टॉप न्यूज

राहुल रणसुभे, मुंबई
21 मार्च हा दिवस जागतिक काव्य दिन म्हणून साजरा केला जातो. 1999 मध्ये पॅरिसमध्ये भरलेल्या युनेस्कोच्या तिसाव्या अधिवेशनात हा दिवस घोषित करण्यात आला. त्या तारखेला तसा काही विशेष संदर्भ होता अशातला भाग नाही. हा दिवस साजरा करण्यामुळं जागतिक राष्ट्रीय तसंच प्रांतीय पातळीवर कवितेचा प्रचार, प्रसार करत विविध भाषा उपक्रमांना नवचैतन्य देता येईल, असा यामागे उद्देश होता. गेल्या 14 वर्षांचा आढावा घेता हा उद्देश कितीतरी प्रमाणात साध्य झाल्याचं पहायला मिळतं. 
 
सुखदा खांडगे, मुंबई
'तुझ्या कवितेचं पुस्तक वाचलं... छान लिहतोस!' अशा प्रतिक्रियेचं रूपांतर आता 'तुझी कविता ऑनलाईन वाचली, चांगली वाटली' अशा प्रतिक्रियांमध्ये झालंय. कारण आजच्या वेबच्या दुनियेत आता सगळं काही ऑनलाईन झालंय. यात मग कवी तरी मागं कसे राहणार? सध्या इंटरनेटवर ब्लॉग, कवितेचे ग्रुप, सोशल नेटवर्क साईटवरील ग्रुप अशी वेगवेगळी व्यासपीठं उपलब्ध आहेत. या व्यासपीठांच्या माध्यमातून आता कवितांचंही आदान-प्रदान केलं जातंय. आजच्या (21मार्च) जागतिक काव्य दिनाच्या निमित्तानं अशाच वेगवेगळ्या व्यासपीठांचा आढावा घेणार आहोत.
 
ब्युरो रिपोर्ट, नांदेड
"सध्या माध्यम क्षेत्रातही वृत्ती आणि प्रवृत्ती निर्माण झाल्या आहेत. स्पर्धेत टिकणं खूप अवघड असलं तरी पत्रकारांनी सनसनाटी टाळून संवेदनशीलता जपली पाहिजे,” असं प्रतिपादन ‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीचे संपादक मंदार फणसे यांनी केलं. पत्रकार संदीप काळे यांच्या ‘अनावृत-वृत्तापलीकडचे’ या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कविवर्य फ. मु. शिंदे होते.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करण्याच्या स्वप्नावर यावेळी पाणी फिरलं असलं तरी विधिमंडळात बुधवारी सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात शेतीसंबंधित योजनांना कात्री लावण्यात आलेली नाही. याउलट काही योजनांवरील तरतूद वाढवून राज्य सरकार उद्योगधंद्यांबरोबरच शेतीलाही तेवढंच प्राधान्य देत असल्याचं उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दाखवून दिलंय.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
राज्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आज विधिमंडळात सादर झालेल्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात दुष्काळ निवारणासाठी १,१६४ कोटींची तरतूद करण्यात आलीय. याशिवाय पाणी टंचाईसाठी ८५० कोटींची तरतूद करतानाच सिंचन प्रकल्पांसाठी सात हजार कोटी, तर शेतकऱ्यांना कमी दरात वीज उपलब्ध करण्यासाठी ३ हजार २०० कोटींची तरतूद करण्यात आलीय. सरकारनं दुष्काळग्रस्तांसाठी भरीव तरतुदी केल्याचा दावा सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीनं केलाय.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज विधानसभेत दुपारी 2 वाजता राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. शेतकऱ्यांसह राज्यातल्या सर्वांनाच या अर्थसंकल्पाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. दरम्यान, विधिमंडळात काल 2012-2013 या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये, या मागील आर्थिक वर्षात ढोबळ उत्पन्नात 15.9 टक्क्यांची वाढ झाल्याचं नमूद केलंय. यंदा दुष्काळामुळं कृषी क्षेत्राच्या वाढीचा दर घटणार असल्याची चिंताही अहवालात व्यक्त करण्यात आलीय.
 
मुश्ताक खान, मुरूड, रत्नागिरी
कासवाची छोटी-छोटी पिल्लं, आकाशात उडणारे रंगीबेरंगी पतंग, डॉल्फिन सफारी, कोकणी पदार्थांची चंगळ आणि कोकणची लोकसंस्कृती... हे सगळं एकाच ठिकाणी बघण्याची संधी पर्यटकांना मिळाली. निमित्त होतं ते मुरूडमध्ये आयोजित कासव-डॉल्फिन महोत्सवाचं... रत्नागिरीतल्या महर्षी कर्वेंच्या मुरूडमध्ये पहिल्यांदाच १५ ते १७ मार्च दरम्यान या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवामुळं रत्नागिरीच्या मुरूडचं नाव पर्यटकांच्या जिभेवर वसलंच आहे, शिवाय वेळासनं आता कासवांचं गाव म्हणून आपलं नाव सार्थ ठरवलंय.
 
ब्युरो रिपोर्ट, सांगली
सांगलीत आज सकाळपासूनच ''आरक्षण आमच्या हक्काचं... नाही कुणाच्या बापाचं'' अशा घोषणांनी सूर धरला. निमित्त होतं मराठा समाज आरक्षण समितीचं रास्ता रोको. मराठा समाजातील गोरगरीब, भूमिहीन, अल्पभूधारक जनतेला शिक्षण आणि नोकरीत २५ टक्के आरक्षण मिळावं, या मागणीसाठी १८ मार्च रोजी राज्यभर मोर्चा, धरणं आणि रास्ता रोको करण्यात आलंय. यामुळं आज सांगलीतील वाहतूक काही काळ ठप्प होती.
 
मुश्ताक खान, वेळास, रत्नागिरी
समुद्रतळ स्वच्छ ठेवून समुद्री पर्यावरणाचा समतोल राखण्याचं महत्त्वपूर्ण काम कासव करतात. निसर्गानं दीर्घायुष्य दिलेलं हे कासव आता मात्र अल्पायुषी ठरलंय. मनुष्यप्राण्याच्या अतिहव्यासाचे बळी ठरल्यानं ते आता नामशेष होऊ लागलंय. अशा या सागरी कासवांच्या संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास गावानं आणि सह्याद्री मित्र मंडळानं उचललीय. गेल्या १० वर्षांपासून या कार्यात स्वत:ला झोकून देऊन त्यांनी आतापर्यंत १९ हजार कासवांना जीवदान दिलंय. निमित्त ठरलाय मुरूड इथला कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सव...
 
ब्युरो रिपोर्ट, अरख, वाशीम
स्त्रीचं आयुष्य बदलवून टाकणारी घटना म्हणजे विवाह...विवाहानंतर सगळी नातीगोती बदलून जातात. महिला सासरी कितीही रमली तरी माहेरची ओढ काही केल्या संपत नाही. माहेरपण काय असतं ते सासुरवाशीण झाल्याशिवाय कळत नाही. तर... सासुरवाशिणींना अवघ्या गावानंच माहेरपणासाठी आवताण धाडलं तर. आश्चर्यचकीत झालात ना? पण वाशीम जिल्ह्यातील अरख गावानं हे करुन दाखवलंय. अरखमधील सर्व जातीधर्माच्या सासूरवाशीणींचं आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी गावच सामुहिक माहेरपण करतय.