टॉप न्यूज

ऊस आंदोलनाचा वारकऱ्यांना अडथळा

ब्युरो रिपोर्ट
शेतकरी संघटनेने पुकारलेल्या बंदचा फटका पंढरपुरातील उत्पत्ती एकादशीला बसलाय. आळंदीला जाणारे वारकरी पंढरीत येवून विठुरायाचे दर्शन घेतात. त्या नंतर भाविक आळंदीला वारीला जातात. मात्र शेतकरी संघटनेने पुकारलेल्या बंद मुळे एसटी सेवा बंद आहे. याचा फटका या वारकऱ्यांना बसलाय.

Pandharpur Wari 7

 

कार्तिकी यात्रे नंतर पंढरपुरात महिन्याने येणारी उत्पत्ती एकादशी म्हणजे आजचा दिवस… आजची एकादशी आळंदीची एकादशी म्हणून वारकरी सांप्रदायात परिचित आहे. या वारीसाठी वारकरी आधी पंढरपुरात येवून चंद्रभागा नदीत स्नान करून. सावळ्या विठुरायाचे दर्शन घेतात आणि मग आळंदीला जातात. या वर्षी मात्र शेतकरी संघटनेने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा फटका या वारकऱ्यांना बसलाय. शेतकरी संघटनेच्या आंदोलनांमध्ये एसटीचं प्रचंड नुकसान होतं. त्यामुळं एसटी महामंडळाने या बंदमुळं प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवली होती. पण त्याचा त्रास मात्र या वारकऱ्यांना सहन करावा लागला. आणि मिळेल त्या वहानानं त्यांना पंढरपुर आणि नंतर आळंदी गाठावी लागली.

 

 

Warkariउत्साह मात्र तोच
असं असलं तरी वारकऱ्यांचा विठ्ठलाचं दर्शन घेण्याचा उत्साह आणि भक्तीभाव कमी झाला नाही.
''आषाढी कार्तिकी भक्तजन येती।
चंद्रभागेमाजी स्नान जे करिती।।...''
असा सोहळा पंढरपुरात सुरु आहे. भूलोकीच्या वैकुंठात, पंढरपुरात! सारी पंढरी विठ्ठलाच्या नामघोषानं दुमदुमून गेलीय. विठ्ठला, राज्यातील जनतेला सुखी, समाधानी ठेव तसेच राज्यावर दुष्काळ-भूकंप असे कोणतेही संकट येऊ देऊ नकोस असे साकडे वारकरी विठ्ठल चरणी घालतायेत.

 

 

 

thumb...तुझा विसर न व्हावा!
मागच्या कार्तिक एकादशीला अवघा महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत लोटला होता. त्यामुळं 'बा-विठ्ठला दुष्काळ हटू दे...' असंच साकडं विठ्ठलाला घालण्यात आलं होत. यंदा उत्तम पाऊसकाळ झाल्यानं पीकपाणी झोकात आहे. साहजिकचं विठोबाच्या पायावर डोकं ठेवताना 'हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा' एवढंच मागणं मागून भक्तगण मोठ्या आनंदानं घराकडं परतायत. निवडणुका जवळ आल्यानं यावेळी गर्दीतील राजकारण्यांची उपस्थितीही ठळकपणे जाणवतेय.

 

 

 

pandharpur1लाखो वारकऱ्यांनी केलं चंद्रभागेत स्नान
एकादशीचं श्री विठ्ठल दर्शन आणि चंद्रभागा स्नानाची पर्वणी साधण्यासाठी दोन दिवसांपासूनच भाविक पंढरीत मोठ्या संख्येनं दाखल झालेत. राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या विविध संतांच्या पायी दिंड्या दाखल झाल्यानंतर तर पंढरीतील रस्तेही विठ्ठलमय झालेत. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाळवंट, मंदिर परिसर, शिवाजी चौक, बस स्थानक आदींसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलाय. चंद्रभागेचं वाळवंट लाखो वारकऱ्यांच्या, दिंड्या पताकांच्या आणि हरिनामाच्या जगरानं दुमदुमुन गेलंय. कार्तिकी एकादशीच्या भल्या पहाटे गुलाबी थंडीत चार लाखांहून अधिक वारकऱ्यांनी चंद्रभागेत स्नान केले. पहाटे चारपासून स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. स्नान आटोपून काही भाविक नगरप्रदक्षिणा करण्यासाठी जात होते तर काहीजण नामदेव पायरीचे दर्शन घेवून आपली वारी पोहोचती करत होते. चंद्रभागा वाळवंटात वारकऱ्यांनी टाकलेल्या राहुट्यांमधून भजन, कीर्तन, भारुडाचे फड रंगल्याचं दृश्य पहायला मिळतंय.

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.