योजना

पुणे- वाराणसी येथील प्रयोगशील शेतकरी चंद्रशेखर सिंह यांनी सुगंधी धान आणि गव्हाचं देशी वाण विकसित केलंय. या शोधकार्यासाठी त्यांचा राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय.
 
पुणे - मोशी इथं भरलेल्या कृषी प्रदर्शनात शेती उपयोगी सामग्रींच्या स्टॉलना भेटी दिल्यानंतर आणि माहिती घेतल्यानंतर शेतकरी मग वळतो ते क्षुधाशांतीसाठी विविध खाद्यपदार्थांनी सजलेल्या उपाहारगृहांकडे. ही उपाहारगृहं थाटली आहेत जवळपासच्या पाच-सहा बचत गटांनी.
 
मोशी - किसान कृषी प्रदर्शनात अल्पभूधारकांसाठी अनेक स्टॉल उभारण्यात आलेत. त्यामध्ये सहयोग या संस्थेच्या स्टॉलवर मधमाशी पालनाची संपूर्ण माहिती करून दिल्यानं शेतकऱ्यांना या व्यवसायाबाबतची सखोल माहिती मिळत आहे. मधमाशी पालनाव्दारे केवळ मधविक्रीतूनच फायदा मिळत नाही, तर परागीभवनाद्वारं शेतीच्या उत्पन्नातही वाढ होते.
 
Comment (1) Hits: 1835
पुणे - डाळिंबावरील तेल्या रोगामुळं महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आलाय. या शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानावर आता उत्तम तोडगा मिळालाय. हा तोडगा आहे इस्रायली तंत्रज्ञानानं विकसित केलेली 'वंडरफुल' ही डाळिंबाची जात. कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना फायद्याच्या ठरणाऱ्या या जातीचं उत्पादन सध्याच्या प्रचलित डाळिंबाच्या जातीपेक्षा अडीचपट जास्त आहे. महत्त्वाचं म्हणजे या डाळिंबावर तेल्या व मर रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती अधिक असल्यानं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता कमी झालीय. 
 
पुणे- सामूहिक शेती पद्धतीनुसार शेती करणारे अनेक शेतकरी गटागटानं मोशी इथल्या कृषी प्रदर्शनाला भेट देतायत. नगर जिल्ह्यातील वडाळा बहिरोबा इथल्या 20 तरुण शेतकऱ्यांनी 'व्हीजन अॅग्रोटेक' नावाचा गट बनवला आहे. या गटानंही किसान प्रदर्शनाला भेट दिली. 
 
पुणे-  मोशी इथं भरलेल्या किसान प्रदर्शन 2012ला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. प्रदर्शन स्थळी असलेले सहा पंडाल गर्दीनं अगदी फुलून गेलेले आहेत. या पंडालमध्ये नक्की कोणकोणते स्टॉल्स आहेत याबद्दल आमचे ब्युरो चीफ राहुल विळदकर यांनी घेतलेला आढावा...
 
Comment (0) Hits: 969
पुणे- किसान कृषी प्रदर्शनाचा तिसरा दिवसही गर्दीनं फुलून गेला. तिसऱ्या दिवशी प्रदर्शन स्थळी येणाऱ्यांनी तीस हजारांचा टप्पा ओलांडला.  राज्यातूनच नाही तर देशभरातून शेतकरी हे प्रदर्शन पाहण्यासाठी पुण्यात दाखल होतायत.  शिवाजीनगरहून येणाऱ्या बसगाड्या खच्चून भरून येतायत. अनेक शेतकरी परिवारासह मोठ्या उत्सुकतेनं प्रदर्शन पाहात आहेत.  तिसऱ्या दिवशी प्रदर्शन स्थळी काय परिस्थिती होती याचा आढावा घेतलाय आमचे ब्युरो चीफ अविनाश पवार यांनी...
 
Comment (0) Hits: 991
पंचायत समितीच्या बायोगॅस योजनेबाबत रत्नागिरी पंचायत समितीचे कृषी अधिकारी उमेश भागवत यांनी दिलेली माहिती...
 
Comment (0) Hits: 1086
मोशी, पुणे- दिवसेंदिवस शेतीच्या कामासाठी मजूर मिळवणं अवघड झालंय. त्यावर उपाय म्हणून कोल्हापूरच्या एका उद्योजकानं एक व्यक्ती सहज चालवू शकेल असं खास कमी वजनाचं नांगरणी, खुरपणी यंत्र तयार केलंय. हातात गिअर असलेलं आणि मजबूत पाती यामुळं हे मशीन खूपच उपयुक्त ठरतंय. मजुरांवरील खर्च वाचवणाऱ्या या यंत्राबद्दल जाणून घेतलंय आमचे ब्युरो चीफ राहुल विळदकर यांनी...  
 
Comment (0) Hits: 1371
मोशी, पुणे- दिवसेंदिवस शेती हायटेक होत चाललीय. किसान प्रदर्शनात शेतीचं नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना आकर्षित करतंय.  मागील दोन वर्षांपासून देशात ऊसतोडणी यंत्राचा वापर वाढलाय. छोट्या शेतकऱ्यांपासून मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत सगळेच या यंत्राचा वापर करतांना दिसतायेत.  आता तर ऊसतोडणी यंत्राबरोबर चिपाड जमा करण्याचं यंत्रही बाजारात आलंय.  त्यामुळं शेतकऱ्यांचे कष्ट आणि वेळही वाचतोय.  या यंत्राबद्दल जाणून घेतलंय आमची करस्पाँडंट रोहिणी गोसावीनं.        
 
Comment (0) Hits: 1042