टॉप न्यूज

रणधीर कांबळे, सांगली
कुस्ती ही तर रांगड्या मराठी मातीची शान! परंतु, ऑलिम्पिकमधून कुस्तीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यानं अवघ्या मराठी मुलखातून संताप व्यक्त होतोय. आपला म्हणून कुस्ती एकमेव खेळ होता, जो ऑलिम्पिकमध्ये दिसत होता. भारताला पहिलंवहिलं ऑलिम्पिकचं पदक कृष्णाकाठच्या खाशाबा जाधवांनी कुस्तीतच मिळवून दिलं. त्यामुळंच ऑलिम्पिकमधून कुस्तीचं हद्दपार होणं मराठी मनाला डाचायला लागलंय. पण मराठी मातीतून कुस्ती काही हद्दपार होणार नाही. इथं आजही तांबड्या मातीला उसासे फुटतायत. सांगलीत नुकत्याच झालेल्या एका शानदार फडानं हेच तर शिक्कामोर्तब केलं.
 
मुश्ताक खान, रत्नागिरी
कोकणातला सुप्रसिद्ध रत्नागिरी हापूस मुंबईतल्या बाजारपेठेत दिमाखात दाखल झाला आहे. मुंबईपाठोपाठ पुणे, नाशिक, कोल्हापूरच्या बाजारपेठेतही तो दिसायला लागलाय. पण सध्याचे त्याचे भाव पाहता सर्वसामान्यांना या फळांच्या राजाची चव काही आत्ताच चाखता येणार नाही. त्यासाठी नेहमीप्रमाणं गुढीपाडव्याची वाट पाहावी लागणार आहे. आता तुम्हाला एका पेटीला तीन ते पाच हजार रुपये मोजावे लागतील. त्यातच गतवर्षीपेक्षा उत्पन्न सरासरी 40 टक्क्यांनी घटण्याची शक्यता उत्पादक व्यक्त करतायत. त्यामुळं नाही म्हणायला हापूस नेहमीपेक्षा यंदा जास्तच भाव खाऊन जाणार आहे बरं. 'आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
दुष्काळानं पिचलेल्या शेतकऱ्याला पावसानं अवकळा दाखवलीय. जीवाचं रान करून वाचवलेली पिकं आणि फळबागा अवकाळी गारपिटीनं पार भुईसपाट झाल्यात. आठवडाभरापासून कधी खान्देशात, कधी विदर्भात, कधी मराठवाड्यात, तर कधी पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस धुमसतोय. यामुळं सुमारे 19 जिल्ह्यांतील पिकांची अपरिमित हानी झालीय. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारनं दिले असले तरी आजपर्यंतचा अनुभव पाहता किती आणि कधी भरपाई मिळणार, हे काही सांगता येत नाही. त्यामुळं सध्या तरी शेतकरी पुरता हताश झालाय.
 
ब्युरो रिपोर्ट, अमरावती
संतांचा आपण फक्त आध्यात्मिक, धार्मिक अंगांनीच विचार करतो. मात्र, संतांनी आपल्याला सामाजिक भान दिलं. संवाद साधण्यासाठी समृद्ध भाषा दिली. या संतांमध्ये नामदेवांचं स्थान अग्रगण्य आहे. नामदेवांचा सामाजिक, सांस्कृतिक मागोवा घेणारा 'महानामा' हा ग्रंथ परिघ ओलांडण्याचं बळ देतो, असे गौरवोद्गार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक अमर हबीब यांनी काढले.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई / पुणे
बैलगाडा शर्यतीवरील बंदीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानं अवघ्या मराठी मुलखातील बळीराजा एकदम खूश झालाय. दावणीच्या ढवळ्या-पवळ्यावर जीवापाड जीव लावणारा शेतकरी बैलगाडा शर्यतीसाठी अक्षरक्ष: वेडा होतो. परंतु, बंदीमुळं त्यांचं याडंच पळालं व्हतं. आता या  शर्यती पुन्हा सुरू होतील. जत्रा-यात्रांमधून बैलं धावतील, फुफाट्यात आभाळाला भिडणारी भिर्ऱर्ऱ अशी आरोळी ऐकायला येईल, टोप्या आणि फेटे उडतील, एकूणच काय तर मातीत राबणाऱ्या हातांची तब्येत एकदम खूश होऊन जाईल.
 
ब्युरो रिपोर्ट
जंगलसंपदा, त्यातले प्राणी, पक्षी यांचं मनोहारी दर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर डोंबिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात भरलेल्या वाईल्डलाईफ फोटोग्राफी प्रदर्शनाला नक्की भेट द्या. डोंबिवलीतील मिडअर्थ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनं भरवण्यात आलेलं हे प्रदर्शन १८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनात कल्याण-डोंबिवलीतील 30 वाईल्डलाईफ फोटोग्राफर्सनी काढलेल्या छायाचित्रांचा समावेश आहे. प्रदर्शन विनाशुल्क असून 'भारत4इंडिया' त्याचा मीडिया पार्टनर आहे.
 
शशिकांत कोरे, सातारा
फुले, शाहू, आंबेडकरांची वैचारिक परंपरा लाभलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात सध्या महिला सक्षमीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आलाय. महिलांना स्थानिक स्वराज संस्थेत 50 टक्के आरक्षण लागू झाल्यानं महिला निवडून येतात खऱ्या. परंतु, सत्तेची सूत्रं खऱ्या अर्थानं त्यांच्या हाती येत नाहीत. त्यांच्या आडून नवरा, भाऊ, सासरे, अशी नातलग पुरुषमंडळीच कारभार हाकताना दिसतात. हे चित्र बदलण्यासाठी महिलांना कामकाजात सक्षम करणं काळाची गरज झालीय. त्या दृष्टीनं राज्यात क्रांतिज्योती प्रकल्प सुरू झालाय. निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी त्यासाठी पुढाकार घेतलाय.
 
सुखदा खांडगे, नवी मुंबई
तुम्ही जगा आणि दुसऱ्यांनाही जगवा, असा मानव धर्माचा संदेश संत साहित्यानंच समाजात झिरपवला आहे.  समतेचे हे विचार सर्वत्र रुजवण्यासाठी संत साहित्य तळागाळापर्यंत पोहोचवलं पाहिजे, अशी अपेक्षा इथं भरलेल्या संत साहित्य संमेलनात व्यक्त झाली. संमेलनात पार पडलेल्या संत साहित्यावरील विविध चर्चासत्रांमध्ये अभ्यासकांनी संतांनी सांगितलेले मानवतेचे विचार जागवले. संमेलनाचा आजचा शेवटचा दिवस आहे.
 
मुश्ताक खान, खेड, रत्नागिरी
कोकणातल्या बहुमोल जमिनी फक्त पैसे मिळतात म्हणून बाहेरून येणाऱ्या कुणालाही विकू नका, कोकणी माणसा जागा हो, असं जाहीर आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खेड इथं घेतलेल्या सभेत उपस्थित जनसमुदायाला केलं. प्रत्येकालाच 'येवा कोकण आपलाच आसा,' अशी हाक देऊ नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तुमच्या जमिनी तुमच्या हातातून गेल्या तर तुमचं अस्तित्वच उरणार नाही, हे तुम्हाला कळत नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थितांना केला. खेड शहरातल्या ऐतिहासिक गोळीबार मैदानात शुक्रवारी (ता.15) 25 हजार कार्यकर्त्यांच्या साक्षीनं ही जंगी सभा पार
 
ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई
आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने!शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू!!संत तुकोबांच्या या ओव्या म्हणजे शब्दांचं महत्त्व सांगतात. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, सावता माळी या थोर संतांची परंपरा आपल्याला लाभलीय. याच संतांचे शब्द प्रमाण मानून, संत साहित्याला नवी उभारी देण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाला आज नवी मुंबईत थाटात सुरुवात झाली. कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं असून आता तीन दिवस साहित्य रसिकांना वारकरी साहित्याचा आस्वाद घेता येणार आहे.