
पुणे - मोशी इथं भरलेल्या कृषी प्रदर्शनात शेती उपयोगी सामग्रींच्या स्टॉलना भेटी दिल्यानंतर आणि माहिती घेतल्यानंतर शेतकरी मग वळतो ते क्षुधाशांतीसाठी विविध खाद्यपदार्थांनी सजलेल्या उपाहारगृहांकडे. ही उपाहारगृहं थाटली आहेत जवळपासच्या पाच-सहा बचत गटांनी.
इथं वडापावपासून ते रबडी कुल्फीसारखे वेगवेगळ्या प्रकारचे मेन्यू ठेवले. पण शेतकऱ्यांच्या सगळ्यात जास्त आकर्षणाची ठरली तरी इथली पुणेरी जिलेबी आणि अस्सल ग्रामीण असलेली बाजरीची भाकरी आणि पिठलं. जिलेबी शुद्ध तुपात तळली जाते. याशिवाय इथं आलेल्या बचत गटांना या कृषी प्रदर्शनातून आर्थिक हातभार कसा मिळतो, याचा आढावा घेतलाय 'भारत4इंडिया'चे पुणे ब्युरो चीफ अविनाश पवार यांनी.
Comments
- No comments found