टॉप न्यूज

मुश्ताक खान, मुरूड, रत्नागिरी
कोकणातली पर्यटन स्थळं जागतिक स्तरापर्यंत पोहोचावीत, त्याचबरोबर स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी रत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. १५ ते १७ मार्च दरम्यान चालणाऱ्या या महोत्सवात कोकणी खाद्य संस्कृती आणि लोककलेचा आस्वाद पर्यटकांना घेता येणार आहे. या महोत्सवाचं उदघाटन जिल्ह्याचे पालकमंत्री भास्कर जाधव यांच्या हस्ते झालं.
 
शशिकांत कोरे, सातारा
गजनृत्य... धनगरी समाजाचं पारंपरिक नृत्य. मेंढरामागं धावत धावत जीवन उभं करणाऱ्या धनगर समाजाचा हाच एक हक्काचा विरंगुळा. पावसाळ्याच्या चार महिन्यात गावी असलेल्या धनगरांची पावलं सायंकाळी मेंढरांना वाड्यात कोंडलं की ढोलाच्या आवाजाच्या दिशेनं पडतात. मग सुरू होतं गजनृत्य आणि 'सुंभरानं मांडलं गा, सुंभरानं माडलं,' चा घोष! धनगरी समाजाच्या अस्मितेचं प्रतीक असणारं हे गजनृत्य आता माणदेशातील सर्व जातीधर्माची शाळकरी मुलं पुढं नेतायत. असंख्य हालअपेष्टा सहन करून कलेसाठी सुरू असणारी त्यांची धडपड पाहून सदाशिव अमरापूरकरसारख्या कसलेल्या अभिनेत्यालाही अश्रू आवरणं कठीण गेलं.  
 
ब्युरो रिपोर्ट, नवी दिल्ली
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं 1207 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा बुधवारी केली. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ही माहिती दिली. केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, पी. थॉमस आदी मान्यवर या बैठकीला उपस्थित होते.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती. कराडमधील कृष्णाकाठच्या त्यांच्या समाधीस्थळासह राज्यभरात त्यांना विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन केलं जातंय. कृष्णाकाठच्या कुशीत घडलेलं निर्मळ, निःस्वार्थी, निष्कलंक आणि निरलस असं हे व्यक्तिमत्त्व! यशवंतरावांनी जसा महाराष्ट्र घडवला तसाच देशही! हिमालयाच्या रक्षणाकरता सह्याद्री धावला... असं त्यांचं केलं जाणारं वर्णन याचीच साक्ष देतं. पुस्तकं आणि माणसांचा संग्रह हाच त्यांचा विरंगुळा आणि संपत्तीही. माणूस म्हणून ते किती थोर होते, याबाबत त्यांच्या सुहृद्यांनी सांगितलेल्या काही आठवणी, 'भारत4इंडिया'च्या वाचकांसाठी...
 
शशिकांत कोरे, सातारा
दुष्काळ, माणदेशच्या शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलाय! दुष्काळी परिस्थिती असूनही इथली माणसं दुष्काळी परिस्थितीशी झुंज देत आनंदानं जगतात. इथं कलाकारांची, कर्तृत्ववान माणसांची कमी नाही. या झुंजणाऱ्या माणसांमध्ये असंख्य कलागुण आहेत. घोंगडी बनवणारे, नक्षीकाम करणारे, कलात्मक मडकी बनवणारे, कोरडवाहू शेतीत नवनवीन प्रयोग करून शेतीधान्य, कडधान्य पिकवणारे शेतकरी, अशा सर्वांची इथं रेलचेल आहे. त्यांच्या कलेला व्यासपीठ मिळावं, तसंच त्यातून आर्थिक देवाणघेवाण व्हावी, या उद्देशानं माणदेशी फाऊंडेशन स्थापन झालंय. त्या माध्यमातून भरणाऱ्या माणदेशी महोत्सवानं जनमाणसात चांगलं स्थान मिळवलंय. याचंच प्रत्यंतर साताऱ्यात पुन्हा एकदा पहायला मिळालं.
 
ब्युरो रिपोर्ट, सातारा
गेल्या तीन वर्षांपासून रिक्त असलेलं राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद तातडीनं भरा, या मागणीनं आता राज्यात जोर धरलाय. आजपर्यंत विविध महिला संघटनांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन, निवेदनं देऊन या मागणीकडं लक्ष वेधलंय. परंतु मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या साताऱ्यात या प्रश्नी नुकताच मोर्चा काढण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली दलित महिला विकास मंडळातर्फे काढलेल्या या मोर्चात, खेड्यापाड्यातून आलेल्या महिलांचा आवाज घुमला.
 
ब्युरो रिपोर्ट, शिवडी, मुंबई
फ्लेमिंगो पक्ष्यांना हक्काचा अधिवास मिळावा, यासाठी आता आवाज उठू लागलाय. मुंबईत शिवडी जेट्टीवर नुकत्याच झालेल्या फ्लेमिंगो फेस्टिव्हलमध्ये प्रस्तावित शिवडी न्हावा-शेवा सागरी सेतू शिवडीच्या बाजूनं ५०० मीटर दक्षिणेकडं हलवण्याची मागणी करण्यात आली. तर राज्यभरातील अधिवास असणारी ठिकाणं फ्लेमिंगोंसाठी सुरक्षित ठेवा, तसंच त्यांच्या शिकारीवर निर्बंध घाला, अशी एकमुखी मागणीही यावेळी पक्षीप्रेमींनी केली.
 
शशिकांत कोरे, सातारा
'आजकाल काय सगळं विकत मिळतं' या जमान्यात घरी पापड, सांडगे, स्ट्रॉबेरी जाम अमकं-तमकं करणार्‍या ग्रामीण महिलांचं कौतुकच करायला हवं. खान्देशातल्या तापत्या उन्हात, लोडशेडिंगच्या खेळात, पाण्याच्या बेभरवशाच्या कारभारात बचत गटातील महिलांनी 'मानिनी जत्रे'मध्ये मोठ्या उत्साहानं वस्तूंची विक्री केली! राज्य सरकारनं ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा स्तरावर बचत गटाच्या मालविक्रीसाठी खास प्रदर्शन आयोजित केलं होतं. यात 104 बचत गटांनी सहभाग घेतला होता. यामधून तब्बल वीस लाखांची उलाढाल झाली.   
 
ब्युरो रिपोर्ट, दिल्ली
महाराष्ट्र शासनाचं साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र परिचय केंद्र, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात नुकतंच दिल्ली ग्रंथोत्सवाचं उद्घाटन झालं. वाचनसंस्कृती वृध्दिंगत करण्यासाठी 'ग्रंथोत्सव' हा महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेला उपक्रम दिल्लीतील मराठी वाचक, तसंच वाचनसंस्कृतीला चालना देणारा प्रगतशील उपक्रम असल्याचं मानलं जातंय. या ग्रंथोत्सवामुळं तमाम दिल्लीकर पुस्तकप्रेमी मराठी वाचकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
महिलांना सन्मान-प्रतिष्ठा, शिक्षण-सुरक्षा, आरक्षण-संरक्षण देणाऱ्या राज्याच्या तिसऱ्या महिला धोरणाचा मसुदा आज (शुक्रवारी) महिला दिनाच्या मुहूर्तावर जाहीर झालाय. समान हक्‍काचा न्याय देणाऱ्या या महिला धोरणात शहरी संस्कृतीत वावरणाऱ्या आधुनिक महिलांपासून ते अगदी देवदासी आणि तृतीय पंथीय महिलांच्या हक्कांसाठीही जागर घालण्यात आलाय.