डिप्लोमेटीक खेळी
भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांच्या दृष्टीने महत्त्वाच्या सार्क संघटनेतील देशांच्या प्रमुख नेत्यांना नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यासाठीच पाकिस्तानचे अध्यक्ष नवाझ शरिफ, अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमिद करझाई, नेपाळचे पंतप्रधान....श्रीलंकेचे अध्यक्ष महेंद्र राजपक्षे, अशा शेजारी देशांना शपथविधीच्या सोहळ्याला आमंत्रित करुन भारताच्या भविष्यातल्या परराष्ट्र धोरणाचं चित्रंच स्पष्ट केलंय.
महाराष्ट्रातील सहा जणांना संधी
नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्राच्या सहा खासदारांना संधी मिळालीये. त्यात नितीन गडकरी, गोपिनाथ मुंडे, अनंत गिते, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे. सहा खासदारांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश असल्यानं त्याचा फायदा महाराष्ट्राला होईल अशी महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षा आहेत.
राजु शेट्टी, रामदास आठवले नाराज
नरेंद्र मोदींचं मंत्रीमंडळ छोटं असल्यानं एनडीएतील सर्वच घटक पक्षांना मंत्रीपद देणं शक्य झआलेलं नाही. परंतु त्यामुळं महाराष्ट्रातील महायुतीचे घटक असलेलले रामदास आठवले आणि राजु शेट्टी यांना मंत्रीपद मिळण्याची पुर्ण शक्यता होती, पण मोदींच्या छोट्या मंत्रीमंडळात त्यांची वर्णी लागु शकली नाही, त्यामुळं ते नाराज झालेत. मंत्रीपदाची अपेक्षा नाही, पण आमचे प्रश्न सुटले नाही तर आमचं उपद्रव मुल्य दाखवुन देऊ असं राजु शेट्टी यांनी सांगीतलंय.
मोदींचं मंत्रीमंडळ
पंतप्रधान
नरेंद्र मोदी
कॅबिनेट मंत्री
राजनाथ सिंग, सुषमा स्वराज, अरुण जेटली, एम. व्यंकय्या नायडु, नितिन गडकरी, डी. व्ही. सदानंद गौडा, उमा भारती, नजमा हेप्तुल्ला, गोपीनाथ मुंडे, रामविलास पासवान, कलराज मिश्र, मेनका गांधी, अनंथ कुमार, अशोक गजपती राजु, अनंत गिते, हरसिमरतकौर बादल, नरेंद्रसिंह तोमर, जुआल ओराम, राधा मोहन सिंह, तन्वरचंद गेहलोत, स्मृती इराणी, डॉ हर्षवर्धन.
राज्य मंत्री
व्ही के सिंह, इंद्रजित सिंह, संतोषकुमार गंगवार, श्रीपाद नाईक, धरमेंद्र प्रधान, सरबानंद सोनवाल, कृष्णपाल गुज्जर, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, डॉ. जितेंद्र सिंह, श्रीमती निर्मला सितारामन, जी. एम सिद्धेश्वरा, मनोज सिन्हा, निहाल चंद, उपेंद्र कुशवाह, राधकृष्णन पी., किरण रिजीजु, कृ पाल, संजीवकुमार बालिया, मनसुखभाई वासवा, रावसाहेब दानवे, विष्णुदेव सहाय, सुदर्शन भगत.
Comments
- No comments found