योजना

शेतकऱ्याला नफा देणारं वाण

पुणे- वाराणसी येथील प्रयोगशील शेतकरी चंद्रशेखर सिंह यांनी सुगंधी धान आणि गव्हाचं देशी वाण विकसित केलंय. या शोधकार्यासाठी त्यांचा राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय.

 

सिंह यांनी या वाणाची लागवड करण्यासाठी रासायनिक पद्धतीचा अवलंब न करता संपूर्णपणं सेंद्रीय शेती पद्धत अंगीकारली आहे.

आपल्या सुगंधित धानाबाबत बोलताना सिंग म्हणाले, की "हे धान सुगंधित असून याच्या लागवडीस कमी वेळ लागतो आणि हा अतिशय उत्तम दर्जाचा तांदूळ आहे. सध्या हा तांदूळ बाजारात 40रु. किलोनं विकला जातोय. यातून शेतकऱ्याला भरपूर नफा होतोय. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनीही या धानाची लागवड करून फायदा मिळवावा," अशी मनीषा त्यांनी व्यक्त केलीय.    

या वाणाची वैशिष्ट्यं पाहूः-

1. सुगंधी धानाचं वाण 

  • खुशबू 1 S, खुशबू 2 S
  • लागवडीस कमी वेळ लागतो 
  • अतिशय उत्तम दर्जाचा तांदूळ
  • सध्या बाजारात 40रु. किलो दर
  • शेतकऱ्याला भरपूर नफा 
  • या वाणामध्ये प्रोटिन, आर्यन, फायबरचं प्रमाण जास्त
  • पिकाचा कालावधी- 115-120 दिवस

2. गहू

  • बाबा विश्वनाथ (CSW- 467)
  • उत्पादन- 70-72 क्विंटल प्रति हेक्टर
  • चपाती चवीला चांगली

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.