टॉप न्यूज

भारतरत्न सचिन तेंडुलकर

मुश्ताक खान, रत्नागिरी
भारतातील आणि जगभरातील अनेक क्रिकेट रसीकांसाठी देव असलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला विक्रमादित्य, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. सीएनआर राव यांना आज 'भारतरत्न' सन्मान प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवनात झालेल्या शाही सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशाच्या या दोन रत्नांना मानाचं पान आणि सनद देऊन गौरवलं. क्रिकेटमधले अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवणाऱ्या अनेक विक्रम नव्यानं स्थापित करणाऱ्या सचिन तेंडुलकरनं क्रिकेटमधुन निवृत्ती घेतल्यानंतर लगेचच त्याला भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा भारत सरकारनं केली होती. सचिन तेंडुलकरनं हा पुरस्कार भारतातील सर्व मातांना अर्पण केलाय.

 

Sachin Tendulkar f1

 

 

कोकणची पार्श्वभुमी
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अलिबागच्या कासे गावाचा.
सचिन तेंडुलकरला भारतरत्न जाहीर झाला आणि संपूर्ण भारतात एकच जल्लोष करण्यात आला. कोकणात सर्वच ठिकाणी सचिन तेंडुलकरचं कौतुक करणारे फलक रातोरात झळकले. त्याचबरोबर लांजा तालुक्यातील हर्चे गावाचा सुपुत्र असलेल्या सचिनला भारतरत्न मिळाल्याच्या बातम्या रत्नगिरीतल्या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये झळकल्या होत्या. पण आता सचिन तेंडुलकरनच आपण रायगड जिल्यातल्या अलिबाग तालुक्याच्या कासे गावचे आहोत ही माहिती दिली आहे. क्रीडा राज्यमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या चर्चेत सचिननं ही माहिती दिली.
रायगडमधे आमचं मूळ गाव असलं तरी लांजा तालुक्यातील हर्चेमध्ये आमचे नातेवाईक आजही आहेत अशी माहितीही तेंडुलकरनं दिली आहे. आपले वडिल हर्चे गावात जात असल्याचंही त्यानं सांगितलं. त्यातच हर्चे गावात तेंडुलकर कुटुंबियांची संख्या अधिक आहे. त्यामुळेच हर्चे गावची लोकं सचिन तेंडुलकर आपल्याच गावचा आहे असं सांगत असत. अर्थातच ज्याने आपल्या क्रिकेट कारर्किर्दीनं जगभरात आपला ठसा उमटवला त्याबद्दल अभिमान कोणालाही असेल.

 


कोकणातला पाचवा भारतरत्न
अलिबाग तालुक्यातलं कासे हे सचिनचं मुळ गाव आहे. सचिनला आज भारतरत्न मिळाल्यानं कोकणातल्या भारतरत्नांची संख्या आत पाच झालीये. त्यामुळं कोकणात तसे फलकही लावण्यात आलेत.

 

 

मुळ गावाबद्दलची उत्सुकता संपली
सचिनच्या मूळ गावाबद्दल रत्नगिरी जिल्ह्यातल्या सर्वांना उत्सुकता तर होती शिवाय रत्नागिरीचे पालकमंत्री आणि तालुक्यातील पाली गावचे उदय सामंत यांनाही त्या विषयी प्रचंड उत्सुकता होती. सोळा वर्षाखालील क्रिकेट प्रीमियर लिगला सचिन तेंडुलकरचं नाव देण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. त्याच निमित्तानं क्रीडा राज्यमंत्री उदय सामंत यांनी सचिन तेंडुलकरची भेट घेतली. यावेळी आपल्या मनातली उत्सुकता त्यांनी बोलून दावखील आणि सचिन तेंडुलकरच्या मुळ गावाबद्दलचा प्रश्न मिटला.

 

 


कोकणातले पाच भारतरत्न
कोकणानं आतापर्यंत ५ भारतरत्ने दिली आहेत. त्यातले ३ रत्नागिरी जिल्ह्यातले आणि २ रायगड जिल्ह्याचे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातले महर्षी धोंडो केशव कर्वे (मुरुड, दापोली),
पां.वा.काणे (दापोली) आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर (आंबडवे, मंडणगड) आहेत तर आचार्य विनोबा भावे (घागोडे, रायगड) आणि सचिन तेंडुलकर (कासे, आलिबाग) रायगड जिल्ह्याचे आहेत.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.