टॉप न्यूज

अविनाश पवार
अविनाश पवार, मंचर    कलगीतुरा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभ राहतं ते भांडण...बऱ्याचदा भांडणालाच कलगीतुरा असं संबोधलं जातं. पण कलगीतुरा नावाची एक लोककला उत्तर पुणे जिल्ह्यात चांगलीच लोकप्रिय आहे. विशेषतः श्रावण महिन्यात सणाच्या दिवशी गावोगावी या कलगीतुऱ्याच्या कार्यक्रमांचं आयोजन होतं. शंकर-पार्वतीमधील वाद या कलगी तुऱ्यातून हिरीरीने लढवला जातो. सवाल जवाबाची कला  सृष्टीची निर्मिती शिव-पार्वतीनं केल्याची आख्यायिका आहे. या सृष्टीनिर्मितीबाबत शिव-पार्वतीचं झालेलं भांडण या कलगी तुऱ्यातून सादर केलं जातं. अर्थात यात दोन पार्ट्या असतात. एक कलगीवाले आणि दुसरे तुरेवाले. कलगी ही
 
Comment (0) Hits: 1355
विवेक राजूरकर
विवेक राजूरकर, औरंगाबाद दिवाळी म्हणजे भल्या पहाटेच्या अंघोळी, दिव्यांची रोषणाई, फुलबाज्यांची फुलं, फटाक्यांचे धमाके, फराळाची रेलचेल...दिवाळीचं असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उमटतं. पण हे झालं शहरात किंवा सुखवस्तू घरात. पण ज्यांचं बिऱ्हाड पाठीवर आहे अशा फिरस्त्या धनगरांची दिवाळी कशी असेल? अशी दिवाळी पाहायला मिळाली, अजिंठा वेरुळच्या रस्त्यावर.  वसू बारसेचा दिवस होता. रानात मेंढ्यांची वाघूर पडली होती. या तीन-चारशे शेळ्या-मेंढ्यांच्या शेजारीच त्यांचे पालनकर्ते अर्थात धनगराचं कुटुंब बसलं होतं. तीन दगडाच्या चुलीवर कुटुंबाची माय भाकऱ्या थापत होती. विशेष म्हणजे आजपासून दिवाळी सुरु झालीय
 
Comment (0) Hits: 995
ब्युरो रिपोर्ट
अलिबाग कोकण किनारपट्टीचा आर्थिक कणा असलेला मत्स्य व्यवसाय सध्या अडचणीत सापडलाय. वाढते प्रदूषण, नष्ट होणाऱ्या काही माशांच्या प्रजाती, घटलेलं उत्पादन, शीतगृहांची कमतरता आणि सरकारी उदासीनता याचा फटका मत्स्य व्यवसायाला बसलाय. कोकणातील एकूण लोकंसख्येच्या 50 टक्के लोक निगडित असलेल्या या व्यवसायाच्या वाढीसाठी कोकण पॅकेजमध्ये घोषणा झाल्या खऱ्या, मात्र अजून त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये. परिणामी एकूण कोकणाच्या अर्थव्यवस्थेलाच सुरुंग लागलाय.  तब्बल आठ दिवस मासेमारी करून भल्या पहाटे अलिबागच्या प्रल्हाद पाटील यांची बोट किनाऱ्याला लागते.  बोटीतून मासे काढण्याची लगबग सुरू होते.  या धांदलीकडं
 
Comment (0) Hits: 2592
ब्युरो रिपोर्ट
नाशिक जगातील सर्वात मोठा आकाश कंदील नाशिकमध्ये साकारलाय. दिवाळी हा दिव्यांचा सण. अंधारावर मात करून प्रकाशमान व्हा... असा जणू संदेश देणाऱ्या दीपावलीत त्यामुळेच आकाश कंदिलाला पहिला मान असतो. सध्या घराघरांसमोर विविध आकारांचे आणि प्रकारांचे रंगीबेरंगी आकाश कंदील उजळलेत. परंतु नाशकातील आकाश कंदील सर्वांच्याच कुतूहलाचा विषय बनलाय. जगातील सर्वात मोठा आकाश कंदील म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झालीय. आता गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  प्रसाद पवार या एका ध्येयवेड्या तरुणानं हा आकाश कंदील साकारलाय.
 
Comment (0) Hits: 906
प्रदिप भणगे
प्रदिप भणगे, मुंबई मराठी माणूस सातासमुद्रापार कुठेही असला तरी दिवाळी साजरी केल्याशिवाय राहत नाही आणि फराळाशिवाय दिवाळी साजरी होत नाही. खमंग, खुसखुशीत पदार्थांनी दिवाळी रूचकर बनते. त्यामुळेच परदेशी राहणाऱ्या नातेवाईकांना दिवाळीचा फराळ आवर्जून पार्सल केला जातो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात फराळ घरी तयार करणे दुरापस्त झाल्याने रेडीमेड फराळालाच पसंती दिली जाते. खमंग फराळ घरपोहोच देण्याची सुविधा देणाऱ्या दादरच्या पणशीकर समर्थ दुग्धालयातून यंदाही मोठ्या संख्येने पार्सल परदेशी रवाना झाली. सध्या महागाईने कळस गाठला असला तरीसुध्दा परदेशातील नातेवाईकांना फराळ पाठवणा-यांमध्ये काही फरक पडलेला
 
Comment (0) Hits: 1071
ब्युरो रिपोर्ट
गोंदिया सरकारी आरोग्ययंत्रणेबद्दल नेहमीच निराशेनं बोललं जातं. सरकारी दवाखान्यामध्ये सुविधांची बोंबाबोंब असते, अशी पेशंट तक्रार करतात. त्यात तथ्यही असतं. पण गोंदियातल्या नक्षलवादी भागातल्या आरोग्य विभागानं हा गैरसमज दूर केलाय. त्यांनी राबवलेल्या माहेर नावाच्या उपक्रमानं आदिवासी महिलांना दिलासा दिलाय. या महिलांची बाळंतपणं हॉस्पिटलमध्ये सुखकर व्हावीत यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी राबतायत.  
 
ब्युरो रिपोर्ट
वर्धा महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमातील गंभीर उदाहरणानं राष्ट्रीय ठेव्यांबाबत आपल्याकडं किती उदासीनता आहे हे दिसून येतं. याचं उदाहरण म्हणजे 13 जून 2011 या दिवशी इथं जपून ठेवलेला गांधीजींचा चष्मा चोरीला गेल्याचं उघडकीस आलं. त्याचा अजूनही तपास लागलेला नाही. 
 
रोहिणी गोसावी
देशात सर्वत्र विकासाचं वारं सुटलंय. शहरं विस्तारतायत. खेडी बदलतायत. जगणं बदलतंय. पण हे विकासाचं वारं डोंगरदऱ्यांमध्ये पोहचलेलं नाही. तिथं राहणाऱ्या आदिवासींपर्यंत पोहोचलेलं नाही. या दुर्लक्षित लोकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचं काम अनेक स्वयंसेवी करतायत. त्यापैकीच एक आहे, रायगड जिल्ह्यातील 'साकव'...
 
ब्युरो रिपोर्ट
वाशिम शहराशी जोडणारा रस्ता नसल्याने वाघोला या गावातील नागरीकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहराशी जोडणाऱ्या रस्त्याला पूल नसल्याने गावकऱ्यांच्या दैनंदीन कामांमध्ये अडथळा येतोय. त्यामुळे गावकरी हवालदिल झाले आहेत.