बियाणं खरेदीही मंदावली
जुनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडतो, त्यामुळं शेतकऱ्यांची बियाणं खरेदीची लगबग सुरु होते. कारण जुन नंतर अनेकदा बियाणांचा साठा संपतो आणि शेतकऱ्यांना बियाणं मिळत नाही. पण यंदा तीही परिस्थिती उलटी आहे. बियाणांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असुनही पाऊस पडत नसल्यानं शेतकरी बियाणं खरेदी करायला उत्साही दिसत नाहीयेत.
सरकारच्या खास उपाययोजना
खरीप पेरणीसाठी यंदा सरकार शेतकऱ्यांवर मेहेरबान झाल्याचं चित्र आहे. सरकारनं कृषी विभागाला शेतकऱ्यांच्या फायद्याचे अनेक आदेश दिलेत. शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणं उपलब्ध करुन देणं, किटकनाशके, खतांच्या विक्रेत्यांवर लक्ष ठेवणं जेणेकरुन खतं आणि किटकनाशकांचा काळाबाजार होणार नाही. त्यासाठी विषेश मोहीम सुरु करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आलेत. तसंच शेतकऱ्यांना विना विलंब कृषी कर्ज उपलब्ध करुन द्यावं असे आदेश बँकांना देण्यात आलेत.
शेतकऱ्यांच्या आशा आता पावसावर
दुष्काळ, नंतर अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीनं खचुन गेलेल्या शेतकऱ्यांना आता हा पावसाळा तरी त्यांच्यासाठी लाभदायक ठरेल अशी आशा आहे. पण पावसानं सुरुवातीलाच दडी मारल्यानं बळीराजा काहीसा निराश झालाय. पुढच्या एक आठवड्यात तरी मान्सुन येईल आणि त्याची पेरणी पुर्ण होईल अशी आशा त्याला लागलीये. कारण हा पावसाळाच त्याचा एकमेव आधार आहे. दुष्काळानं उभी पिकं जळुन गेली. त्यानंतर रब्बीचा हंगाम अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं नेला. अशात आता फक्त या खरीपाचा आधार या बळीराजाला उरलाय.
मजुर आणि लागवड खर्चही वाढला
निसर्गाच्या कोपासमोर माणुस हतबल असतो असं म्हणतात. पण शेतकऱ्याला मात्र निसर्गाच्या कोपाबरोबरच मानवनिर्मित आपत्तीलाही सामोरे जावं लागतंय. गेल्या वर्षभरात एकही पिक हाताला लागलं नसताना खरीपासाठी लागवड खर्च आणि मजुरी मात्र त्याला द्यावीच लागणार आहे. त्यातही बियाणं, खतं, किटकनाशके आणि मजुर यांचा दर दरवर्षी चढतच जाणारा असतो. एक मजुर एका दिवसाचे किमान 150 रुपये घेतो. त्यामुळं आधीच निसर्गाच्या तडख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना खरिपाचीही शाश्वती नसताना या खर्च मात्र करावाच लागणार आहे.
Comments
- No comments found