टॉप न्यूज

मुश्ताक खान, गव्हे, रत्नागिरी
कोणतीही फुलझाडं असोत नाहीतर फळझाडं... शेतकऱ्याला लागवड करायची म्हटलं तर उत्तम गुणवत्तेच्या रोपांची आणि कलमांची आवश्यकता भासते. ही रोपं आणि कलमं मिळण्याचं हमखास ठिकाण म्हणजे नर्सरी. ठिकठिकाणी आपल्याला नर्सरी पाहायला मिळतात. मात्र दापोली तालुक्यातील एक आख्खं गाव नर्सरीचाच व्यवसाय करतं. त्यामुळंच गव्हे गावाला नावच पडलंय नर्सरीचं गाव. विशेष म्हणजे, इथल्या नर्सरीतून रोपं आणलीत म्हटल्यावर शेतकऱ्यांना काही काळजी नसते. रोपं चांगली जगणार आणि मोत्याची रास घरी येणार याची त्यांना खात्रीच असते.
 
मुश्ताक खान, दापोली, रत्नागिरी
जगभरात अथवा देशात शेतीविषयी संशोधन होतच असतं. पण ते वेळेत बांधापर्यंत पोहोचतंच असं नाही. त्यामुळं त्या संशोधनाचा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना किती लाभ होतो, हा संशोधनाचा विषय आहे. राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी कोकण विद्यापीठाच्या भेटीदरम्यान नेमक्या याच मुद्द्यावर बोट ठेवत संशोधन करण्याबरोबरच ते तातडीनं बांधापर्यंत पोहोचण्यासाठीही कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन केलं. वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेता शेतीत नवनवीन तंत्रज्ञान उपयोगात आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा, असं आवाहनही त्यांनी केलं. या भेटीत राज्यपालांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांची गाऱ्हाणी ऐकली आणि समस्या सोडवण्याचंही
 
ब्युरो रिपोर्ट, सांगली (खानापूर)
पाणी म्हणजे जीवन! तेच जर नसेल तर माणसाला जगताच येत नाही. सध्याचा दुष्काळ पाण्याचाच. दुष्काळग्रस्त भागातील जनतेला इतर खर्चांसाठी सोडाच, प्यायलाही पुरेसं पाणी मिळेनासं झालंय. पाण्याअभावी माणसांच्याच जीवनमरणाचा प्रश्न उभा राहिलाय, तिथं पिकं, जित्राबांची काय कथा? महाराष्ट्र युवक काँग्रेसनं दुष्काळग्रस्तांच्या या व्यथा जाणून घेऊन त्यांना धीर देण्यासाठी नुकतीच 'बुलडाणा ते सांगली' अशी पदयात्रा काढली. त्याच्या समारोप प्रसंगी 'राईट टू वॉटर' म्हणजेच पाण्याचा हक्क, असा नारा देत त्यासाठी चळवळ उभारण्याची घोषणा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांनी केलीय.
 
ब्युरो रिपोर्ट
कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेत नुकतंच एक आगळंवेगळं विज्ञान प्रदर्शन पार पडलं. यावेळी खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांनी अणुभट्टीपासून सॅटेलाईट, रॉकेटपर्यंतची मॉडेल्स सादर केली. कोणीही थक्क व्हावं, असं हे 'रुरल टॅलेंट' (ग्रामीण शहाणपण) होतं. हे पाहिल्यानंतर ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनीही विद्यार्थ्यांची पाठ थोपटली. मुंबईच्या भाभा विज्ञान मूलभूत शिक्षण सहकार्यानं पार पडलेल्या या विज्ञान जत्रेची 'चला जाणून घेऊया ज्ञानरचनावाद' ही मध्यवर्ती कल्पना होती. राज्यात अशा पद्धतीचं हे पहिलंच विज्ञान प्रदर्शन होतं.
 
विवेक राजूरकर, जालना
मी मतं मागायला आलो नाही, तर मत मांडायला आलो आहे, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात झंझावाती दौरा सुरू केलाय. कोल्हापूर, खेड, सोलापूरप्रमाणं काल (शनिवार) जालना शहरातही त्यांची जाहीर सभा झाली. त्‍यावेळी त्यांनी टीकेला चोख प्रत्‍युत्तर देऊन हिंमत असेल तर रोखून दाखवा, असं खुलं आव्हानच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलं. सिंचनाच्या प्रश्नालाही त्यांनी पुरता हात घातला असून सिंचनावर खर्च झालेले 70 हजार कोटी गेले कुठं, असा प्रश्न पुन्हा उपस्थित केला.
 
मुश्ताक खान, रत्नागिरी
रत्नागिरीतल्या वेरळ इथल्या पीर जलालशाह बाबा यांचा उरुस हा हातिसच्या पीर बाबर शेख यांच्याप्रमाणं हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखला जातो. दरवर्षीप्रमाणंच यंदाही नुकताच हा सर्वधर्मीयांचा मेळावा मोठ्या भक्तिभावानं साजरा झाला. उरुसाला राज्यभरातून लाखो हिंदू-मुस्लिम भाविकांनी उपस्थिती लावली. इथं प्रसाद म्हणून दिलं जाणारं चिकन-मटणाचं जेवण हा नियोजनाचा उत्तम नमुनाच असतो, याची प्रचीतीही भाविकांनी घेतली.
 
मुश्ताक खान, खेड, रत्नागिरी
‘आमच्या मागण्या मान्य करा’, ‘वडाप बंद झालंच पाहिजे’ अशा घोषणा देत खेडच्या रिक्षा चालक-मालक संघटनेनं अवैध प्रवासी वाहतुकीला जोरदार विरोध केलाय. आमच्या रोजीरोटीवर गदा आणणाऱ्या या अवैध वाहतुकी विरोधात प्रशासन कडक कारवाई करत नाही, तोपर्यंत आमचं आमरण उपोषण सुरूच राहील, असा निर्धार रिक्षा संघटनेनं 'भारत4इंडिया'शी बोलताना जाहीर केला. अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडच्या तहसीलदार कचेरीसमोर सुरू असलेलं रिक्षा चालक-मालक संघटनेचं उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील सर्व आव्हानांचं पूर्ण भान राखत आणि समाजातील सर्व घटकांचं व्यापक हित लक्षात घेऊनच अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी बजेट मांडलंय. कृषी, ग्रामीण क्षेत्रासाठी झालेल्या जादा तरतुदींमुळं ग्रामीण भागाचा विकास होईल. याशिवाय कधी नव्हे ते महिला सबलीकरच्या महत्त्वाच्या विषयालाही बजेटमध्ये स्थान मिळालंय. थोडक्यात, जागतिक मंदी, महागाई, वित्तीय तूट या पार्श्वभूमीवर सादर केलेलं हे बजेट सर्वच घटकांच्या विकासाला पूरक असल्याची प्रतिक्रिया तज्ज्ञांकडून व्यक्त होतेय. त्यातल्या त्यात महाराष्ट्रासह इतर राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद व्हायला हवी होती, ती झाली
 
यशवंत यादव, सोलापूर
बजेटमध्ये कृषी क्षेत्राच्या विकासासाठी भरीव तरतूदी करण्यात आल्यात. यातून कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याचा सरकारचा मनोदय स्पष्ट होतो. त्यामुळं आता गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असणारा राज्यासाठीच्या स्वतंत्र कृषी बजेटचा विषय जोर धरू लागलाय. केंद्र सरकारनं बजेटमध्ये कृषीसाठीची तरतूद वाढवल्यानं राज्यात कृषीचं स्वतंत्र बजेट मांडण्यासाठी आम्हाला पाठबळ मिळालंय, असं राज्याचे कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळंच यंदा राज्याचं स्वतंत्र कृषी बजेट मांडलं जाईल, असा विश्वास कृषी क्षेत्रातील जाणकारांमधून व्यक्त होतोय. स्वतंत्र बजेट झालं तर राज्याच्या कृषी विकासाला निश्चितच चालना
 
संदीप काळे, नांदेड
सुप्रीम कोर्टानं बाभळी बंधाऱ्यासंदर्भात महाराष्‍ट्राच्‍या बाजूनं निकाल देत बंधाऱ्याचे 11 मीटर उंचीचे दरवाजे उभारण्यास परवानगी दिलीय. बाभळी प्रकल्प धरण नसून बंधारा असल्याचा महाराष्ट्राचा दावा मान्य करत सुप्रीम कोर्टानं हा निकाल दिलाय. यामुळं दुष्‍काळानं त्रस्‍त असलेल्‍या मराठवाड्याला मोठा दिलासा मिळालाय. या निर्णयामुळं नांदेड जिल्ह्यातील 20 हजार एकर सिंचनाचा, तसंच 50 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटलाय. न्यायमूर्ती आर. एम. लोढा, टी. एस. ठाकूर आणि अनिल दवे यांच्या खंडपीठानं दिला. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा नांदेड जिल्ह्याला होणार असून नांदेडवासीय दिवाळी साजरी करतायत, अशी