टॉप न्यूज

विवेक राजूरकर, औरंगाबाद
होळीनिमित्तानं विविध रंग उधळून भावी आयुष्यातील रंगही आनंदाचे, समृद्धीचे असावेत, अशीच इच्छा प्रत्येक जण धरतो. पण, उधळले जाणारे रंग आरोग्यासाठी घातक असतील तर आयुष्याचा बेरंगही होऊ शकतो. त्यामुळं पाण्याची नासाडी न करता 'इको फ्रेंडली' होळी साजरी करण्याचा संदेश येथील दीपशिखा फाऊंडेशनच्या अध्यक्षा मनीषा चौधरी देताहेत. यासाठी त्या उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून घरच्या घरी शरीराला कोणताही अपाय न करणारे नैसर्गिक रंग कसे तयार करता येतात, याचे धडेच देतात.
 
मुश्ताक खान, दापोली, रत्नागिरी
कोकणात परंपरेप्रमाणं यंदाही शिमगा दणक्यात साजरा होतोय. शिमगा साजरा करण्याच्या विविध परंपरांपैकी सर्वात महत्त्वाची परंपरा म्हणजे उत्सवाची पालखी! सर्व भाविकांना एकाच ठिकाणी जिल्हाभरातल्या देवतांचं दर्शन व्हावं यासाठी गेल्या सात वर्षांपासून दापोलीत साई सेवा केंद्रातर्फे शिमगा पालखी महोत्सवाचं आयोजन केलं जातं. राज्यातल्या या एकमेव पालखी महोत्सवात यंदाही जिल्ह्यातल्या विविध भागांतून १८ पालख्या धुमधडाक्यात दाखल झाल्यात. याचा आनंद लुटताना प्रत्येक जण दुष्काळ दूर होऊ दे रेsss महाराजा, असं गाऱ्हाणं घालतोय.
 
सुखदा खांडगे, मुंबई
रानावनात पळस पेटायला लागले की वसंताची चाहूल लागते. यातच येते होळी. विदर्भात, खान्देशात, कोकणात, आदिवासी भागात होळीची मज्जा वेगवेगळी असते. पण या सर्वांमध्ये हमखास असते ती पुरणाची पोळी. आदिवासी भागात या पुरणपोळीच्या जोडीला असतो बोहाडा! या बोहाड्याच्या सोंगानं खऱ्या अर्थानं शिमग्याला साज चढतो... आणि आदिवासी संबळ, डफाच्या तालावर बेधुंदपणं नाचत राहतो, नाचत राहतो.
 
ब्युरो रिपोर्ट, जालना
राज्यात भीषण दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारनं कंबर कसलीय. पिण्यासाठी पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याला प्राधान्य देत योजना राबवल्या जातायत. त्यात आता सेवाभावी संस्थांबरोबरच विरोधी पक्षांनीही पुढाकार घेतलाय. शिवसेनेनं जालन्यात नुकताच चारा दिंडीचा अभिनव उपक्रम सुरू केलाय. 'चारा छावणीत नको, दावणीला द्या,' असा घोष करीत ही दिंडी शेतकऱ्यांच्या दावणीतच चारा देऊ लागलीय.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
आजचं हवामान झपाट्यानं बदलतंय. उन्हाची काहिली दिवसेंदिवस वाढतेय. सकाळी पाऊस, दुपारी ऊन तर रात्री थंडी असे एकाच दिवसात तिन्ही ऋतू आजकाल बघायला मिळतायेत. जागतिक तापमानात गेल्या काही दशकात चांगलीच वाढ झालीय. पृथ्वीचं वाढतं तापमान, हवामानातील बदल यापासून निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत प्रत्येकानं जागरुक व्हायला पाहिजे. आज जागतिक हवामान दिनानिमित्त या बदलत्या हवामानाचा 'भारत4इंडिया'नं घेतलेला आढावा...
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
'पाण्याची बचत म्हणजेच पाण्याची निर्मिती' ही बाब आज सगळ्यांनीच लक्षात ठेवायला हवी. पाणी म्हणजे जीवन असल्याकारणानं ते सर्वांनाच हवंय. पण याच पाण्याची उधळपट्टी न करता, पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी आज प्रत्येकानंच जलसाक्षर होण्याची गरज आहे. यापुढची युद्धं पाण्यावरून होतील असं भाकीत केलं जातंय. त्यामुळं या समस्येकडं गांभीर्यानं बघायला पाहिजे. जागतिक जलदिनानिमित्त जलसाक्षरतेमुळं कशी प्रगती होते, याचाच घेतलेला एक आढावा.
 
सुमित बागुल, मुंबई
देशात आणि राज्यात उपलब्ध पाण्यापैकी 80 टक्के पाणी शेतीसाठी वापरलं जातं. उर्वरित 20 टक्के पाणी पिण्यासाठी आणि उद्योगधंद्यांसाठी वापरलं जातं. आज दुष्काळग्रस्त भागातील जनतेला पिण्यासाठी पाणी मिळत नाही. दुष्काळ आल्यानंतर पाणी...पाणी... असं म्हणत बसण्यापेक्षा शेतीसाठी ठिबक सिंचनासारखी सुविधा केल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होईल. त्यामुळं पिण्याच्या पाण्याच्या संकटातून तरी नक्कीच मुक्तता होईल, अशी आशा मुंबईत झालेल्या पाणी परिषदेत व्यक्त झाली.
 
ब्युरो रिपोर्ट, रत्नागिरी
कविता म्हणजे काय? मनातल्या असंख्य चांगल्या-वाईट शब्दांना लिखित स्वरूप देणं, एखाद्या आनंदाच्या, दु:खाच्या, विरहाच्या, भेटीच्या प्रसंगी कवितेतल्या ओळी गुणगुणाव्याशा वाटतात. आपल्या शाळेतल्या अनेक कविता आजही आपल्याला पाठ आहेत. अशाच काही आठवणीतल्या कवितांना उजाळा दिलाय अरुण म्हात्रे यांनी.
 
राहुल रणसुभे, मुंबई
21 मार्च हा दिवस जागतिक काव्य दिन म्हणून साजरा केला जातो. 1999 मध्ये पॅरिसमध्ये भरलेल्या युनेस्कोच्या तिसाव्या अधिवेशनात हा दिवस घोषित करण्यात आला. त्या तारखेला तसा काही विशेष संदर्भ होता अशातला भाग नाही. हा दिवस साजरा करण्यामुळं जागतिक राष्ट्रीय तसंच प्रांतीय पातळीवर कवितेचा प्रचार, प्रसार करत विविध भाषा उपक्रमांना नवचैतन्य देता येईल, असा यामागे उद्देश होता. गेल्या 14 वर्षांचा आढावा घेता हा उद्देश कितीतरी प्रमाणात साध्य झाल्याचं पहायला मिळतं. 
 
सुखदा खांडगे, मुंबई
'तुझ्या कवितेचं पुस्तक वाचलं... छान लिहतोस!' अशा प्रतिक्रियेचं रूपांतर आता 'तुझी कविता ऑनलाईन वाचली, चांगली वाटली' अशा प्रतिक्रियांमध्ये झालंय. कारण आजच्या वेबच्या दुनियेत आता सगळं काही ऑनलाईन झालंय. यात मग कवी तरी मागं कसे राहणार? सध्या इंटरनेटवर ब्लॉग, कवितेचे ग्रुप, सोशल नेटवर्क साईटवरील ग्रुप अशी वेगवेगळी व्यासपीठं उपलब्ध आहेत. या व्यासपीठांच्या माध्यमातून आता कवितांचंही आदान-प्रदान केलं जातंय. आजच्या (21मार्च) जागतिक काव्य दिनाच्या निमित्तानं अशाच वेगवेगळ्या व्यासपीठांचा आढावा घेणार आहोत.