टॉप न्यूज

ब्युरो रिपोर्ट
भारताच्या राजकिय इतिहासात 16 व्या लोकसभेची निवडणुक खरोखरच ऐतिहासिक ठरली. भारताच्या जनतेनं बीजेपीला फक्त स्पष्ट बहुमतच नाही तर एक एतिहासिक विजय मिळवुन दिलाय. या निवडणुकित एनडीए ला ५४३ पैकी ३३३ जागा मिळाल्यात त्यातल्या २८१ जागा ह्या बीजेपीच्या स्वतःच्या आहेत. गेल्या 25 वर्षातला हा सर्वात धक्कादायक निकाल आहे. १९८४  नंतर कोणत्याही पक्षाला एवढं बहुमत मिळालं नव्हतं. भाजपला स्वत:च्या ताकदीवर बहुमत मिळालंय. लोकसभा निवडणुकीत सरकार स्थापन करण्यासाठी 543 पैकी 272 खासदारांची गरज असते. त्यालाच जादुचा आकडा म्हणतात. दर निवडणुकित ह्या जादुच्या आकड्यापर्यंत पोहोचणं
 
ब्युरो रिपोर्ट, औरंगाबाद/परभणी/लातुर
राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर कुठं जाणार....अशी एक जुनी म्हण आहे. सरकारच्या रुपात नागरीकांना राजाचा मार तर खावाच लागतो, पण आता महाराष्ट्रात सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकाऊन घेतल्यानं कुठं जाऊ...आणि कुणाला सांगु अशी परिस्थिती निर्माण झालीये.
 
ब्युरो रिपोर्ट, नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून देशात ७ एप्रिलपासून १२ मेपर्यंत एकूण नऊ टप्प्यांत मतदान होणार आहे. महाराष्ट्रात १०, १७ आणि २४ एप्रिल अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे. लोकसभेबरोबर आंध्र प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या तीन राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकाही होत आहेत. मतमोजणी १६ मे रोजी होत असून त्यादिवशी दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. विविध घटकांचा विचार करून नऊ टप्प्यांत मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला असून आजपासूनच देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झालीय, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.
 
रोहिणी गोसावी, घोटी (नाशिक)
राज्यात गोवंशातील आढळणाऱ्या प्रमुख चार जातींपैकी उत्तर महाराष्ट्रात आढळणारी जात म्हणजे डांगी. घोटीतील जनावरांचा बाजार हा डांगी गाई-बैलांसाठी प्रसिद्ध आहे. पशुधानाचं महत्त्व ठळकपणे समाजासमोर यावं, यासाठी घोटी नगरपालिका आणि 'भारत४इंडिया.कॉम' यांच्या वतीनं या बाजाराचं औचित्य साधून डांगी आणि इतर जनावरांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. इगतपुरीच्या ज्ञानेश्वर कडु यांचा चार वर्षांचा डांगी बैल हा स्पर्धेत चॅम्पियन ठरलाय. त्याला ढाल, रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
कोकणच्या राजानं आता झिम्मा घालायला सुरवात केलीय. यंदाच्या हंगामातील पहिलाच हापूस थेट देवगडवरुन एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालाय. दरवर्षीच्या तुलनेत महिनाभर आधीच हापूस बाजारात आलाय. आज तब्बल ३०० पेट्यांची आवक झ़ाली असून ७०० ते १५०० रुपये प्रति किलो दरानं आंबा विकला जातोय. हवामान पोषक राहिल्यानं यंदा चांगल्या दर्जाचा भरघोस हापूस हाताशी लागणार आहे. त्यामुळं किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.  
 
ब्युरो रिपोर्ट, पुणे/कोल्हापूर
जगभरातील तरुणाई हातात गुलाबाचं फूल घेऊन 'व्हॅलेंटाइन डे'साठी सज्ज झालीय. पण तुम्हाला माहितेय काय... त्यांच्या हातातल्या बहुतांश गुलाब फुलांना मराठी मातीचा गंध आहे. पुणे, कोल्हापूर, नाशिक येथील गुलाबाच्या मळ्यातून जपान, ऑस्ट्रेलिया, हॉलंड, ग्रीस, स्वीडन आणि दुबईच्या बाजारात गुलाब पाठवले गेलेत. यामुळं थोडेथोडके नव्हेत तर सुमारे २० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या हाती पडणार आहेत. याशिवाय देशातील मुंबई, दिल्ली, बेंगळूरु, कोलकाता आदी मोठ्या शहरात फुले जातील ती वेगळीच. मग 'रेड रोझ' हातात घेऊन शेतकऱ्यानंही 'हॅपी व्हॅलेंटाइन डे' म्हटलं तर बिघडलं कुठं भाऊ?
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
मनसेनं टोल विरोधात राज्यभरात सुरू केलेला 'रास्ता रोको' पेटणार, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलन स्थगित केल्याचं जाहीर केलं. आंदोलनासाठी वाशीकडं येण्यासाठी सकाळी बाहेर पडलेल्या ठाकरेंना चेंबूर पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर दोन तासानंतर कोणतीही कारवाई न करता त्यांना सोडून देण्यात आलं. त्यानंतर आंदोलन स्थगित करत असल्याचं जाहीर करीत ते आल्या पावली कृष्णकुंज या आपल्या निवासस्थानी परतले. त्यानंतर पोलीस यंत्रणेसह सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
 
मुश्ताक खान, रत्नागिरी
भारतातील आणि जगभरातील अनेक क्रिकेट रसीकांसाठी देव असलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला विक्रमादित्य, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. सीएनआर राव यांना आज 'भारतरत्न' सन्मान प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवनात झालेल्या शाही सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशाच्या या दोन रत्नांना मानाचं पान आणि सनद देऊन गौरवलं. क्रिकेटमधले अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवणाऱ्या अनेक विक्रम नव्यानं स्थापित करणाऱ्या सचिन तेंडुलकरनं क्रिकेटमधुन निवृत्ती घेतल्यानंतर लगेचच त्याला भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा भारत सरकारनं केली होती. सचिन तेंडुलकरनं हा पुरस्कार भारतातील सर्व मातांना
 
ब्यरो रिपोर्ट, मुंबई
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून होऊन आज पाच महिने पूर्ण झाली. मात्र, पोलिसांना अद्याप मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही. फेसबुकवरील आपला प्रोफाईल फोटो काळा करुन या गोष्टीचा निषेध करीत "डॉ. दाभोलकरांचे खरे मारेकरी कोण?' असा प्रश्‍न मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आज नेटकऱ्यांनी विचारला. रविवारी रात्रीपासूनच फेसबुकवरील प्रोफाईल फोटो काळा करुन अनेकजणांनी या मोहिमेत भाग घेतला. त्यामुळं आज अवघं फेसबुक निषेधाच्या काळ्या रंगात झाकोळून गेलं. ''डार्कनेस! यू आर इन अ शायनिंनग स्टेट नाऊ अ डेज. प्लीज एक्सप्लेन प्रोफाईल...''अशाप्रकारच्या
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
''सम्यकाचे बोट धरून निघालो आहे मी, निवार्णाकडे-निर्वाणम्-शांतम्...'' आयुष्यभर विद्रोही टाहो फोडताना सर्व धर्म अनित्य आहेत, असं सांगून सम्यकाचं बोट धरा, असं कळवळून सांगणारे पँथर महाकवी नामदेव ढसाळ आज अनंतात विलीन झाले. वंचित घटकांना जगण्याची दिशा देणारा, हक्काचा लढा लढण्यासाठी 'दलित पँथर' संघटना सुरू करुन आपल्या ताकदीची जाणिव दलित तरुणांना करुन देणारा, आणि हे सर्व करताना आपल्या साहित्यातून वैश्विक मूल्यभान देणारे ढसाळ सध्याच्या काळातील क्रांतीकारी नामदेव होते.