टॉप न्यूज

शिवसैनिकापासून सर्वोच्च नेत्यांची हजेरी

ब्युरो रिपोर्ट, मुंबई
 महाराष्ट्राच्या महानेत्याला, मराठी मनांवर अधिराज्य गाजवणाऱ्या सम्राटाला मावळत्या सूर्याच्या साक्षीनं अखेरचा निरोप देण्यासाठी शिवतीर्थावर अर्थात दादरच्या शिवाजी पार्कवर न भूतो न भविष्यती असा लाखोंचा जनसागर उचंबळलाय.
 

थोड्याच वेळात महाराष्ट्राच्या या लाडक्या नेतृत्वावर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर सरकारी इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

यात खेडेगावातल्या सामान्य शिवसैनिकापासून ते देशपातळीवरच्या सर्वोच्च नेत्यांचा समावेश आहे. सकाळी नऊ वाजचा बांद्र्याच्या मातोश्री या निवासस्थानातून निघालेली बाळासाहेबांची महायात्रा तब्बल सहा तासांनी शिवाजी पार्कावर आली. त्यांचे लक्षावधी चाहते रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. 

राज्यपाल के. शंकर नारायणन्, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, अध्यक्ष नितीन गडकरी, सुषमा स्वराज, मनेका गांधी, अरूण जेटली, गोपीनाथ मुंडे, राम नाईक, प्रकाश जावडेकर, शाहनवाज हुसैन, स्मृती इराणी, शिवराज सिंग चौहान, एकनाथ खडसे, राजीव शुक्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, रामदास आठवले, राज्याचे बांधकाममंत्री छगन भुजबळ, खासदार एकनाथ गायकवाड, गणेश नाईक, वसंत डावखरे, अमित देशमुख, उद्योजक अनिल अंबानी, अभिनेते अमिताभ बच्चन, नाना पाटेकर, महेश मांजरेकर, मधुर भांडारकर, रितेश देशमुख, मिलिंद गुणाजी, रमेश भाटकर आदी मान्यवरांनी शिवाजी पार्कावर हजेरी लावलीय. 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.