टॉप न्यूज

ब्युरो रिपोर्ट, hingoli
देशातील पहिलाच प्रयोग हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातलं 100टक्के आदिवासी असलेलं बोल्डावाडी हे गाव. या गावात केंद्र सरकारची ‘इकोटेक व्हिलेज’ योजना आली अन् गावाचा कायापालट झाला. या योजनेमुळं इथल्या आदिवासींचं जीवनच बदलून गेलंय.
 
शशिकांत कोरे, पाटण, सातारा
उसाचं पीक हे नगदी पीक म्हटलं जातं. सामान्यपणं उसाचं पीक घेताना शेतकरी उसाचं उत्पादन कमी होईल या भावनेनं आंतरपीक घेत नाहीत. पण साताऱ्याच्या पाटण येथील विहे गावच्या राजेंद्र देशमुख या प्रयोगशील शेतकऱ्यानं ऊस पिकात आंतरपीक घेण्याचा निर्णय घेतला. उसाची लागण करताना काहीतरी आंतरपीक असावं, जेणेकरून या आंतरपिकामुळं लागवडीवर झालेला खर्च निघेल या दृष्टीतून या शेतकऱ्यानं उसाच्या मुख्य पिकात आंतरपीक म्हणून फ्लॉवरचं सुमारे पंधरा टन उत्पादन घेत उसापेक्षा जास्त पैसा मिळवलाय. त्यांना सर्व खर्चवजा जाता फ्लॉवरपासून घेतलेलं उत्पन्न हे केवळ नफ्यात
 
मुश्ताक खान, रत्नागिरी
सर्व पातळीवर असणाऱ्या वाढत्या भीषण महागाईनं संपूर्ण जनजीवनच त्रस्त असताना सर्वसामान्य शेतकरीही यातून सुटणं अशक्यच. या शेतकऱ्यांची आणि त्याचबरोबर उत्पादित शेतमालाची खरेदी करणाऱ्या ग्राहकांची मुजोर दलालांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी शेतकरी ते ग्राहक थेट विक्री करण्याचे मेळावे राज्यभरात विविध पातळीवर भरवण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर, तर ग्राहकांना उत्तम प्रतीचा माल थेट मिळावा या हेतूनं असाच नुकताच एक मेळावा कोकण कृषी विद्यापीठानं रत्नागिरीच्या शिरगाव भरवला. या तीन दिवस झालेल्या भव्य कृषी महोत्सवात तब्बल ४५ टन धान्याच्या विक्रीतून साडेबारा लाखांची उलाढालही
 
मुश्ताक खान, रत्नागिरी
स्वच्छ, सुंदर समुद्र किनाऱ्यावर मनसोक्त फिरणं कुणाला नको असतं? पण आपल्याकडील अस्वच्छ, घाणीचं साम्राज्य असलेले समुद्रकिनारे बघितले की फिरणं नकोसं होतं. परंतु, आता रत्नागिरीतले समुद्रकिनारे स्वच्छ आणि सुंदर होत आहेत. जिल्हाधिकारी राजीव जाधव यांच्या पुढाकारातून स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. स्वच्छ, सुंदर समुद्रकिनाऱ्यांचं महत्त्व सामान्यजनांवर ठसवतानाच समुद्र किनाऱ्यावर दारू पिण्यासाठी मज्जाव करण्यात आलाय. स्वच्छता मोहिमेदरम्यान सर्वाधिक कचरा दारूच्या बाटल्यांचा सापडल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची कडक अंमलबजावणी सुरू केलीय. यामुळं तळीराम नाराज असले तरी सर्वसामान्य लोक आणि पर्यटक खूश आहेत. ही स्वच्छता कायमस्वरूपी
 
ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई
स्वामी विवेकानंद यांच्या 150 व्या जयंतीचं औचित्य साधून पुण्यातील रामकृष्ण मठातर्फे रथयात्रेचं आयोजन करण्यात आलंय. 'उठा, जागे व्हा आणि आपलं ध्येय साध्य होईपर्यंत लढत राहा', अशा प्रकारच्या प्रेरणादायी विचारांमुळं स्वामी विवेकानंद आजही तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनून राहिलेत, याची प्रचीती या रथयात्रेला मिळणाऱ्या तरुण-तरुणींच्या प्रतिसादावरुन पाहायला मिळते. जिथं, जिथं ही रथयात्रा जाते तिथं, तिथं तरुणाईचा गराडा पडलेला असतो. अगदी देशाची आर्थिक राजधानी असेलेली मुंबईही त्याला अपवाद नव्हती.
 
मुश्ताक खान, चिपळूण, रत्नागिरी
राज्य दुष्काळानं होरपळतंय. धरणांमध्येही अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी पाणी आणायचं कुठून, असा प्रश्न सरकारला पडलाय. जायकवाडी धरणात पाणी सोडा, या मागणीसाठी सोलापूरवासीयांचं मुंबईतील आझाद मैदानात दोन महिन्यांहून अधिक काळ आंदोलन सुरू आहे. थोडक्यात, पाण्याअभावी सर्वांच्याच तोंडचं पाणी पळाल्याचं चित्र असताना कोकणातील कळवंडे धरणातील एकूण साठ्यापैकी केवळ १० टक्के पाण्याचाच वापर होतोय. पाणी असूनही तांत्रिक आणि सामाजिक कारणांमुळं पाणी मिळत नसल्यानं या धरणाचा उपयोग तरी काय, असा संतप्त सवाल शेतकरी विचारतायत.
 
मुश्ताक खान, चिपळूण, रत्नागिरी
ठिकाण चिपळूण तालुक्यातला अडरे होडीचा माळ... हजारो प्रेक्षकांची उपस्थिती... मैदानावर चैतन्यपूर्ण वातावरण... बैलांची चाललेली आवभगत... मध्येच बैलांचा सुटणारा ताबा आणि भीतीनं सैरभैर पळणारे प्रेक्षक... सर्वाच्या चेहऱ्यावरची उस्तुकता शिगेला... लाल झेंडा पडतो आणि वाऱ्याच्यागतीनं धावणाऱ्या बैलांना पाहून उपस्थितांच्या अंगावरचा रोमांच हा पहाण्यासारखाच होता... हे सर्व चित्र पश्चिम महाराष्ट्रातल्या कुण्या गावातला नाही तर चक्क कोकणातलं होतं. अडरे गावात दसपटी क्रीडा मंडळ आयोजित या राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेत पुण्याच्या शारदा पाटील यांच्या सोमजाई महालक्ष्मी वाघजाई रथानं या अटीतटीच्या शर्यतीत बाजी मारली आणि मैदानात गुलालाची
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई, पुणे, नाशिक
उन्हाचा पारा चढत असताना शेतातील माळवं जगवण्यासाठी बळीराजाला जीवाचं रान करावं लागतंय. परंतु ते करुन भाजीपाला राखलेल्या शेतकऱ्यांची सध्या चांदी होताना पाहायला मिळतेय. लग्नसराईमुळं वाढती मागणी असतानाही बाजारपेठेत पुरेसा भाजीपालाच नसल्यानं भाव गगनाला भिडलेत. साहजिकच ज्यांनी भाजीपाला केलाय त्या बव्हंशी बागायत पट्ट्यातील शेतकऱ्याला मनासारखा पैसा मिळू लागलाय. वांगी, कोबी, काकडी, टोमॅटो, भेंडी यांना चांगला भाव आहे. तर आलं, कोथिंबीर, मिरची काही विचारू नका. कोथिंबीर जुडी 60 रुपयांवर तर मिरची 20  ते 60 रुपये प्रतिकिलो झालीय. महागाईनं अगोदरच कंबरडं मोडलेल्या मध्यमवर्गीयांच्या
 
ब्युरो रिपोर्ट, सातारा
राज्यात आतापर्यंत पडलेल्या दुष्काळावर त्या-त्या वेळी केलेल्या उपाययोजनांसाठी किती पैसा खर्च झाला असेल? हा कळीचा प्रश्न उपस्थित केलाय, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी. नियोजन आयोगानं याबाबतची आकडेवारी काढली असून दुष्काळाची ब्याद कायमची संपवण्यासाठी मग एकदाच किती खर्च येईल हे तपासून तसा निधी पदरात पाडून घेण्यासाठी पंतप्रधानांच्या स्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत. दस्तुरखुद्द पवार यांनीच त्यासाठी कंबर कसलीय. त्यामुळं नजीकच्या काळात कायमस्वरूपी दुष्काळ हटवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या विकासकामांसाठी मोठा निधी केंद्राकडून राज्याला मिळण्याची आशा निर्माण झालीय.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
कोकणचा हापूस आता ग्लोबल झालाय. आंबा कसा खायचा असतो, याची माहिती झाल्यानं काटा-चमच्यानं खाणारे विदेशी लोक आता हापूस चापू लागलेत. हीच संधी साधून कोकण भूमी प्रतिष्ठानच्या पुढाकारानं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मार्केटिंग सुरू झालंय. त्याचाच एक भाग म्हणून लंडनमध्ये नुकताच आंबा महोत्सव झाला. यात अवघ्या सहा तासात दोन हजार डझन हापूस हातोहात खपला. लंडनमधील अनेक मॉलधारकांनी हापूस विक्री करण्यासाठी मदतीचा हात पुढं केल्यानं हापूस उत्पादकांच्या आशा उंचावल्यात. यानिमित्तानं युरोपियन बाजारपेठेत 'ग्लोबल कोकण अल्फान्सो' हा ब्रॅण्ड विकसित करण्याचा निर्धार कोकण भूमी