योजना

कोरडवाहूला वरदान 'वंडरफुल' डाळिंब

पुणे - डाळिंबावरील तेल्या रोगामुळं महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आलाय. या शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानावर आता उत्तम तोडगा मिळालाय. हा तोडगा आहे इस्रायली तंत्रज्ञानानं विकसित केलेली 'वंडरफुल' ही डाळिंबाची जात. कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना फायद्याच्या ठरणाऱ्या या जातीचं उत्पादन सध्याच्या प्रचलित डाळिंबाच्या जातीपेक्षा अडीचपट जास्त आहे. महत्त्वाचं म्हणजे या डाळिंबावर तेल्या व मर रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती अधिक असल्यानं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता कमी झालीय. 

वंडरफुल जातीचं एक फळ जवळजवळ सव्वा किलो वजनाचं आहे. कृषी मंत्रालयाच्या सहाय्यानं या जातीचं भारतात आगमन झालंय. पुण्यातील शाश्वत कृषी विकास संस्था व राहुरी कृषी विद्यापीठाकडून या डाळिंबाच्या लागवडीला व संशोधनाला प्रोत्साहन दिलं जात आहे. याशिवाय याचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना इस्रायली शास्त्रज्ञांचं लागवडीपासून ते उत्पादन-निर्यात-प्रक्रियेपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे. 


Comments (5)

 • याचे प्रशिक्षण आणि लागवडीची अधिक माहिती पाहिजे आहे. तसेच वंडरफुल जातीचं रोप कुठे भेटेल याची अधिक माहिती द्यावी.

 • विदर्भात मधे हा प्रयोग राबवता येइल, सामान्य शेतकरी हा प्रयोग नक्की राबवू शकतो, दलिम्बाचे उत्पन्न चागले येते त्याला भाव चागला अहे विदर्भातील शेतकर्यांना ह्याचा चांगला फायदा होईल. पाण्याचा निचरा होणारी जमीन लगते तशी जर जमीन असेल टार दलिम्ब तेथे चांगला प्रकारे येउ शकेल.

 • Guest (Rupali)

  चांगली कल्पना आहे! पण सामने शेतकरी हा प्रयोग राबवू शकेल का? आणि विदर्भात हा प्रयोग राबवता येइल का?

 • Guest (seema)

  खुपच चांगली कल्पना आहे,आपण आशा नविन संकल्पनना प्रोत्साहन दिले पाहिजे आणि जास्तीत जास्त माल आपण निर्यात करायला हवा....

 • Guest (शशि satara)

  गुड

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.