इतर भाजीपालाही संकटात
भारतातुन निर्यात झालेल्या मिर्चिच्या तपासणीत अशा प्रकारे जास्त रसायनं आढळुन आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं सौदी कृषी मंत्रालयानं स्पष्ट केलंय. तशी सुचना देणारं पत्र त्यांनी भारतीय कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणालाही दिलंय. तसंच भारतातुन आयात होणाऱ्या इतर भाजीपाल्यातही रसायनांचं प्रमाण हे जास्त आढळून आल्याचं त्यांनी म्हटलंय. पण त्यांच्यावर अजुनपर्यंत बंदी घालण्यात आलेली नाही. पण हे प्रमाण जर खुपच जास्त असेल तर बाकी भाजीपाल्यावरही हे बंदीचं संकट ओढावु शकतं असा इशाराही त्यांनी दिलाय. जगात भारतातुन भाजीपाला आयात करणारे अरब देश हे चौथ्या नंबरचे देश आहेत.
अर्थव्यवस्थेला फटका
एपेडानं म्हणजेच (कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण) सौदीच्या कृषी मंत्रालयाच्या निर्णयाला दुजोरा दिला आणि निर्यात करण्याआधी आपल्या मालाची योग्य ती चाचणी घेण्याच्या सुचना निर्यातदारांना दिल्यात. यांच्या मते पश्चिम आशिया म्हणजेच अरब देश हे भारतीय निर्यातीच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत आणि त्यांनी अशा प्रकारे भारतीय भाजीपल्यावर बंदी घातली तर त्याचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसेल.
परदेशी चलनावर परिणाम
भारतीय मसाले महामंडळाच्या मते भारतीय मिर्ची हा सर्वात जास्त विदेशी चलन कमवणारा पदार्थ आहे. एप्रिल ते नोव्हेंबर 2013 या काळात भारतातुन जवळपास एक लाख 81 हजार 500 टन इतक्या मिर्चीची निर्यात झाली होती आणि त्यातुन सुमारे 3 दशलक्ष डॉलर इतकं परदेशी चलन भारताला मिळालं होतं. त्यामुळं या बंदीमुळं भारताचं प्रचंड आर्थिक नुकसान होणार असल्याची खंत महामंडळानं व्यक्त केलीये. युरोपिय युनियननं हापुस आंब्यावर नुकत्याच घातलेल्या बंदीमुळं भारतात येणाऱ्या परकिय चलनावर मोठा परिणाम झालाय. त्यात 2013 मध्ये भारतातुन निर्यात केलेल्या फळं आणि भाजीपाल्यांच्या जवळपास 207 कन्साइनमेंट अति प्रमाणात रासायनिक वापरामुळं परत पाठवण्यात आल्यात. अशात मिर्चीवर घालण्यात आलेली बंदी ही अर्थव्यवस्थेसाठी नक्कीच चांगली नाही असं महामंडळाचं मत आहे.
वेळीच सावरण्याची गरज
शेतकरी आणि निर्यातदार यांनी यावरुन वेळीच धडा घेण्याची गरज आहे. फळं आणि भाजीपाला पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनांचा वापर कमी करण्याची गरज आहे. यासाठी सरकारनंही शेतकऱ्यांमध्ये जागृती घडवुन आणण्याची गरज आहे असं मत भाजीपाला निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केलंय.
Comments
- No comments found