टॉप न्यूज

अर्चना जाधव, पुणे
भारतीय चित्रपटसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण होत असताना आत्मपरीक्षणाची गरज आहे. आजपर्यंतच्या प्रवासात या क्षेत्रात आपण नेमकं काय केलं आणि काय कमावलं याचा विचार करायला हवा. सध्या चित्रपटात अश्‍लीलपणा वाढतोय आणि चांगल्या गोष्टीही कमी होत आहेत, असं का होतंय याचाही विचार आवर्जून करायला हवा...हे मोलाचे विचार मांडलेत ज्येष्ठ मल्याळी दिग्दर्शक अदुर गोपालकृष्णन यांनी.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
सर्वसामान्य शेतकऱ्यांना उसाच्या अर्थकारणाचं भानं देऊन त्यांना योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी आक्रमक आंदोलन करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी अखेर 'महायुती'त दाखल झाले आहेत. याबाबत आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीला शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, रिपाईचे रामदास आठवले आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर शेट्टी यांनी हा निर्णय जाहीर केला. यामुळं काँग्रेस - राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात महायुतीची ताकद कमालीची वाढली असून तिथं येत्या निवडणुकीत काट्याची टक्कर होईल, हे यामुळं स्पष्ट झालंय.
 
मुश्ताक खान, रत्नागिरी
नववर्षाच्या स्वागताचे प्रत्येकाचे बेत पक्के झालेत. बऱ्याच जणांनी निसर्गरम्य कोकणात गेलेत. 'यावा कोकण आपलाच आसा' या कोकणी रीतीरिवाजाप्रमाणं स्वागतासाठी कोकणही सज्ज झालंय. आताच सुमारे साडेतीन लाख पर्यटक कोकणात दाखल झाले असून जवळजवळ सर्व हॉटेल्स हाऊसफुल्ल झालीत. हिरवाकंच भरलेला निसर्ग, मा़डाच्या बनांनी झाकोळलेले स्वच्छ, सुंदर समुद्रकिनारे, चावरीबावरी थंडी, सेवेला तत्पर असणारी फणसासारखी माणसं, हे इथलं वैशिष्ट्य. इथल्या प्रत्येक भागात काही ना काही विशेष आहेच. त्यामुळं निसर्गाचा आस्वाद घेत फिरताना इथं वेळ कसा जातो, तेच कळत नाही.
 
ब्युरो रिपोर्ट, नाशिक
नाशिक हा भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक द्राक्ष लागवड करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो.  वायनरीजमुळं 'वाईन सिटी' म्हणून पुढे येणारं नाशिक शहर पर्यटकांना चांगलंच आकर्षित करतंय. वाईन टुरिझमसाठी तर नाशिक हॉट-स्पॉटच आहे. आपली हीच ओळख टिकवून ठेवण्यासाठी नाशिकमधील विंचूर वाईन यार्डला १४ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०१४ दरम्यान ‘इंडिया ग्रेप हार्वेस्ट 2014’ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. भारताचे कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते आणि राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ तसंच खासदार समीर भूजबळ यांच्या उपस्थितीत त्याचं औपचारिक उद्घाटन नाशिकमधील हॉटेल एमराल्ड
 
ब्युरो रिपोर्ट , नाशिक
कांद्याचे भाव प्रतिकिलो 10 रुपयांपर्यंत खाली आल्यानं शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलंय. या पार्श्वभूमीवर कांद्याचं शास्त्र समजून घ्या, असं वडिलकीचा सल्ला देताना कांद्याचं निर्यातमूल्य कमी करण्याचं आश्वासन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिलं होतं. त्याप्रमाणं कांद्याचं निर्यातमूल्य सर्वात कमी 150 डॉलर प्रतिटन करण्याचा निर्णय केंद्रीय कृषी मंत्रालयानं घेतला. नाताळ हा सुट्टीचा दिवस असूनही कृषिमंत्री शरद पवार यांनी मंत्रिगटाची बैठक घेऊन हा निर्णय घेतला. इतर निर्यातदार देशांच्या तुलनेत हे निर्यातमूल्य सर्वात कमी आहे.
 
ब्युरो रिपोर्ट, पिंपरी - चिंचवड
रासायनिक खतं वापरुन केल्या जाणाऱ्या शेतीमुळं पर्यावरणाची तसंच मानवी आरोग्याची अतोनात हानी होते, हे आता पुरतं सिद्ध झालंय. त्यामुळं शेतकरी पुन्हा एकदा सेंद्रीय शेतीकडं वळतोय. ग्राहकांमधूनही मागणी वाढतेय. परंतु, सेंद्रीय कृषी माल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची सक्षम यंत्रणाच शेतकऱ्यांकडं नाही. पिंपरी - चिंचवडच्या आत्मा ग्रुप, यशोधन ग्रुप आणि ज्ञानप्रबोधिनी यांनी संयुक्त विद्यमानं भरवलेल्या निगडीतील सेंद्रीय कृषी प्रदर्शनामुळं तशी एक सुवर्णसंधी शेतकऱ्यांना उपलब्ध झालीय.
 
ब्युरो रिपोर्ट, नाशिक
खान्देशाला वेगळी ओळख देणारा सारंगखेड्याचा प्रसिद्ध घोडेबाजार परंपरेप्रमाणं दत्त जयंतीपासून सुरु झालाय. देशभरातील घोड्यांच्या व्यापाऱ्यांनी सारंखखेडा गजबजून गेलंय. विविध नस्लींच्या आणि शुभशकुनी पंचकल्याणी सारखे विविध प्रकारचे घोडे इथं पहायला मिळतायत. 20 एकरांवर भरलेल्या बाजारात आजअखेर दोन हजार घोडय़ांची आवक झाली आहे. दोन दिवसांत 79 घोडय़ांची विक्री होऊन एकूण 19 लाख 25 हजार 700 रुपयांची उलाढाल झालीय. घोडा हा किती चपळ आणि उमदं जनावरं आहे, याची प्रचिती या बाजारात नजर टाकताना येते.
 
ब्युरो रिपोर्ट, नागपूर
नागपूरला सुरू असणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जादूटोणा विरोधी विधेयक अखेर विधानसभेत मंजूर झालं. कसल्याही परिस्थितीत हे विधेयक मंजूर झालं पाहिजे, ही जनभावना लक्षात घेऊन सरकारनं दुपारी हे विधेयक चर्चेला घेतलं. त्यावेळी विरोधी पक्षांनी प्रचंड गोंधळ घातला. मात्र, त्याला न जुमानता सरकारनं हे विधेयक मंजूर केलं. आता विधान परिषदेची मोहोर उठल्यानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी दिलेला 18 वर्षांचा लढा सफळ संपूर्ण होणार आहे.
 
ब्युरो रिपोर्ट, पुणे
कुस्तीत ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवण्याची जिद्द बाळगून असणारा नरसिंग यादव या मुंबईतील पठ्ठ्यानं सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताबाचा मान पटकावला. भोसरीतील लांडगे क्रीडानगरीत लाखभर कुस्तीप्रेमींच्या साक्षीनं नरसिंगनं मुंबईच्याच सुनील साळुंखेवर 7-0 असा दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्र केसरी किताबाच्या इतिहासात सलग तीन वेळा विजेतेपद पटकावणारा नरसिंग यादव हा पहिलाच मल्ल आहे. या हॅटट्रिकमुळं त्याचं नाव कुस्तीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं जाणार आहे.
 
ब्युरो रिपोर्ट
शेतकरी संघटनेने पुकारलेल्या बंदचा फटका पंढरपुरातील उत्पत्ती एकादशीला बसलाय. आळंदीला जाणारे वारकरी पंढरीत येवून विठुरायाचे दर्शन घेतात. त्या नंतर भाविक आळंदीला वारीला जातात. मात्र शेतकरी संघटनेने पुकारलेल्या बंद मुळे एसटी सेवा बंद आहे. याचा फटका या वारकऱ्यांना बसलाय.