टॉप न्यूज

महाराष्ट्रात ‘महा’गारपीट

ब्युरो रिपोर्ट, औरंगाबाद/परभणी/लातुर
राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर कुठं जाणार....अशी एक जुनी म्हण आहे. सरकारच्या रुपात नागरीकांना राजाचा मार तर खावाच लागतो, पण आता महाराष्ट्रात सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकाऊन घेतल्यानं कुठं जाऊ...आणि कुणाला सांगु अशी परिस्थिती निर्माण झालीये.
 


दुष्काळाच्या सर्वाधिक झळा पोहोचलेल्या मराठवाड्यात पावसानंही आपला सर्वाधिक प्रकोप दाखवला. आधिच दुष्काळ....त्यात जगण्याची एक आशा देणारा रब्बी हंगाम...आणि बघता बघता नष्ट झालेली पिकं. अचानक सुरु झालेल्या वादळी पाउस आणि गारपिटीनं शेतकऱ्याचं जगमं असह्य करुन टाकलंय. रब्बी हंगामाच्या पिकांच्या काढणीची वेळ...आणि पावसानं क्षणार्धात उभं असलेलं पिक जमिनदोस्त केलं. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत शेतातली उभी पिकं आडवी झाली.

 

GARA9कोट्यावधी रुपयांचं नुकसान
अठरा दिवसांत झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने औरंगाबादेतील 8 लाख हेक्‍टरवरील पिकांचं तर परभणीतील जवळपास दिड लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अहवाल केंद्रीय पथकाला नुकताच सादर करण्यात आला. रब्बीची पिके हातून गेल्याने औरंगाबाद विभागातील चार जिल्ह्यांत रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी घेतलेल्या 643 कोटी 9 लाख रुपयांच्या पीककर्जाची माती झाली आहे. वादळी वाऱ्यात आणि पावसात जवळपास 3 ते 4 हजार नुकसान झालंय. यापैकी 446 घरं तर पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली आहेत.

 

 


जिल्हा ----------------- बाधित क्षेत्र 
(22 फेब्रुवारी ते 12 मार्चदरम्यान) 
औरंगाबाद ----------- 1,11,209 
जालना -------------- 92,640 
परभणी ------------- 1,23,983 
हिंगोली -------------- 40,867 
नांदेड ---------------- 73,019 
बीड ----------------- 74,250 
लातूर -------------- 1,10,136 
उस्मानाबाद --------- 1,69,669 
एकूण -------------- 7,95,774

 


जिवीत हानी वेगळीच
गारपिटीत लहान-मोठी जवळपास 634 जनावरे दगावली. औरंगाबाद विभागात 18 जणांचा पावसानं बळी घेतला. औरंगाबाद, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी 3, जालन्यात 2, परभणी आणि उस्मानाबादेत प्रत्येकी 1, बीडमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यात एका शेतकऱ्यानं झालेलं नुकसान आणि वाढलेलं कर्ज याच्या विचारानं आत्महत्या केली. तर नाशिक जिल्ह्यातील करंजगाव इथं हाताशी आलेलं पिक भुईसपाट झालेलं बघुन शेतकऱ्याला हृद्यविकाराचा झटका आला. आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.  

 

gara5पुन्हा कर्जबाजारीपणा

गेल्या वर्षी शेकऱ्यांनी कर्ज घेऊन पिकांची लावगड केली होती, पण दुष्काळाने सगळीच पिकं त्यांच्या
हातातुन गेली होती. या वर्षी खरीप आणि रब्बी हंगामात पिके चांगली आलेली होती. पण रब्बी पिकं अशी हाताशी आलेली असताना गारपिटीने उद्‌ध्वस्त झालीयेत. अनेक शेतकऱ्यांनी पीककर्ज काढून रब्बी पिकांची पेरणी केली होती. हाती आलेला गहू, ज्वारी विकून काही प्रमाणात कर्जही फेडता येईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती, सलग दोन वर्षे निसर्गाची अवकृपा झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडं आधीच मोडलंय. फळबागा डोळ्यांसमोर उद्‌ध्ववस्त झाल्या आहेत. कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांना जमीन विकावी लागेल किंवा सावकारांकडे कर्ज काढण्याची वेळ आली आहे. 


औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका, राष्ट्रीयीकृत बॅंका, तसेच ग्रामीण बॅंकांनी रब्बी हंगामासाठी 643 कोटी 9 लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केलेले आहे. एवढ्या प्रमाणात पीककर्ज घेतलेले असताना ते फेडावे कसे हा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. 

 

जिल्हा.......खरीप कर्ज लक्षांक............रब्बी कर्ज लक्षांक............कर्ज वाटप 

औरंगाबाद.......57323.......................24566.........................31577 
जालना........... 62451......................17614.........................10799 
परभणी...........79973......................14113..........................14260 
हिंगोली...........36186.......................9050...........................7672 

 


रेकॉर्ड ब्रेक पाऊस
औरंगाबाद शहरात मार्चमध्ये चोवीस तासांत झालेल्या पावसाचा "ऑल टाईम रेकॉर्ड‘ 2006 मध्ये झाला होता. तो रेकॉर्ड यंदा दोनदा मोडला गेला. तसेच मार्चमध्ये एकूण झालेल्या पावसाचा यापूर्वीचा "ऑल टाईम रेकॉर्ड‘ हा 1989 मध्ये स्थापित झाला होता. तोही यंदाच्या पावसाने मोडला. 
मराठवाड्याला गारपिटीने झोडून काढले. आतापर्यंत अशी गारपीट झाली नव्हती. औरंगाबादेत यापूर्वी साधारणतः एप्रिलमध्ये गारांसह पाऊस पडला होता. यावर्षी मार्चच्या सुरवातीलाच गारांसह पाऊस झाला. पण या पावसानं मार्च महिन्यात पडलेल्या पावसाचे सर्व रेकॉर्ड मोडले.

 

GARA17आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस (मि.मी.मध्ये) 
9 मार्च 2005 - 7.9 
10 मार्च 2006 - 25.4 
22 मार्च 2008 - 15.4 
14 मार्च 2009 - 0.5 
13 मार्च 2010 - 9.6 
01 मार्च 2011 - 6.0 
03 / 13 मार्च 2013 - 26.6 

 

वर्षनिहाय मार्चमधील एकूण पाऊस (मि.मी.मध्ये) 
1989 - 48.6 
2006 - 26 
2008 - 39 
2010 - 12.7 
2011 - 10.2 
2013 - 96.8 
 

यावर्षीचा आतापर्यंतचा पाऊस (मि.मी.मध्ये) 
ता. 3 मार्च - 26.6 
ता. 5 मार्च - 2 
ता. 6 मार्च - 24 
ता. 8 मार्च - 2.6 
ता. 9 मार्च - 15 
ता. 13 मार्च - 23.6

 

परभणीतही पावसाचं थैमान

अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे परभमी जिल्ह्यातील दिड लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील शेती, फळपिकांचे नुकसान झाले आहे. यापैकी 66 हजार 282 हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे 50 टक्केंपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जिल्ह्यातील सर्व 848 गावांना गारपिटीचा फटका बसला. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. छोटी-मोठी 49 जनावरे दगावली. 11 घरांचे पूर्णतः, 569 घरांचे अंशतः नुकसान झालंय.

पंधरा दिवसांपासून पाऊस, वादळी वारे, गारपिटीने थैमान घातलंय. गहू, हरभरा, करडई ही रब्बी, आंबा, संत्री, मोसंबी, टरबूज, डाळिंब आदी फळपिके, कांदा, टोमॅटो, वांगी आदी भाजीपाला पिके नष्ट झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालंय.

 

पंचनामे सुरु
परभणी तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीपिकांची पाहणी करून त्यांचे पंचनामे करायाला सुरुवात झालीये. 27 फेब्रुवारी ते 10 मार्चपर्यंत रब्बी पिकांखालील पिकांच्या क्षेत्रापैकी एक लाख 39 हजार 496 हेक्‍टरवरील पिके, एक हजार 918.1 हेक्‍टर क्षेत्रावरील फळपिके असे मिळून एक लाख 14 हजार 414 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. यापैकी 66 हजार 282 हेक्‍टरवरील पिकांचे 50 टक्‍क्‍यांहून अधिक, 75 हजार 132.1 हेक्‍टरवरील पिकांचे 50 टक्केंपेक्षा कमी नुकसान झाले.

 


gara10सोमवार ता. दहा मार्चपर्यंतचे फळपिके, शेतीपिकांचे तालुकानिहाय नुकसान हेक्‍टरमध्ये. 
तालुका नुकसान 
परभणी 13,697 
जिंतूर 13,727 
सेलू 16,150 
मानवत 7,661 
पाथरी 2,039 
सोनपेठ 13,755 
गंगाखेड 39,172 
पालम 20,077 
पूर्णा 15,136 
एकूण 141,414


लातूर - गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरू असलेल्या गारपिटीत लातूर जिल्ह्यातीलही सर्वच शेती उद्‌ध्वस्त झाली आहे. भुकंपानंतर लातुरमध्ये सर्वात जास्त नुकसान ह्या अकाली पावसानं आणि गारपिटीमुळं झालंय.

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.