योजना

सिंधुदुर्ग – सर्वसाधारणतः भेंडी म्हटली, की हिरवीगार भेंडी नजरेसमोर येते. पण एखाद्यानं तुम्हाला विचारलं, "तुम्ही लाल-गुलाबी भेंडी पाहिलीत का?" तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.  म्हणाल, "अरे बाबा, अशी भेंडी असतात का कुठं? एक तर ती रंगवलेली असावीत किंवा कृत्रिम असावीत." पण खरंच भेंडीची भाजी आवडीनं खाणाऱ्यांसाठी ही खूशखबर आहे. अशी भेंडी आता तुमच्या पानात वाढली गेलीत तर आश्चर्य वाटायला नको. या लाल-गुलाबी भेंडीचं उगमस्थान आहे कोकणातल्या वेंगुर्ला इथं...
 
पुणे - किसान कृषी प्रदर्शनासाठी गावोगावचे शेतकरी पुण्यनगरीत येतायत. दुसऱ्या दिवशीही प्रदर्शन स्थळी शेतकऱ्यांची मोठी गर्दी झालीय. शिवाजीनगरहून येणाऱ्या बसगाड्या खच्चून भरून येतायत. अनेक शेतकरी परिवारासह मोठ्या उत्सुकतेनं प्रदर्शन पाहात आहेत. हे प्रदर्शन साधंसुधं नाही, संपूर्ण प्रदर्शन काळजीपूर्वक पाहायचं झालं तर दिवस पुरत नाही. 
 
पुणे - शेतकऱ्याला नेहमीच येणाऱ्या नैसर्गिक संकटांना तोंड देत शेती करावी लागते. त्यातच मानव निर्मित संकटही त्याचा पाठलाग सोडत नाहीत. मजुरांची टंचाईचा प्रश्न त्याला नेहमीच भेडसावतो. परंतु यंदा मोशी इथं भरलेल्या किसान कृषी प्रदर्शनात या प्रश्नावर उत्तर सापडलेलं दिसतं. ऊस लागवडीसाठी कोपरगाव इथल्या कंपनीनं बाहुबली नावाचं यंत्र विकसित केलेलं आहे. हे यंत्र  पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. तर या यंत्राचा आढावा घेतलाय आमचे ब्युरो चीफ अविनाश पवार यानं... 
 
Comment (0) Hits: 982
पुणे-  मोशी इथं सुरू असलेल्या किसान कृषी प्रदर्शनात अनेक शेती उपयोगी वस्तू्ंनी शेतकऱ्यांना आकर्षित केलंय. त्यामध्ये न्यू हॉलंडचा अत्याधुनिक ट्रॅक्टर सर्वांचा चर्चेचा विषय झालाय. या ट्रॅक्टरमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती उत्पादनाच्या दृष्टीने नवनवीन सुविधा देण्यात आल्या आहेत. तसंच यामध्ये चालकासाठी सुसज्ज अशी एसी कॅबिनही देण्यात आली आहे. त्यामुळे हा विशेष ट्रॅक्टर चर्चेचा विषय बनलाय.  या अत्याधुनिक ट्रॅक्टरचा आढावा घेतलाय आमची करस्पाँडंट रोहिणी गोसावी हिने...
 
Comment (0) Hits: 1112
मोशी - थर्माकोल, प्लास्टिक अशा निसर्गविघातक वस्तूंपेक्षा निसर्गदत्त सुपारी, केळीची पानं आणि खोडांपासून मिळणाऱ्या टाकाऊ भागांपासून अनेक सुंदर वस्तू बनवता येतात. पुण्याच्या संग्राम पाटील यांनी तमिळनाडू कृषी विद्यापीठाच्या मदतीनं अशाच टाकाऊपासून टिकाऊ आणि इकोफ्रेंडली वस्तू बनवल्या आहेत. पाहूयात या वस्तूंची खासियत...
 
Comment (0) Hits: 1270
पुणे - किसान कृषी प्रदर्शनासाठी गावोगावचे शेतकरी पुण्यनगरीत येतायत. दुसऱ्या दिवशीही प्रदर्शन स्थळी शेतकऱ्यांची मोठी गर्दी झालीय. शिवाजीनगरहून येणाऱ्या बसगाड्या खच्चून भरून येतायत. अनेक शेतकरी परिवारासह मोठ्या उत्सुकतेनं प्रदर्शन पाहात आहेत. हे प्रदर्शन साधंसुधं नाही, संपूर्ण प्रदर्शन काळजीपूर्वक पाहायचं झालं तर दिवस पुरत नाही, याचा अनुभव गाठीशी असल्यानं अनेकांनी दशमीचं गाठोडं सोबत आणलंय. शेतकऱ्यांना नवनवीन गोष्टी पाहण्याची किती ओढ आहे, हेच यावरून पाहायला मिळत आहे.
 
पुणे - भारतातलं सर्वात मोठं कृषी प्रदर्शन असा नावलौकीक मिळवलेलं किसान कृषी प्रदर्शन आजपासून मोशीत सुरू झालंय. प्रदर्शन पाहण्यासाठी देशभरातून आलेल्या शेतकऱ्यांची इथं एकच झुंबड उडालीय. या भव्य कृषी प्रदर्शनाबाबत आयोजकांकडून माहिती घेतलीय आमची करस्पाँडन्ट रोहिणी गोसावी हिनं... तर पाहूया काय आहे या प्रदर्शनामध्ये !  
 
Comment (0) Hits: 998
भारतातलं सर्वात मोठं कृषी प्रदर्शन असा नावलौकिक मिळवलेलं किसान कृषी प्रदर्शन पुण्यातील मोशी इथं सुरू झालंय.  16 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनासाठी गावोगावचे शेतकरी पुण्यात येत आहेत. 
 
मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं दहावीनंतरचं शिक्षण आणि परीक्षेची फी भरण्याची योजना समाजकल्याण खात्यातर्फे राबवली जाते. पाहूया या योजनेचं स्वरूप काय आहे...  
 
केंद्र सरकारच्या निकषांनुसार राज्यातल्या  ६५ वर्षांवरील निराधार, वृद्ध व्यक्तींना निवृत्तीवेतन देण्यात येते. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, असं या योजनेचं नाव आहे.