टॉप न्यूज

मोदींच्या वादळात काँग्रेसची धुळधाण

ब्युरो रिपोर्ट
भारताच्या राजकिय इतिहासात 16 व्या लोकसभेची निवडणुक खरोखरच ऐतिहासिक ठरली. भारताच्या जनतेनं बीजेपीला फक्त स्पष्ट बहुमतच नाही तर एक एतिहासिक विजय मिळवुन दिलाय. या निवडणुकित एनडीए ला ५४३ पैकी ३३३ जागा मिळाल्यात त्यातल्या २८१ जागा ह्या बीजेपीच्या स्वतःच्या आहेत. गेल्या 25 वर्षातला हा सर्वात धक्कादायक निकाल आहे. १९८४  नंतर कोणत्याही पक्षाला एवढं बहुमत मिळालं नव्हतं. भाजपला स्वत:च्या ताकदीवर बहुमत मिळालंय. लोकसभा निवडणुकीत सरकार स्थापन करण्यासाठी 543 पैकी 272 खासदारांची गरज असते. त्यालाच जादुचा आकडा म्हणतात. दर निवडणुकित ह्या जादुच्या आकड्यापर्यंत पोहोचणं हे बहुमत मिळवलेल्या पार्टीसमोरही आव्हानच असतं,  पण या निवडणुकीत बीजेपीला मिळालेल्या स्पष्ट बहुमतानं या जादुच्या आकड्यासाठी त्यांना मेहनत करण्याची गरजच राहीलेली नाहीये.

modi

स्वातंत्र्यानंतरच्या सर्व निवडणुकांचा विचार केला तर कॉग्रेसचं वर्चस्व सर्वच निवडणुकांध्ये बघायला मिळालंय. काहीही झालं तरीही जनता आपल्यालाच निवडुन देईल हा अतिआत्मविश्वास कॉग्रेसला भोवला असं म्हयलं तर वावगं ठरणार नाही. गेल्या काही वर्ष देशात कॉग्रेस विरोधी लाट सुरु आहे, मग ती बेरोजगाराविषयी असेल, किंवा भ्रष्टाचाराविरोधी असेल किंवा प्रशासनाविरोधी असेल, या लाटेकडं कॉग्रेसनं दुर्लक्ष केलं, त्यात लक्ष घातलं नाही, परंतु बीजेपीनं जनतेचा रोष ओळखुन स्वत:ला कॉग्रेसविरोधात एक पर्याय म्हणुन उभं केलं. विकासाचं मॉडेल घेऊन नरेंद्र मोदी भारताच्या जनतेसमोर भावी पंतप्रधान म्हणुन उभे राहीले. बीजेपीला ज्या प्रकारे अनपेक्षितपणे विजय मिळालाय गेल्या २५ वर्षात कोणत्याही पक्षाला अशा पद्धतीनं स्पष्ट बहुमत मिळालं नाहिये. 

प्रस्थापितांना धक्का
महाराष्ट्रातच नाही तर संपुर्ण देशात या निवडणुकीत अनेक प्रस्थापितांना धक्का बसलाय. काही ठिकाणी तर कॉग्रेसला आपलं खातंही खोलता आलं नाही. दिल्ली, राजस्थान, गुजरात च्या जनतेनं कॉग्रेसला एकमतानं नाकारलेलं दिसतं. कॉग्रेसला या सर्व ठिकाणी जनतेनं धुळ चारलेली दिसतेय. छगन भुजबळ... सुशिलकुमार शिंदे....नितेश राणे...अशा उमेदवारांना हार स्वीकारावी लागलीये. सिंधुदुर्गात नितेश राणेंचा पराभव हा नारायण राणे यांना मोठा धक्का आहे. मुलाच्या पराभवची जबाबदारी घऊन राणेंनी लगेच राजीनामा देणार अलसल्याचंही घोषित करुन टाकलं. नाशिकमध्ये भुजबळांचा पराभव हाही त्याच्यासाठी धक्का आहे.

 

पराभव पत्करावा लागलेले दिग्गज

- सुशिलकुमार शिंदे – काँग्रेस(सोलापुर)
- छगन भुजबळ – राष्ट्रवादी काँग्रेस (नाशिक)
- निलेश राणे – काँग्रेस (सिंधुदुर्ग)
- सुनिल तटकरे – राष्ट्रवादी काँग्रेस (रायगड)
- आनंद परांजपे – कल्याण (काँग्रेस)
- संजय निरुपम - काँग्रेस (उत्तर मुंबई)
- अरुण जेटली – बीजेपी

 

विरोधीपक्षनेते पदही नाही
काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधी आता विरोधपक्षनेतेही होऊ शकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालीये. लोकसभेत विरोधीपक्षाच्या बाकावर बसायला एकुण संख्येच्या किमान 10 टक्के खासदार आवश्यक असतात. पण काँग्रेसला या निवडणुकीत तोवढ्या जागा मिळवणंही शक्य झालं नाहीये. त्यामुळं पंतप्रधानपद तर नाहीच पण विरोधपक्षनेतेपदही राहुल गांधींना मिळण्याची शक्यता नाही.

 

महाराष्ट्राच्या जनतेचा कौल

महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्या जनतेनंही बीजेपीलाच आपला कौल दिलाय. कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेस यांना भुईसपाट केलंय. महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉग्रेसला तीन तर कॉग्रेसला फक्त खातं खोलता आलंय. आणि तेही आदर्श घोटाळ्यामुळं वादात असलेले अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्रात कॉग्रेसचं खातं उघडलंय. मनसेचा विचार केला तर महाराष्ट्राच्या जनतेनं मनसेला महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची जागा जनतेनं त्यांना दाखवुन दिलीये असंच या निकालांनी दाखवुन दिलंय. नुसती स्वप्न आणि आक्रमक आश्वासनं नको तर कृती करा...रिझल्ट दाखवा आणि सत्ता घ्या असंच जणु जनतेनं मनसेला सांगीतलंय. मनसेचा बालेकिल्ला समजल्या जणाऱ्या नाशिकमध्ये तर मनसेचं डिपॉझिट जप्त झालंय. सत्तेच्या जोरावर दादागिरी करणाऱ्या राष्ट्रवादी कॉग्रेसलाही जनतेनं त्यांची जागा दाखवलीये. महाराष्ट्रभरात केवळ तीन जागा मिळवण्यात राष्ट्रवादीला यश मिळालंय. त्यामुळं राष्ट्रवादीला आता आत्मपरिक्षणाची गरज आहे असंच म्हणावं लागेल.

 

राजिनामा सत्र सुरु
राहुल गांधीचं नेतृत्व काँग्रेसच्या पराभवाला जबाबदार असल्याचं काँग्रेसचे नेते मात्र मान्य करत नाहीयेत. त्यामुळं या पराभवाची जबाबदारी स्वीकारत कॉग्रेसच्या नेत्यांनी राजीनामा द्यायला सुरुवात झाली. सिंधुदुर्गातील नितेश राणेंच्या परावभवाची जबाबदारी घेत नारायण राणे यांनी त्यांचा राजिनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. तर विदर्भातील पराभवाची जबाबदारी घेत नितीन राऊत यांनीही राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय. पण लोकसभा २०१४ च्या निवडणुकी काँग्रेसच्या झालेल्या या गारुन पराभवाला काँग्रेसची घराणेशाहीच जबाबदार आहे का याचं उत्तर काँग्रेसला द्यावंच लागणार आहे.

 

वन मॅन शो
संपुर्ण देशात नरेंद्र मोदींची लाट होती, आणि म्हणुनच बीजेपीला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं हे आता विरोधकांनीही मान्य केलंय. गावागावात मोदींना पंतप्रधान करायचं म्हणुन कमळाचं बटण दाबा असा प्रचार बीजेपीकडुन करण्यात येत होता. बीजेपीच्या उमेदवाराचा प्रचार करताना मोदींचा प्रचार केला जात होता. आणि उमेदवाराच्या नावाएवजी कमळाला मत द्या असं आवाहन जनतेला करण्यात यात होतं. त्याचा फायदा बीजेपीला झाल्याचं दिसुन येतं. कारण ज्या ठिकाणी बीजेपीचा उमेदवार निवडुन येण्याची शक्यता नाही त्या ठिकाणीही मोठ्या संख्येच्या फरकानं उमेदवारांना विजय मिळालाय. त्यामुळं हे यश हे मोदींमुळं मिळालेलं यश आहे असं सर्वांनीच मान्य केलंय.

 

सोशल मिडीयाचा फायदा
नरेंद्र मोदींनी बदललेल्या काळाच्या माध्यमाचा म्हणजेच सोशल मिडीयाचा प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात वापर करुन घेतला. जनतेच्या प्रश्नांपर्यंत त्यांच्याच भाषेत पोहोचणं आणि अच्छे दिन आने वाले है...हे आश्वासन देणं या माध्यमातुन ते सामान्य जनतेपर्यंत पोहोचले. आणि त्याचा फायदा त्यांना झाला. त्यामुळं निवडणुकीत सोशल मिडीयाचं महत्व आणि ताकद त्यांनी दाखवुन दिली.

 

अच्छे दिन आने वाले है...
बीजेपीनं त्यांच्या प्रचारात वापरलेली घोषणा...अच्छे दिन आने वाले है...सामान्य जनतेला भावनिक आवाहन करणारी ठरली. आणि त्यानुसार जनतेनं बीजेपीवर विश्वास दाखवलाय. पण हा विश्वास टिकवणं, त्यांच्या अपेक्षा पुर्ण करणं हे आता नविन सरकारच्या समोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळं ही घोषणा खरी ठरणारेय की नाही ते येणारा काळच ठरवेल.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.