्र देश म्हणून विचार करायचा झाला तर, त्याचा जागतिक अर्थव्यवस्थांमधील क्रमांक : १९ वा.
केवळ चीनमध्येच आहेत संघटित कर्मचारी.

 

 


walmart1ही तर दोन कंपन्यांमधील घडामोड

'भारती-वॉलमार्ट' मधील भागिदारी संपवून भारती एन्टरप्रायझेस आणि वॉलमार्ट यांनी आपली भागीदारी संपवत इथुनपुढं स्वतंत्रपणे व्यवसाय करण्याचा निर्णय घेतलाय. केवळ दोन बलाढ्य कंपन्यामधील ही घडामोड असून त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल, असं मला वाटत नाही. दोन्ही कंपन्या आतापर्यंत एकत्र काम करत होत्या, आता त्या वेगवेगळा व्यवसाय करतील. मुळातच आमचा एफडीआयला विरोध असून त्यावर आम्ही आजही ठाम आहोत.

-विजय जावंधिया, नेते शेतकरी संघटना

 

 

walmart2


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.