योजना

ग्राहकाभिमुख गट 'व्हीजन अॅग्रोटेक'

पुणे- सामूहिक शेती पद्धतीनुसार शेती करणारे अनेक शेतकरी गटागटानं मोशी इथल्या कृषी प्रदर्शनाला भेट देतायत. नगर जिल्ह्यातील वडाळा बहिरोबा इथल्या 20 तरुण शेतकऱ्यांनी 'व्हीजन अॅग्रोटेक' नावाचा गट बनवला आहे. या गटानंही किसान प्रदर्शनाला भेट दिली. 

या गटाद्वारं एकूण 200 एकर जमिनीवर ते रब्बी आणि खरीप अशा दोन्ही हंगामात पिकं घेतायत. ऊस, डाळिंब, गहू, हरभरा अशी अनेक प्रकारची पिकं ते घेत आहेत. यासोबतच त्यांनी बचत गटही तयार केलाय. या बचत गटातर्फे आर्थिकदृष्ट्या गरजू शेतकऱ्यांना मदतही दिली जाते. या शेती प्रदर्शनामधून आपल्याला आणखी कोणती नवीन माहिती मिळेल? कोणती नवीन यंत्रसामग्री आली आहे? हे पाहायला हा 'व्हीजन अॅग्रोटेक' गट आवर्जून आला होता. हे कृषी प्रदर्शन पाहून त्यांना काय वाटलं, हे जाणून घेऊया त्यांच्याचकडून...        

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.