योजना

पुण्यात उद्यापासून किसान प्रदर्शन

भारतातलं सर्वात मोठं कृषी प्रदर्शन असा नावलौकिक मिळवलेलं किसान कृषी प्रदर्शन पुण्यातील मोशी इथं सुरू झालंय. 

16 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनासाठी गावोगावचे शेतकरी पुण्यात येत आहेत. 

दरवर्षी हजारो शेतकरी या प्रदर्शनात हजेरी लावतात. पश्चिम महाराष्ट्रातला सधन शेतकरी असो की विदर्भातला कोरडवाहू कास्तकार. महाराष्ट्रातल्या सर्व भागातले शेतकरी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देतातच.  दुर्गम खेड्यातल्या बचतगटापासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या शेती उत्पादन कंपन्यांपर्यंत सर्वजण एका रांगेत इथं शेतकऱ्यांच्या स्वागतासाठी उभे असतात.   

शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, औजारं, सरकारी योजना, बँका, विमा, पुस्तकं, तज्ज्ञांचं मार्गदर्शन, चर्चा, विचारमंथन अशी स्टॉल्सची आणि कार्यक्रमांची रेलचेल या प्रदर्शनात असते. 

इथं येऊन शेतकरी शेतीतील नव्या दिशा जाणून घेतात. नवा उत्साह, उर्जा घेऊन प्रगतीची नवी वाट चालू लागतात. 

विकासाकडं वाटचाल करणारा भारत आणि त्याला पाठबळ देणारा इंडिया, असं नवं चित्र सध्या देशात दिसू लागलंय. या दोघांना जोडणारा पूल बनलंय 'भारत4इंडिया डॉट कॉम'. हे पोर्टल आहे, शेतकऱ्यांना, त्यांच्या समस्यांना, ग्रामीण भारताला समजावून घेणारं, तिथल्या संस्कृतीची इंडियाला ओळख करून देणारं एक नव्या जगाचं माध्यम. पहिलं ग्रामीण न्यूज नेटवर्क. ही आहे एक 'ग्रासरुट' चळवळ. आपली मुळं शोधायची तर शेतात जायला हवं, गावच्या मातीत जायला हवं. हे गाव, ही माती, ही नाती पाहायला मिळतात, किसान कृषी प्रदर्शनात. म्हणूनच हे प्रदर्शन, त्यात घडणाऱ्या घडामोडी आम्ही घेऊन येत आहोत तुमच्यासाठी. याच ठिकाणी. क्लिक करा आणि अपडेट राहा...    


Comments (1)

  • Guest (शशि सतारा)

    गुड

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.