टॉप न्यूज

शशिकांत कोरे, सातारा
राज्यात पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हौसमौज बाजूला ठेवून चार जोडप्यांनी नोंदणी पद्धतीनं विवाह उरकला. एवढंच नव्हे तर वाचलेल्या पैशातून जनावरांच्या छावण्यांना चार ट्रक चारा पाठवून दिला. फलटण तालुक्यातील गोखळीच्या जोडप्यांचा हा अनोखा उपक्रम चर्चेचा विषय बनून राहिलाय. यापासून तरुणाईनं प्रेरणा घेऊन समाजातील दिनदुबळ्यांच्या सेवेसाठी कायम पुढाकार घ्यावा, या उद्देशानं राष्ट्रीय समाज पक्षानं यासाठी पुढाकार घेतला होता.
 
शशिकांत कोरे, सातारा
शेतमालाचा भाव पडला म्हणून कधी शेतकरी, तर भाव वाढल्यानं सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलनं करत असल्याच चित्र पाहायला मिळतं. याचा सुवर्णमध्य साधण्यासाठी 'शेतकरी ते थेट ग्राहक' अशी संकल्पना घेऊन साताऱ्यात सुरू झालेला धान्य महोत्सव कमालीचा यशस्वी झालाय. साताऱ्यातल्या अजिंक्यतारा सहकारी फळे-फुले संस्थेनं तीन वर्षांपूर्वी ही अभिनव कल्पना प्रत्यक्षात आणली. या महोत्सवाला मिळालेला वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन हा सातारा पॅटर्न कृषी विभागातर्फे संपूर्ण राज्यभरात राबवला जातोय. 
 
शशिकांत कोरे, शिखर शिंगणापूर, सातारा
''हे म्हादया, धाव, मला सांभाळ..'' अशी साद घालत मावळत्या सूर्याच्या साक्षीने दीडशेहून अधिक कावडींनी मुंगी घाटाचा चित्तथरारक कडा सर केला. रात्री 12 वाजता मानाच्या तेली भुतोजी बुवांच्या कावडीनं, सप्त नद्यांच्या जलानं, पुष्कर तलावातल्या पाण्यानं शंभू महादेवाला सचैल अभिषेक घातला गेला आणि 'हर हर महादेव' अशा गजरानं शिखर शिंगणापूरचा डोंगर दणाणून गेला. 'बा महादेवा, दुष्काळाशी लढायला बळ दे रे बाबा' असं साकडं यात्रेला आलेल्या हजारो भाविकांनी मऱ्हाटी मुलखाच्या या पालनकर्त्या शंभू महादेवाला घातलं.
 
राहुल रणसुभे, मुंबई
मराठी मातीत एक काळ होता... घरात पैलवान अन् दावणीला खिलार बैलांची जोडी असली की घर श्रीमंत समजलं जायचं. आजही गावागावात मारुतीची मंदिरं आहेत आणि तिथंच आसपास तालीमही. या तालमी आज ओस पडल्यात. जत्रांमध्ये भरणाऱ्या कुस्त्यांच्या आखाड्यांना उतरती कळा लागलीय. बदललेल्या जीवनशैलीत खुराक इतिहासजमा होऊन त्याची जागा टॉनिकनं घेतलीय. अंग मोडून मेहनतीनं व्यायाम करणं कुणालाच नकोय. त्यामुळं तालमीतील लाल मातीत कोणी उतरत नाही, शड्डू काही घुमत नाही. आरोग्याबाबत कधी नव्हे ती जागृती येत असताना तब्येत घडवणाऱ्या तालमीच ओस पडू लागल्यात. आजच्या
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
आज 20 एप्रिल. जागतिक सर्कस दिन! सर्कस पाहिली नाही किंवा माहीत नाही, असा मराठी माणूस विरळाच. आता जमाना बदलला, तरी मराठी माणसाला सर्कशीची ओढ कायम आहे. मुळात भारतीय सर्कस बहरली ती कृष्णाकाठच्या सांगली जिल्ह्यातील तासगाव-म्हैसाळ परिसरात. कालानुरूप सर्कशीच्या व्यवसायाला घरघर लागली. भारतात आज कशाबशा १६ सर्कस शेवटचा श्वास घेतायत. जागतिक सर्कस दिनानिमित्त मुंबईसारख्या ठिकाणी काही कार्यक्रम झाले. कृष्णाकाठाला त्याची कसलीच खबरबात नाही. कृष्णाकाठचं कुंडल आता पहिलं उरलं नाही... याचीच ही साक्ष.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
लग्नसराईची धामधूम त्यातच आज गुरुपुष्यामृत योग. त्यातच भाव बऱ्यापैकी खाली आल्यानं सोनं खरेदीला यापेक्षा चांगला मुहूर्त दुसरा कोणता असू शकतो? साहजिकच आज सराफी बाजारात सोनं खरेदीची धूम सुरू आहे. एलबीटी विरोधात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या व्यापाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका पुणे मुंबईतील नागरिकांना बसला आहे. इथली बहुतांश सराफ बाजार बंद असल्यानं मॉलमधील ब्रँन्डेड दागिने खरेदीकडं त्यांची पावलं वळताना दिसत आहेत. याशिवाय बँका, पोस्ट ऑफिसेस इथूनही सोन्याची नाणी, खरेदी केली जात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. ज्यांना गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करायचं असेल
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
उन्हाळ्याच्या सुट्टीत चित्रपट रसिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील अॅनिमेटेड चित्रपटाची मेजवानी मिळणार आहे. तब्बल दोन वर्षांचं संशोधन, तसंच अनेक अडचणींवर मात करत अखेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील 'प्रभो शिवाजी राजा' हा अॅनिमेटेड चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. डोरेमॉन, सिंचॅन ही अॅनिमेटेड चित्रपटांतील पात्रे जगप्रसिद्ध झाली असताना आपल्या भारतातील, तसंच मराठमोळ्या मातीतील पौराणिक, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांबद्दल अॅनिमेटेड चित्रपट का बनवले जात नाहीत, असा प्रश्न विचारला जात होता. बाल गणेश, हनुमान, लिटल कृष्णा या चित्रपटांनी ही कसर भरून काढण्याचा प्रयत्नही केला. या पार्श्वभूमीवर
 
मुश्ताक खान, दापोली
आला रे आला, कुणबी समाज आला... आवाज कुणाचा कुणबी समाजाचा... कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय... अशा गगनभेदी घोषणांनी कुणबी समाजानं पूर्ण आसमंत दणाणून सोडलं. कुणबी भवनासाठी जागा मिळावी आणि समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं यासह अन्य मागण्यांसाठी 6 हजार कुणबी बांधव तहसील कार्यालयावर धडकले. राज्यभरातील कुणबी समाजाच्या अशाच स्वरूपाच्या मागण्या असून, त्यांची सरकार दरबारी उपेक्षा होतेय, असं या समाजाचं मत बनलंय. सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर राज्यभरात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 57व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर उसळलाय. राज्याच्या नव्हे तर देशाच्या कोनाकोपऱ्यातून लेकराबाळांसह लोकं माथा टेकवून त्यांना अभिवादन करण्यासाठी आलीत. पंचशिलेचे झेंडे, फिती यामुळं चैत्यभूमी परिसराला निळाईची भरती आली असून 'जय भीम'च्या घोषणांनी परिसर दुमदुमू्न गेलाय. लोकांना सुविधा ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेनं कंबर कसली असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. यंदाही गर्दीचा उच्चांक गाठला जाईल, असा अंदाज आहे.
 
सुखदा खांडगे, मुंबई
भीमराज की बेटी मैं तो जयभीम वाली हूँ…अशी लाखामध्ये देखणी माझ्या भीमरावाची लेखणी…अशा विविध प्रकारच्या गाण्यांमध्ये डॉ. आंबेडकरांची महती दिसून येते. बाबासाहेबांचा समतेचा लढा या गाण्यांतून लोकांसमोर आला. त्यांच्या कीर्तीचा महिमा सांगणारी ही गीतपरंपरा सुरू झाली १९३२ पासून. बाबासाहेबांना इंग्लंडमध्ये भरणाऱ्या दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी बोलावण्यात आलं. आणि इथं त्यांच्या कार्याला मदतीचा हात मिळाला. शाहीर पत्रकाराची भूमिका करू लागले. तमाशा सोडून भाऊ फक्कड बाबासाहेबांची माहिती सांगणारे पोवाडे गाऊ लागले. त्याचंच रूपांतर आंबेडकरी जलशामध्ये झालं.