योजना

फळपिक विमा योजना

केंद्र आणि राज्य सरकारनं फळपिक लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना आखल्यात. त्यांचा फायदा घेताना फळपीक विमा योजनेचा लाभही शेतकऱ्यांनीही घेतला पाहिजे.

fruit f2

 

योजनेची उद्दीष्ट्यं -

1) राज्यातील द्राक्ष, केळी, संत्रा, मोसंबी, डाळिंब, आंबा आणि काजु या निवडक फळपिकांना फळपिक विमा अंतर्गत प्रायोगिक तत्वावर प्रतिकुल हवामानापासुन सुरक्षा मिळवुन देणे.

2) कमी पाऊस, पासातील खंड, तापमान आणि सापेक्ष आर्द्रता यापसुन निर्धारित केलेल्या कालावधीपर्यंत फळपिकांचं संरक्षण करणे. आणि नुकसान झाल्यास आर्थिक सहाय्य देणे.

3) हवामानाच्या अस्थिरतेतही शेतकऱ्यांना आर्थीक स्थैर्य मिळवुन देणं.

 

विमा कंपन्यांची नावं

1) एचडीएफसी,-अॅग्रो, 6 वा मजला, लिला बिझनेस पार्क, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी(पुर्व)
मुंबई- 400059
संत्रा (मृग बहर)


2) अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कम्पनी ऑफ इंडिया लिमीटेड, मुंबई.
क्षेत्रिय कार्यालय- स्टॅाक एक्सचेंज टॅावर, पुर्व खंड, 20 वा मजला, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई. 400 023
संत्रा (मृग बहार)

 

कोण पात्र आहेत?

1) योजनेत दिलेले क्षेत्र  आणि फळपिकं म्हणजे संत्रा, मोसंबी, पेरु आणि चिकु ही पिकं घेणारे शेतकरी या योजनेत सहभाग घेण्यास पात्र आहेत.
2) विविध वित्तीय संस्थांकडे पिक कर्जासाठी अर्ज केलेल्या आणि ज्यांची अधिसुचित फळपिकासाठी पिक कर्ज मर्यादा मंजुर आहे अशा सर्व शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची आहे.
3) बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना एच्छीक आहे.

 

योजनेचा लाभ-

पथदर्शक हवामान आधारित पिक विमा योजनेत भाग घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना विमा हफ्त्यापोटी 50 टक्के अनुदान मिळेल. या 25 टक्के वाटा केंद्र सरकारचा तर 25 टक्के वाटा राज्य सरकारचा असेल. राहीलेली 50 टक्के रक्कम शेतकऱ्यांना विम्याच्या हफ्त्यांमधुन भरावी लागेल.

 योजनेचा सविस्तर तपशील महाराष्ट्र शासनाच्या पुढील लिंकवर उपलब्ध आहे.

https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201306071017341001.pdf


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.